अखेर योग्य दिशेने उचलले पाऊल

शेवटी आरसीबीला मोहालीमध्ये अपेक्षित निकाल मिळाला. किंग्स इलेव्हन पंजाबने या लढतीपूर्वी आपल्या गृहमैदानावर सलग सात सामने जिंकले होते

By ऑनलाइन लोकमत | Published: April 15, 2019 04:23 AM2019-04-15T04:23:25+5:302019-04-15T04:23:42+5:30

whatsapp join usJoin us
The last step taken in the right direction | अखेर योग्य दिशेने उचलले पाऊल

अखेर योग्य दिशेने उचलले पाऊल

whatsapp join usJoin usgoogleNewsNext

- एबी डिव्हिलियर्स लिहितात...
शेवटी आरसीबीला मोहालीमध्ये अपेक्षित निकाल मिळाला. किंग्स इलेव्हन पंजाबने या लढतीपूर्वी आपल्या गृहमैदानावर सलग सात सामने जिंकले होते आणि आमच्यावर या मोसमातील सलग सातव्या पराभवाचे सावट होते. आकडे आमच्यासोबत नव्हते, पण अखेरच्या षटकापर्यंत रंगलेल्या लढतीत ज्यांच्या चेहऱ्यावर हास्य फुलले तो आमचा संघ होता.
आयपीएलमध्ये यंदाच्या मोसमात रंगतदार लढती झाल्या, यात कुठली शंका नाही. सर्व लढतींत स्टेडियममध्ये चाहत्यांनी गर्दी केली होती. आपला दिवस असेल त्या दिवशी कुठल्याही संघाला पराभूत करू शकतो, हे सर्व आठही संघांनी सिद्ध केले आहे. टी२० क्रिकेटमध्ये या पातळीवर एवढे महान खेळाडू मैदानावर छाप सोडत असताना जय-पराजयातील अंतर फार थोडे असते. अनेकदा एक सुटलेला झेल, एक षटकार किंवा एक यॉर्कर पराभवाचे रुपांतर विजयामध्ये करतो.
आरसीबीने सलग सहा सामने गमावले असले, तरी खरे बघता यातील तीन सामने आम्ही सहज जिंकू शकलो असतो. मोहालीमध्ये आम्ही दोन गुण मिळवले, पण खरे बघता पंजाबने या लढतीत चांगली टक्कर देत सामन्याच्या १९ व्या षटकांत आमच्यापुढे अडचण निर्माण केली. समर्थक आणि मीडियामध्ये प्रतिक्रिया उमटणे समजण्यासारखे आहे. विजयी संघाची मान उंचावते तर पराभूत संघाला टीकेला सामोरे जावे लागते. एक खेळाडू म्हणून आमच्यापुढे आव्हान असेल तर खेळाचा आदर राखत विजयासाठी आवश्यक ते सर्व प्रयत्न करणे गरजेचे असते. कसून मेहनत घेतली तर परिस्थिती बदलते. शनिवारी आम्ही योग्य दिशेने एक पाऊल टाकले. कारण आमच्या गोलंदाजांनी मधल्या षटकांमध्ये पंजाबच्या फलंदाजांना फटकेबाजी करण्यापासून रोखले. त्याचसोबत संघाच्या क्षेत्ररक्षणामध्येही थोडी सुधारणा झाली आणि फलंदाजांनीही इच्छाशक्ती दर्शवली. कठीण समयी आम्ही एकत्रपणे संघ म्हणून उभे राहिलो. एकसंघ राहिल्याचे आम्हाला फळ मिळाले. स्पर्धेतील आव्हान कायम राखण्याच्या लढाईमध्ये आम्ही लय कायम राखू अशी आशा अहे. डेल स्टेन या आठवड्यात संघासोबत जुळला. स्टेन व मी कसोटी व प्रथम श्रेणी क्रिकेटमध्ये एकत्र पदार्पण करण्याच्या घटनेला १५ वर्षांचा कालावधी लोटला आहे. या कालावधीत आम्ही कसून मेहनत करणे आणि मोक्याच्या क्षणी चांगली कामगिरी करण्याचे कौशल्य आत्मसात केले. ती वेळ रोमांचक होती. आमची पुढची लढत सोमवारी मुंबई इंडियन्सविरुद्ध होईल.

Web Title: The last step taken in the right direction

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.