आता शांत बसणार नाही, युजवेंद्र चहल पाकिस्तानवर बरसला

आता आम्ही आपले जवान शहीद होण्याची वाट पाहत बसणार नाही - चहल

By ऑनलाइन लोकमत | Published: February 20, 2019 04:21 PM2019-02-20T16:21:22+5:302019-02-20T16:22:12+5:30

whatsapp join usJoin us
Now we will not be quiet, Yuviwendra Chahal's attack on Pakistan | आता शांत बसणार नाही, युजवेंद्र चहल पाकिस्तानवर बरसला

आता शांत बसणार नाही, युजवेंद्र चहल पाकिस्तानवर बरसला

whatsapp join usJoin usgoogleNewsNext

नवी दिल्ली : पुलवामा येथे गुरुवारी झालेल्या दहशतवादी हल्ल्यात 40 जवान शहीद झाले होते. त्यानंतर देशभरात दहशतवाद आणि पाकिस्तान यांच्याविरोधात संतापाची लाट उसळली आहे. भारताच्या क्रिकेटपटूंचाही राग आता अनावर झाला असून त्यांनी थेट युद्धाची भाषा केली आहे. भारताचा फिरकीपटू युजवेंद्र चहल, 'आता शांत बसणार नाही' असे म्हणत पाकिस्तानवर चांगलाच बरसला आहे.

चहल म्हणाला की, " आता भारत हे सर्व सहन करणार नाही, ते एकदाच संपायला हवं. भारतीय सीमेवर वारंवार दहशतवादी हल्ले होतात आणि त्यामध्ये आपले जवान मारले जातात. पण यापुढे असे होऊ नये, असे मला वाटते. कारण आपण बराच काळ चर्चा केली पण त्याचा काहीही उपयोग झालेला नाही. त्यामुळे चर्चेच्या माध्यमातून या गोष्टी सुधारतील, असे मला वाटत नाही. हा विषय आता कायमचा मिटवण्याची वेळ आली आहे."

चहल पुढे म्हणाला की, " दर तीन महिन्यांनी भारतामध्ये दहशतवादी हल्ले होत असतात. हे हल्ले कायमचे थांबायला हवेत. आता आम्ही आपले जवान शहीद होण्याची वाट पाहत बसणार नाही. त्यामुळे या प्रकरणाचा कायमचा छडा लावायला हवा." 

यापुढे शंभर शहीद जवानांच्या मुलांना मदत करणार - गौतम गंभीर
भारताचा माजी सलामीवीर गौतम गंभीरला आर्मीमध्ये जाता आले नाही, याचा आता पश्चाताप होत आहे. पण आर्मीमध्ये जाता आले नसले तरी शहीद जवानांच्या मुलांसाठी गंभीर आपल्या एनजीओच्या माध्यमातून कार्य करत आहे. गंभीरने जवानांच्या 50 मुलांना आपल्या संस्थेच्या माध्यमातून मदत केली होती. आता यापुढे शंभर जवानांच्या मुलांना मदत करत असल्याचे गंभीरने सांगितले. आर्मीमध्ये जाण्याबद्दल गंभीर म्हणाला की, " क्रिकेट हे माझे पहिले प्रेम कधीच नव्हते. मला आर्मीमध्ये जायचे होते. पण बारावीमध्ये असताना मी दिल्लीकडून रणजी क्रिकेट स्पर्धा खेळलो. माझी कामगिरी चांगली होत गेली. त्यामुळे मी क्रिकेटवर अधिक लक्ष दिले. " 

जवानांच्या मुलांना सेहवाग करणार शिक्षणासाठी मदत
या शहीद जवानांच्या मुलांच्या शिक्षणासाठी भारताचा माजी तडफदार फलंदाज वीरेंद्र सेहवाग पुढे आला आहे. या शहीद जवानांच्या मुलांचा शिक्षणाचा खर्च उचलण्याबाबत सेगवागने एक ट्विट केले आहे. सेहवागने आपल्या ट्विटमध्ये म्हटले आहे की, " शहीद जवानांसाठी आपण जेवढे करू तेवढे कमीच आहे. पण शहीद झालेले जे जवान आहेत त्यांच्या मुलांच्या शिक्षणाची काळजी मात्र आपण घेऊ शकतो. सेहवाग आंतरराष्ट्रीय शाळेमध्ये जर शहीद जवांनाच्या मुलांनी प्रवेश घेतला तर ते माझे सौभाग्य असेल. "

Web Title: Now we will not be quiet, Yuviwendra Chahal's attack on Pakistan

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.