आपला तो धवन आणि दुसऱ्याचा तो रोहित

काही जणांना मयांकला संघात स्थान मिळायला हवे होते, असे वाटत आहे. पण संघातील कोणत्या खेळाडूला त्यासाठी विश्रांती द्यायची, असे विचारल्यावर बऱ्याच जणांनी धवनचे नाव सांगितले आहे. पण या लोकांना धवनला विश्रांती द्यावी, असे का वाटते? असे काही प्रश्न गावस्कर यांनी उपस्थित केले आहेत.

By ऑनलाइन लोकमत | Published: March 5, 2018 01:34 PM2018-03-05T13:34:05+5:302018-03-05T13:34:05+5:30

whatsapp join usJoin us
It is our Dhawan and the second one is Rohit | आपला तो धवन आणि दुसऱ्याचा तो रोहित

आपला तो धवन आणि दुसऱ्याचा तो रोहित

whatsapp join usJoin usgoogleNewsNext
ठळक मुद्देमुंबईच्याच खेळाडूच्या निवडीवर बरसले सुनिल गावस्कर

नवी दिल्ली : चांगली कामगिरी केल्यावर काही खेळाडूंना बाहेरचा रस्ता दाखवला जातो, पण काही खेळाडूंवर मात्र निवड समिती मर्जी असते, अशी टीका भारताचे माजी महान क्रिकेटपटू आणि समालोचक सुनील गावस्कर यांनी केली आहे.
मंगळवारपासून श्रीलंकेमध्ये तिरंगी ट्वेन्टी-20 क्रिकेट मालिकेला सुरुवात होणार आहे. या मालिकेसाठी संघातील काही अनुभवी खेळाडूंनी विश्रांती दिली आहे, तर काही युवा खेळाडूंना संधी देण्यात आली आहे. या मालिकेसाठी संघ निवड करत असताना स्थानिक क्रिकेटमध्ये चांगली कामगिरी केल्यावरही मयांक अगरवालला संधी देण्यात आली नाही. निवड समितीच्या या निर्णयावर काही जणांनी टीका केली आहे. मयांकला संघात स्थान देण्यासाठी शिखर धवनला विश्रांती द्यायला हवी, असे मत काही जणांनी व्यक केले. हे सारे ऐकल्यावर गावस्करांचा पारा मात्र चांगलाच चढलेला पाहायला मिळाला आणि आपल्या स्तंभात त्यांनी आपल्या भावनेला वाट मोकळी करून दिली.
दक्षिण आफ्रिकेच्या कठिण दैाऱ्यानंतर काही खेळाडूंना विश्रांती देण्याचा निर्णय मी समजू शकतो. काही जणांना मयांकला संघात स्थान मिळायला हवे होते, असे वाटत आहे. पण संघातील कोणत्या खेळाडूला त्यासाठी विश्रांती द्यायची, असे विचारल्यावर बऱ्याच जणांनी धवनचे नाव सांगितले आहे. पण या लोकांना धवनला विश्रांती द्यावी, असे का वाटते?  रोहित शर्माला का विश्रांती द्यायला नको? असे काही प्रश्न गावस्कर यांनी उपस्थित केले आहेत.
ते आपल्या स्तंभात पुढे म्हणतात की, दक्षिण आफ्रिकेच्या दैाऱ्यात रोहित हा धवनपेक्षा जास्त सामने खेळला आहे. त्यामुळे खरे तर रोहितला विश्रांती द्यायला हवी. पण जेव्हा संघातून बाहेर काढण्याची गोष्ट येते तेव्हा शिखरचेच नाव अग्रस्थानी असते.
यावेळी धवनची बाजू गावस्कर यांनी घेतल्याचे दिसते, पण त्यासाठी रोहितबाबत वक्तव्य करण्याची कोणतीही गरज नसल्याची चर्चा क्रिकेट वर्तुळात सुरु आहे. त्यामुळे आपला तो धवन आणि दुसऱ्याचा तो रोहित, असे गावस्कर करत असल्याचे काही क्रिकेटप्रेमींना वाटत आहे.

Web Title: It is our Dhawan and the second one is Rohit

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.