सव्वादोन तासात संपूर्ण संघ तंबूत, 78 धावांचे आव्हानही झेपले नाही

कसोटी क्रिकेटमध्ये अशक्य असे काहीच नाही... लंडनमध्ये त्याची प्रचिती येत आहे. याचा भारत आणि इंग्लंड यांच्या मालिकेशी काही संबंध नाही. येथे सुरू असलेल्या कौंटी क्रिकेटमध्ये गुरुवारी एक अशक्य गोष्ट घडली.

By ऑनलाइन लोकमत | Published: September 6, 2018 11:02 AM2018-09-06T11:02:16+5:302018-09-06T11:06:30+5:30

whatsapp join usJoin us
Lancashire snatch tie with Somerset in County Championship thriller | सव्वादोन तासात संपूर्ण संघ तंबूत, 78 धावांचे आव्हानही झेपले नाही

सव्वादोन तासात संपूर्ण संघ तंबूत, 78 धावांचे आव्हानही झेपले नाही

whatsapp join usJoin usgoogleNewsNext

लंडन, कौंटी क्रिकेटः कसोटी क्रिकेटमध्ये अशक्य असे काहीच नाही... लंडनमध्ये त्याची प्रचिती येत आहे. याचा भारत आणि इंग्लंड यांच्या मालिकेशी काही संबंध नाही. येथे सुरू असलेल्या कौंटी क्रिकेटमध्ये गुरुवारी एक अशक्य गोष्ट घडली. विजयासाठीचे 78 धावांच्या माफक लक्ष्याचा पाठलाग करणारा संपूर्ण संघ अवघ्या सव्वादोन तासांत माघारी परतला. या सामन्यातील रंगत येथेच संपत नाही, असे होऊनही सामन्याचा निकाल अनिर्णीत राहिला हे विशेष...


 
इंग्लंडमध्ये खेळवण्यात येणाऱ्या कौंटी अजिंक्यपद स्पर्धेच्या पहिल्या विभागीय लढतीत लँकशायर आणि सोमरसेट यांच्यातील हा सामना. लँकशायरचा दुसरा डाव अवघ्या 170 धावांत गुंडाळल्यावर सोमरसेट संघासमोर विजयासाठी अवघ्या 78 धावांचे लक्ष्य होते. सोमरसेट ते सहज पार करेल असे वाटत होते, परंतु प्रत्यक्षात जे झाले त्याने सर्वांना धक्का बसला. फिरकीपटू केशव महाराजने सोमरसेटच्या सात फलंदाजांना झटपट बाद केले आणि उरलेली कसर ग्रॅहम ओनिओन्सने ( 3/28) भरून काढली. विजयासाठी अवघी एक धाव हवी असताना महाराजने जॅक लिचला झेलबाद केले आणि सामना अनिर्णीत सुटला. पाहा हा व्हिडीओ.. 

Web Title: Lancashire snatch tie with Somerset in County Championship thriller

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.