राहुल, पंड्या प्रकरण लोकपालांकडे सोपवणार

भारतीय क्रिकेट नियामक मंडळाच्या (बीसीसीआय) प्रशासकीय समितीची (सीओए) बैठक गुरुवारी होणार आहे.

By ऑनलाइन लोकमत | Published: March 7, 2019 04:11 AM2019-03-07T04:11:27+5:302019-03-07T04:12:14+5:30

whatsapp join usJoin us
Rahul will hand over Pandya's case to Lokpal | राहुल, पंड्या प्रकरण लोकपालांकडे सोपवणार

राहुल, पंड्या प्रकरण लोकपालांकडे सोपवणार

whatsapp join usJoin usgoogleNewsNext

नवी दिल्ली: भारतीय क्रिकेट नियामक मंडळाच्या (बीसीसीआय) प्रशासकीय समितीची (सीओए) बैठक गुरुवारी होणार आहे. या बैठकीत हार्दिक पांड्या व लोकेश राहुल यांनी एका टीव्ही शोदरम्यान केलेल्या आक्षेपार्ह व्यक्तव्याची चौकशी लोकपाल डी. के. जैन यांच्याकडे देण्यात येणार आहे.
राहुल व पांड्या यांनी एका कार्यक्रमात महिलांविषयी आक्षेपार्ह वक्तव्य केले होते. यानंतर त्यांच्यावर तात्पुरत्या निलंबनाची कारवाई केली होती. मात्र चौकशी पूर्ण होईपर्यंत त्यांच्यावरील निलंबन मागे घेण्यात आले आहे.
उच्च न्यायालयाने या प्रकरणाची चौकशी करण्यासाठी लोकपालाची नियुक्ती केली आहे. सीईओचे अध्यक्ष विनोद राय म्हणाले,‘ लोकपालच्या नियुक्तीनंतर ही पहिलीच बैठक होत आहे.त्याच बरोबर या बैठकीत अन्य मुद्यांवरही चर्चा होणार आहे.’ उच्च न्यायालयाचे माजी न्यायाधीश जैन म्हणाले,‘ राहुल व पांड्या यांचा मुद्दा चौकशीसाठी कधी सोपतात याची मी वाट पहात आहे.’
गुरुवारी होणाऱ्या बैठकीत प्रथमच सीईओचे नवे सदस्य रवी थोडगे सहभागी होणार आहेत.त्यांची मागील महिण्यात नियुक्ती करण्यात आली आहे. मागील बैठकीत त्यांनी फोनवरुन बैठकीत सहभाग दर्शवला होता. या शिवाय बैठकीत विनोद राय व डायना एडुल्जी यांचाही सहभाग असणार आहे.
या बैठकीत आंतकवादाला प्रोत्साहन देणाऱ्या देशांबरोबरचे संबंध समाप्त करण्यासंदर्भात आंतरराष्टÑीय क्रिकेट परिषदेला लिहिलेल्या पत्रावरही चर्चा होणार आहे. त्याचबरोबर २३ मार्चपासून सुरुहोणाºया आयपीएल संदर्भातील विषयांवरही चर्चा होणार आहे.

Web Title: Rahul will hand over Pandya's case to Lokpal

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.