पप्पा, तू आता म्हातारा झालास; असं धोनीला झिव्हा म्हणते तेव्हा...

धोनीने केक कापल्यावर कुलदीप यादव आणि युजवेंद्र चहल यांनी त्याच्या चेहऱ्याला केक फासला. त्यावेळी धोनीची पत्नी साक्षी आणि झिवाही तिथे उपस्थित होत्या.

By ऑनलाइन लोकमत | Published: July 9, 2018 08:52 PM2018-07-09T20:52:26+5:302018-07-09T20:54:57+5:30

whatsapp join usJoin us
Pappa, you're old enough now; When Dhoni says to Zeev ... | पप्पा, तू आता म्हातारा झालास; असं धोनीला झिव्हा म्हणते तेव्हा...

पप्पा, तू आता म्हातारा झालास; असं धोनीला झिव्हा म्हणते तेव्हा...

whatsapp join usJoin usgoogleNewsNext
ठळक मुद्देधोनीच्या वाढदिवसाचा व्हिडीओ पाहा...

लंडन : भारताचा माजी कर्णधार आणि यष्टीरक्षक महेंद्रसिंग धोनीचा मैदानातील फिटनेस हा युवा खेळाडूंनाही लाजवणारा आहे. त्यामुळे तूझं आता वय झालं, असं म्हणण्याचं धाडस कुणीही करणार नाही. पण असंच काहीसं म्हटलं आहे ते धोनीच्या लाडक्या झिवानं. ' पप्पा, तू आता म्हातारा झालास ' असं चक्क झिवाने म्हटलं आहे, पण ते कधी आणि कुठे, ते तुम्हाला माहितेए का...

शनिवारी धोनीचा 37वा वाढदिवस होता. संघ सहकाऱ्यांनबरोबर त्याने आपला वाढदिवस सेलिब्रेट केला. यावेळी धोनीने केक कापल्यावर कुलदीप यादव आणि युजवेंद्र चहल यांनी त्याच्या चेहऱ्याला केक फासला. त्यावेळी धोनीची पत्नी साक्षी आणि झिवाही तिथे उपस्थित होत्या.

धोनीच्या वाढदिवसाचा व्हिडीओ पाहा...


धोनी केक कापत असताना, सारेच वाढदिवसाचं गाणं म्हणतं होते. त्यावेळी झिवाही धोनीसाठी गाणं म्हणतं होती. त्यानंतर झिवा धोनीला म्हणाली की, " पप्पा... तुला वाढदिवसाच्या शुभेच्छा, पण ती आता म्हातारा झालास..." 

Web Title: Pappa, you're old enough now; When Dhoni says to Zeev ...

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.