धोनीने केला बॅटमध्ये बदल आणि पडायला लागला धावांचा पाऊस

त्यानंतर धोनीने अशी एक आयडिया केली की, तो धावांचा धनी ठरायला लागला.

By ऑनलाइन लोकमत | Published: February 13, 2019 06:13 PM2019-02-13T18:13:24+5:302019-02-13T19:09:28+5:30

whatsapp join usJoin us
ms Dhoni is a rich in runs, but this idea was done by mahi... | धोनीने केला बॅटमध्ये बदल आणि पडायला लागला धावांचा पाऊस

धोनीने केला बॅटमध्ये बदल आणि पडायला लागला धावांचा पाऊस

whatsapp join usJoin usgoogleNewsNext
ठळक मुद्देधोनीने नेमकी काय आयडिया लढवलीधोनीच्या नावावर बरेच विक्रम

नवी दिल्ली : भारतीय संघाचा माजी कर्णधार एम एस धोनीनं 2019 ची दणक्यात सुरुवात केली. ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या वन डे मालिकेत सलग तीन अर्धशतक, सामनावीरचा पुरस्कार आणि त्यानंतर न्यूझीलंड मालिकेत फटकेबाजी करत धोनीनं टीकाकारांची बोलती बंद केली. पण या दौऱ्यापूर्वी धोनीच्या धावा आटल्या होत्या. त्यानंतर धोनीने अशी एक आयडिया केली की, तो धावांचा धनी ठरायला लागला.

धोनीने नेमकी काय आयडिया लढवली
धोनीला फक्त चांगले क्रिकेट कळते असे नाही, तर क्रिकेटच्या साधनांबद्दलही त्याला चांगली माहिती आहे. धावा कमी होत असताना धोनीने आपल्या बॅटवर एक प्रयोग केला. धोनीने आपल्या बॅटचा तळ बदलला. धोनीने बॅटचा तळ गोलाकार केला आणि त्यानंतर तो ऑस्ट्रेलियाच्या दौऱ्यावर गेल्या. या प्रयोगानंतर धोनीच्या धावाही चांगल्याच वाढल्याचे पाहायला मिळाले.

धोनीच्या नावावर बरेच विक्रम
धोनीच्या नावे असंख्य विक्रम आहेत. भारताला आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेच्या ( आयसीसी) तीनही महत्त्वाच्या स्पर्धा जिंकून देण्याचा विक्रम धोनीच्या नावावर आहे. ऑस्ट्रेलियाविरुद्ध तीन सामने खेळल्यात धोनीच्या नावावर आणखी एक विक्रम नोंदवला जाईल. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सर्वाधिक सामने खेळणारा यष्टिरक्षक म्हणून धोनीच्या नावे विक्रम नोंदवला जाणार आहे. बाऊचरच्या नावावर 596 आंतरराष्ट्रीय सामने आहेत, तर धोनी ( 594) दोन सामन्यांच्या पिछाडीने दुसऱ्या स्थानावर आहे. या विक्रमात श्रीलंकेचा कुमार संगकारा ( 499) आणि ऑस्ट्रेलियाचा अॅडम गिलख्रिस्ट ( 485) अनुक्रमे तिसऱ्या व चौथ्या क्रमांकावर आहेत.


'भारताला वर्ल्ड कप जिंकायचाय, तर महेंद्रसिंग धोनी संघात हवाच'
इंग्लंडमध्ये होणाऱ्या वर्ल्ड कप स्पर्धेत महेंद्रसिंग धोनी हा भारतीय संघाचा हुकूमी एक्का आहे. भारतीय संघाचे निवड समिती प्रमुख एमएसके प्रसाद यांनीही धोनीचे महत्त्व सांगितले आहे आणि वर्ल्ड कप स्पर्धेत त्याचे स्थान भक्कम असल्याचे प्रसाद यांनी स्पष्ट केले. श्रीलंकेचा दिग्गज फलंदाज कुमार संगकारानेही भारताला वर्ल्ड कप जिंकायचा असेल, तर कॅप्टन कूल धोनी संघात हवाच, असे स्पष्ट मत व्यक्त केले. धोनीचा अनुभव हा कर्णधार विराट कोहलीला फायद्याचा ठरणार असल्याचेही संगकारा म्हणाला.

Web Title: ms Dhoni is a rich in runs, but this idea was done by mahi...

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.