बोल्टच्या हॅट्ट्रिकमुळे न्यूझीलंडची सरशी

ट्रेंट बोल्टने वन डे क्रिकेटमध्ये हॅट्ट्रिक नोंदविणारा तिसरा गोलंदाज होण्याचा मान मिळविला, त्याचवेळी बुधवारी झालेल्या पहिल्या सामन्यात पाकिस्तानवर ४७ धावांनी विजय नोंदवित न्यूझीलंडला मालिकेत १-० ने आघाडीदेखील मिळवून दिली.

By ऑनलाइन लोकमत | Published: November 9, 2018 02:03 AM2018-11-09T02:03:38+5:302018-11-09T02:03:56+5:30

whatsapp join usJoin us
New Zealand win the first ODI | बोल्टच्या हॅट्ट्रिकमुळे न्यूझीलंडची सरशी

बोल्टच्या हॅट्ट्रिकमुळे न्यूझीलंडची सरशी

whatsapp join usJoin usgoogleNewsNext

अबुधाबी : ट्रेंट बोल्टने वन डे क्रिकेटमध्ये हॅट्ट्रिक नोंदविणारा तिसरा गोलंदाज होण्याचा मान मिळविला, त्याचवेळी बुधवारी झालेल्या पहिल्या सामन्यात पाकिस्तानवर ४७ धावांनी विजय नोंदवित न्यूझीलंडला मालिकेत १-० ने आघाडीदेखील मिळवून दिली.
पाकला २६७ धावांचे लक्ष्य मिळाले होते. वेगवान गोलंदाज बोल्टने फटर जमा(१), बाबर आझम(००)आणि मोहम्मद हफीज(००) यांना बाद करीत ३ बाद ८ अशी अवस्था केली. या धक्क्यातून अखेरपर्यंत न सावरणाऱ्या पाकने ४७.२ षटकांत २१९ धावांत नांगी टाकली. बोल्टने ५४ धावांत तीन गडी बाद केले.
त्याआधी, न्यूझीलंडने नाणेफेक जिंकून फलंदाजी घेतली. अनुभवी रॉस टेलर(८०)आणि टॉम लॅथम(६८) यांच्या अर्धशकांच्या बळावर ८ बाद २६६ पर्यंत मजल गाठली.

Web Title: New Zealand win the first ODI

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.