लोकेश राहुलने सोडवला चौथ्या क्रमांकाचा तिढा

गेल्या अनेक महिन्यांपासून सुरु असलेल्या चौथ्या क्रमांकाचा प्रश्न अखेर लोकेश राहुलने सोडवला.

By ऑनलाइन लोकमत | Published: May 29, 2019 04:08 AM2019-05-29T04:08:57+5:302019-05-29T04:09:04+5:30

whatsapp join usJoin us
 Lokesh Rahul, the fourth highest paid figure | लोकेश राहुलने सोडवला चौथ्या क्रमांकाचा तिढा

लोकेश राहुलने सोडवला चौथ्या क्रमांकाचा तिढा

whatsapp join usJoin usgoogleNewsNext

कार्डिफ : गेल्या अनेक महिन्यांपासून सुरु असलेल्या चौथ्या क्रमांकाचा प्रश्न अखेर लोकेश राहुलने सोडवला. बांगलादेशविरुद्धच्या दुसऱ्या सराव सामन्यात प्रमुख फलंदाज अपयशी ठरल्यानंतर राहुलने चौथ्या क्रमांकावर खेळताना शानदार शतकी खेळी केली. महेंद्रसिंग धोनीनेही तडाखेबंद शतक झळकावत मधल्या फळीत निर्णायक भूमिका निभावली. या दोघांच्या मोलाच्या योगदानानंतर गोलंदाजांनी केलेल्या अचूक माºयाच्या जोरावर भारताने बांगलादेशला ९५ धावांनी नमविले.
प्रथम फलंदाजी करताना भारताने अडखळत्या सुरुवातीनंतरही ५० षटकात ७ बाद ३५९ धावांचा डोंगर उभारला. रोहित शर्मा, शिखर धवन आणि कर्णधार विराट कोहली अपेक्षित कामगिरी करण्यात अपयशी ठरल्यानंतर राहुल-धोनी यांनी पाचव्या गड्यासाठी १६९ धावांची भागीदारी करत भारताला मजबूत स्थितीत आणले. या भल्यामोठ्या आव्हानाचा पाठलाग करताना बांगलादेशचा डाव ४९.३ षटकात २६४ धावांवर गुंडाळण्यात भारतीयांना यश आले. कुलदीप यादवने ४७ धावांत ३ बळी घेत बांगलादेशची मधली फळी कापून काढली. युझवेंद्र चहलनेही ५५ धावांत ३ बळी घेत चांगला मारा केला. जसप्रीत बुमराहने २५ धावांत २ बळी घेत बांगलादेशला सुरुवातीला मोठे धक्के दिले.
सलामीवीर लिट्टन दासने ९० चेंडूत १० चौकारांसह ७३ धावांची, तर मुशफिकुर रहिमने ९४ चेंडूत ८ चौकार व २ षटकारांसह ९० धावांची झुंजार खेळी केली. मात्र इतर फलंदाज भारतीय माºयापुढे तग धरु शकले नाही. दोघांनी तिसºया गड्यासाठी १२० धावांची भागीदारी केल्याने बांगलादेशने २ बाद ४९ धावांवरुन २ बाद १६९ असे पुनरागमन केले. मात्र, लिट्टन बाद झाल्यानंतर बांगलादेशच्या डावाला गळती लागली.
तत्पूर्वी, राहुलने शतक झळकावत फलंदाजी क्रमवारीमध्ये नंबर चारवर आपला दावा मजबूत केला, तर महेंद्रसिंग धोनीने आक्रमक शतक ठोकले. राहुलने ९९ चेंडूत १२ चौकार व ४ षटकारांच्या मदतीने १०८ धावांची खेळी केली, तर धोनीने ७८ चेंडूंमध्ये ११३ धावा केल्या. त्यात ८ चौकार व ७ षटकारांचा समावेश आहे. या दोघांनी पाचव्या विकेटसाठी १६४ धावांची भागीदारी करीत, भारताला ४ बाद १०२ अशा स्थितीतून सावरले. भारतासाठी शिखर धवन (१), रोहित शर्मा (१९) व विराट कोहली (४७) यांचे सलग दुसºया सामन्यातील अपयश चिंतेचा विषय ठरू शकते. पण राहुलने चौथ्या क्रमांकावरील फलंदाजाची समस्या जवळपास संपविली आहे.
विश्वचषक स्पर्धेत भारतीय संघासाठी चौथ्या क्रमांकावर कोण फलंदाजी करणार? याबाबत संघनिवडीपासून चर्चा सुरू होती. राहुलला दोन्ही सराव सामन्यांत चौथ्या क्रमांकावर फलंदाजीला पाठविताना कोहलीने स्पष्ट संकेत दिले की, या महत्त्वाच्या स्थानासाठी त्याची प्रथम पसंती कुणाला आहे. राहुलने कर्णधाराचा विश्वास सार्थ ठरविताना नैसर्गिक फलंदाजी करीत पूल, कट व कव्हर ड्राईव्हचे शानदार फटके लगावले.
या सामन्यात लक्षवेधी राहिला तो धोनी. त्याने सुरुवातीपासून गोलंदाजांवर वर्चस्व गाजवले. फिरकीपटूंविरुद्ध त्याने पुढे सरसावत आकर्षक फटके लगावताना आपल्या पॉवर हिटिंगनेही प्रभावित केले. धोनीने अबू जायदच्या गोलंदाजीवर सहावा षटकार ठोकत केवळ ७३ चेंडूत शतक पूर्ण केले. (वृत्तसंस्था)
>चिंता त्रिमूर्तीच्या अपयशाची
विश्वचषक स्पर्धेतील संभाव्य विजेत्यांमधील आघाडीचा संघ म्हणून सहभागी झालेल्या भारताचे आघाडीचे फलंदाज सलग दुसºया सराव सामन्यात अपयशी ठरले. यामुळे भारतीय संघाच्या विश्वचषक मोहिमेला मोठा धक्का मानले जात आहे. ५ जूनपासून भारताच्या विश्वचषक मोहिमेला सुरुवात होईल, मात्र रोहित शर्मा, शिखर धवन आणि कर्णधार विराट कोहली या त्रिमूर्तीला त्यावेळी आपल्या लौकिकानुसार खेळ करावाच लागेल.
संक्षिप्त धावफलक
भारत : ५० षटकात ७ बाद ३५९ धावा (महेंद्रसिंग धोनी ११३, लोकेश राहुल १०८, विराट कोहली ४७; शाकिब अल हसन २/५८, रुबेल हसन २/६२.) वि.वि. बांगलादेश : ४९.३ षटकात सर्वबाद २६४ धावा (मुशफिकुर रहिम ९०, लिट्टन दास ७३; कुलदीप यादव ३/४७, युझवेंद्र चहल ३/५५.).

Web Title:  Lokesh Rahul, the fourth highest paid figure

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.