रणजीत विदर्भाला जेतेपदाची संधी  

अनुभवी फलंदाज चेतेश्वर पुजारा दुसऱ्यांदा अपयशी ठरताचा सौराष्ट्र संघाची रणजी करंडकाच्या अंतिम समान्यात चौथ्या दिवशीच घसरगुंडी झाली.

By ऑनलाइन लोकमत | Published: February 7, 2019 04:32 AM2019-02-07T04:32:16+5:302019-02-07T04:32:59+5:30

whatsapp join usJoin us
Ranji Trophy : offers Vidarbha a chance to win | रणजीत विदर्भाला जेतेपदाची संधी  

रणजीत विदर्भाला जेतेपदाची संधी  

whatsapp join usJoin usgoogleNewsNext

नागपूर : अनुभवी फलंदाज चेतेश्वर पुजारा दुसऱ्यांदा अपयशी ठरताचा सौराष्ट्र संघाची रणजी करंडकाच्या अंतिम समान्यात चौथ्या दिवशीच घसरगुंडी झाली. २०६ धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करणाºया पाहुण्या संघाने ५८ धावात अर्धा संघ गमावताच गत चॅम्पियन विदर्भ दुसºया जेतेपदापासून केवळ पाच पावले दूर आहे. आज गुरुवारी अखेरच्या दिवशी सौराष्ट्रला अद्याप १४८ धावांची गरज असून त्यांचे पाच फलंदाज शिल्लक आहेत.
जामठा स्टेडियमवर चौथ्या दिवशी आदित्य सरवटेने पुन्हा एकदा पुजाराला भोपळाही न फोडू देता पायचित केले. डावखुºया सरवटेने नव्या चेंडूने मारा करीत दहा षटकात १३ धावात तीन गडी बाद केले. याआधी दोनदा उपविजेता राहिलेल्या सौराष्ट्र संघाला विजयासाठी जोरकस प्रयत्न करावे लागतील. चौथ्या दिवशी खेळ थांबला तेव्हा विश्वराज जडेजा (२३) आणि कमलेश मकवाना (२) हे नाबाद होते.
डावखुरा फिरकीपटू धर्मेंद्रसिंग जडेजा याने ९६ धावात सहा गडी बाद करीत सौराष्टÑची स्थिती भक्कम केली होती. ८ बाद १४८ असा संघर्ष करीत असताना आठव्या स्थानावर आलेल्या आदित्य सरवटेने १३३ चेंडूत चिवट ४९ धावा करीत संघाला २०० चा आकडा गाठून दिला. कालच्या २ बाद ५५ वरुन पुढे खेळणाºया विदर्भाकडून मोहित काळे याने ९४ चेंडूत ३८ धावांचे योगदान दिले. त्यानंतर सौराष्टÑच्या दुसºया डावाला सरवटे यानेच खिंडार पाडले. पहिल्या डावातील शतकवीर स्नेल पटेल (१२), हार्विक देसाई (८) आणि पुजारा (००) यांना पहिल्या पाच षटकात त्याने तंबूत परत पाठविले. त्याआधी, टिच्चून मारा करणाºया जडेजाने पहिल्या सत्रात अनुभवी वसीम जाफर (११) व गणेश सतीश (३५) यांच्यासह चौघांना बाद केले.

Web Title: Ranji Trophy : offers Vidarbha a chance to win

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.