एक नंबरी अश्विन, पूर्ण केलं बळीचे त्रिशतक अन् बरच काही...

भारताचा आघाडीचा फिरकी गोलंदाज आर, अश्विननं श्रीलंकेविराधातील पहिल्या कसोटी सामन्यात आठ बळी घेतले. यासह अश्विननं कसोटीमध्ये बळींचे त्रिशतक पुर्ण केलं आहे.

By ऑनलाइन लोकमत | Published: November 27, 2017 01:26 PM2017-11-27T13:26:13+5:302017-11-27T13:54:03+5:30

whatsapp join usJoin us
R. Ashwin is the only bowler in the world, completed his triple hundred | एक नंबरी अश्विन, पूर्ण केलं बळीचे त्रिशतक अन् बरच काही...

एक नंबरी अश्विन, पूर्ण केलं बळीचे त्रिशतक अन् बरच काही...

whatsapp join usJoin usgoogleNewsNext

नागपूर -  भारताचा आघाडीचा फिरकी गोलंदाज आर, अश्विननं श्रीलंकेविराधातील पहिल्या कसोटी सामन्यात आठ बळी घेतले. यासह अश्विननं कसोटीमध्ये बळींचे त्रिशतक पुर्ण केलं आहे.  नागपूर कसोटीमध्ये अश्विनने अचूक टप्यावर गोलंदाजी करताना अनेक किर्तीमान आपल्या नावावर केले आहेत. सर्वात जलद 300 बळी घेण्याचा विक्रम अश्विनने आपल्या नावावार केला आहे. अश्विनने हा पराक्रम 54 व्या कसोटी सामन्यात केला आहे. यापूर्वी हा विक्रम ऑस्ट्रेलियाचा वेगवान गोलंदाज डेनिस लिलीच्या नावावर होता. त्यानं 56 सामन्यात 300 बळी घेतले होते. भारताकडून वेगवान 300 बळी घेण्याचा विक्रम अनिल कुंबळेच्या नावावर होता. कुंबळेनं 66 कसोटीमध्ये 300 घेतले होते. आता अश्विननं 54 व्या कसोटीमध्ये 300 बळी घेत हा पराक्रम आपल्या नावावर केला आहे. श्रीलंकेविरोधात सुरु असलेल्या कसोटीमध्ये अश्विनने पहिल्या डावात 67 धावांच्या मोबदल्यात चार बळी घेतले होते तर दुसऱ्या डावात 63 धावांच्या मोबदल्याच चार बळी घेतले. 



 

सलग तीन वर्षात घेतल्या 50 विकेट - 
आर. अश्विनने या वर्षी 10 कसोटी सामन्यात 25.80 च्या सरासरीनं 51 विकेट घेतल्या आहेत. यावर्षी 50 विकेट घेणारा तो जगातील चौथा तर भारताचा पहिला गोलंदाज ठरला आहे.  गेल्या तीन वर्षापासून अश्विनने कसोटीमध्ये प्रत्येक वर्षी 50 बळी घेतले आहेत. असा पराक्रम कराणारा अश्वन जगातील तिसा तर भारताचा पहिलाच गोलंदाज ठरला आहे. अश्विनपूर्वी शेन वॉर्न (1993, 1994, 1995), मुथौया मुरलीधरन(2000, 2001, 2002) यांनी असा पराक्रम केला आहे. 

कोणत्याही भारतीय कर्णधाराच्या कॅप्टीन्सीखाली घेतल्या सर्वाधिक विकेट - 
कोहली-अश्विन जोडीनं तोडला हा विक्रम - 

अश्विनने आज आपल्या नावे आणखी एक अनोखा विक्रम केला आहे. त्यानं कोणत्याही भारतीय कर्णधाराची कॅप्टन्सीमध्ये सर्वाधिक विकेट घेतल्या आहेत. कोहलीच्या कर्णधारपदाखाली अश्विनने 181 विकेट घेतल्या आहेत. ज्या इतर भारतीय कप्तान-गोलंदाज जोडीपेक्षा आधिक आहेत. यापूर्वी हा विक्रम मोहम्मद अजहरुद्दीन -अनिल कुंबळे या जोडीवर होता मोहम्मद अजहरुद्दीनच्या कॅप्टन्सीमध्ये कुंबळेनं179 बळी घेतले होतो. तर भज्जीनं गांगुलीच्या कर्णधारपदाखाली 177 विकेट घेतल्या होत्या. त्याशिवाय कपिलदेवन गावसकरांच्या कर्णधारपदाखाली 172 बळी घेतले होते. 

नागपूर कसोटीत भारताचा विजय - 
भारताने श्रीलंकेविरूद्धच्या दुसऱ्या कसोटीमध्ये उत्कृष्ट फलंदाजीच्या जोरावर धावांचा डोंगर उभा केला. भारताने पहिल्या डावामध्ये 6 विकेट्सच्या मोबदल्यात 610 धावा करत 405 धावांची आघाडी घेतली. यानंतर आजच्या चौथ्या दिवशी याला उत्तर देताना लंकेचे फलंदाज पुन्हा अपयशी ठरले. भारताला प्रत्युत्तर देताना भोजन वेळेपर्यंत लंकेचे ८ फलंदाज अवघ्या 110 धावांवर माघारी परतले आहेत. लंकेचे फलंदाज रविंद्र जाडेजा, आर अश्विन, आणि ईशांत शर्माच्या गोलंदाजीवर आक्रमक खेळण्याच्या नादात बाद झाले. श्रीलंकेच्या एकाही फलंदाजाला दुसऱ्या डावात मोठी भागीदारी रचता आली नाही. लंकेकडून कर्णधार दिनेश चांडीमल वगळता एकाही फलंदाजाला मोठी खेळी करता आली नाही. चांडीमलने 61 धावा केल्या. भारताचा फिरकीपटूने आर.अश्विनने 4, जाडेजाने आणि इशांत शर्माने 2 तर उमेश यादवने 1 विकेट घेतली. लाहिरू गेमगेला माघारी धाडत अश्विनने कसोटी क्रिकेटमध्ये 300 बळी टिपले.

Web Title: R. Ashwin is the only bowler in the world, completed his triple hundred

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.