स्वत:वर विश्वास ठेवण्यासाठी विजय आवश्यक - विराट कोहली

अन्य लोक ज्यावेळी संघाच्या क्षमतेवर अविश्वास व्यक्त करीत होते, त्यावेळी आमच्या खेळाडूंना स्वत:वर विश्वास होता. तिस-या कसोटी सामन्यातील विजय हा त्याचा परिणाम असल्याचे मत कर्णधार विराट कोहलीने व्यक्त केले.

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 29, 2018 01:49 AM2018-01-29T01:49:03+5:302018-01-29T01:49:27+5:30

whatsapp join usJoin us
 Need to win to believe in yourself - Virat Kohli | स्वत:वर विश्वास ठेवण्यासाठी विजय आवश्यक - विराट कोहली

स्वत:वर विश्वास ठेवण्यासाठी विजय आवश्यक - विराट कोहली

whatsapp join usJoin usgoogleNewsNext

जोहान्सबर्ग - अन्य लोक ज्यावेळी संघाच्या क्षमतेवर अविश्वास व्यक्त करीत होते, त्यावेळी आमच्या खेळाडूंना स्वत:वर विश्वास होता. तिस-या कसोटी सामन्यातील विजय हा त्याचा परिणाम असल्याचे मत कर्णधार विराट कोहलीने व्यक्त केले.
कोहली व संघास पहिल्या २ कसोटी सामन्यातील पराभवानंतर टीकेला सामोरे जावे लागले होते. वाँडररर्समध्ये भारताच्या ६३ धावांच्या विजयानंतर कोहली म्हणाला, ‘अनेक लोक आमच्यावर विश्वास ठेवत नव्हते; मात्र एक संघ म्हणून आमची भावना होती, आम्ही पहिल्या २ सामन्यात विजयाच्या अगदी जवळ होतो. दबावामध्ये चांगले प्रदर्शन केले तर विजय मिळवू शकतो, हे आम्हाला ठावूक होते. आम्ही या कसोटी सामन्यात हे सिद्ध करून दाखविले. हा विजय आमच्यासाठी महत्त्वाचा आहे. आम्ही हा सामना जिंकावा म्हणून प्रयत्नरत होतो.
आम्ही इतर लोकांसारखा विचार करीत नाही. ज्यावेळी गोष्टी अनुकूल असत नाहीत, त्यावेळी आम्ही असे करायला हवे असा विचार करीत नाही. असे करणे सोपे असते. मी कोणालाही काही म्हणू शकतो किंवा लिहू शकतो. एक संघ म्हणून स्वत:वर भरवसा ठेवतो. सुरुवातीपासूनच आम्ही असे केले होते. आमच्या संघावर खूप विश्वास आहे.’
तिसºया कसोटीतील विजय हा मैलाचा दगड ठरू शकतो. पहिल्या दोन सामन्यात स्थिती आम्हाला अनुकूल नव्हती. आम्ही निराश होतो. कोणत्याही स्थितीत कसोटी सामने जिंकण्याची आमच्याकडे क्षमता आहे. आम्ही काही सामने गमावले आहेत; मात्र काही जिंकलेसुद्धा आहेत. एक संघ म्हणून आम्ही हा दिवस लक्षात ठेवू.

कोहली म्हणाला, ‘आम्ही या सामन्यात त्यांच्यापेक्षा अधिक चांगली गोलंदाजी आणि फलंदाजी केली. डीन एल्गर आणि हाशिम अमला यांनी दुसºया जोडीसाठी ११९ धावांची भागीदारी रचली. एका क्षणी दक्षिण आफ्रिकेचा धावफलक १ बाद १२४ असा होता. त्यानंतर दक्षिण आफ्रिकेचा डाव कोसळला. (वृत्तसंस्था)

अंतिम कसोटी सामना रद्द करायला हवा होता : एल्गर

भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यादरम्यान खेळण्यात आलेल्या तिसºया कसोटी सामन्यात चेंडू असमानपद्धतीने उसळत असल्याने खेळपट्टी खेळण्यास लायक नव्हती. त्यामुळे हा सामना रद्द करावयास हवा होता, असे मत तिसºया कसोटीतील चौथ्या डावात नाबाद ८६ धावा करणाºया सलामीवीर डीन एल्गरने म्हटले.
तिसºया दिवशी द. आफ्रिकेच्या डावातील नवव्या षटकात चेंडू एल्गरच्या हेल्मेटवर आदळला. त्यामुळे सामना अधिकाºयांनी खेळ थांबविला; मात्र दुसºया दिवशी पंच आणि दोन्ही कर्णधारांच्या चर्चेनंतर सामना खेळविण्यात आला.
एल्गर म्हणाला, मी खेळ थांबविण्याबाबत विचार केला. तिसºया दिवशी खेळपट्टी चांगली नव्हती. फलंदाजांना जखमी व्हावे लागले. हा सामना लवकर रद्द करावयास हवा होता.
नोव्हेंबर २०१४ साली चेंडू डोक्यात लागल्याने आॅस्ट्रेलियाचा फलंदाज फिल ह्यूजच्या झालेल्या मृत्यूकडे इशारा करताना एल्गर म्हणाला, आॅस्ट्रेलियाप्रमाणे इथेही अशी घटना घडली असती. लोक कसोटी सामने पाहू इच्छितात. आम्ही देखील माणूस आहोत. आम्ही जखमी व्हावे, हे स्वीकारार्ह नाही. ही स्थिती लवकर संपवायला हवी होती. यापूर्वीही मी वेगवान गोलंदाजांचा सामना केला आहे. वांडररर्सच्या खेळपट्टीवर चेंडू उसळतो, हे मला माहितीय; मात्र असा अनुभव यापूर्वी आला नव्हता. यामुळे पंचांच्या मनात देखील शंका होती.’ (वृत्तसंस्था)

Web Title:  Need to win to believe in yourself - Virat Kohli

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.