IPL 2019 : शिखर धवन झाला असा बाद... 'ही' सुपर कॅच तुम्ही पाहायलाच हवी

हा आपल्याला चौकार मिळेल, असे धवनला वाटत होता.

By ऑनलाइन लोकमत | Published: April 7, 2019 06:37 PM2019-04-07T18:37:25+5:302019-04-07T18:38:26+5:30

whatsapp join usJoin us
IPL 2019: You should see this super catch, Shikhar Dhawan out | IPL 2019 : शिखर धवन झाला असा बाद... 'ही' सुपर कॅच तुम्ही पाहायलाच हवी

IPL 2019 : शिखर धवन झाला असा बाद... 'ही' सुपर कॅच तुम्ही पाहायलाच हवी

whatsapp join usJoin usgoogleNewsNext

चेन्नई, आयपीएल 2019:  रॉयल चॅलेंजर बंगळुरूविरुद्धच्या सामन्यात दिल्ली कॅपिटल्सचा सलामीवीर शिखर धवन पहिल्याच चेंडूवर बाद झाला. धवनला आपेल खातेही उघडता आले नाही. पण बाद झाल्यावर धवनला त्यावर विश्वास बसला नाही. कारण त्याचा पकडलेला झेल हा अविश्वसनीय असाच होता.

टीम साऊथी गोलंदाजी पहिलेच षटक टाकत होता. या पहिल्या षटकाच्या तिसऱ्या चेंडूवर साऊथीचा सामना धवन करत होता. धवनचा हा सामन्यातील पहिलाच चेंडू होता. यावेळी साऊथीने वेगवान मारा केला. चेंडू ऑफ साइडला तटवण्याचा प्रयत्न धवनने केला. हा आपल्याला चौकार मिळेल, असे धवनला वाटत होता. पण नवदीप सैनीने यावेळी सुपर कॅच पकडली आणि धवनला तंबूचा रस्ता दाखवला.



 

रॉयल चॅलेंजर बंगळुरूविरुद्धच्या सामन्यात चार विकेट्स घेत दिल्ली कॅपिटल्सच्या कागिसो रबाडाने पर्पल कॅप पटकावली आहे. या सामन्यात रबाडाने 21 धावांत चार विकेट्स मिळवल्या. आतापर्यंत सर्वाधिक 11 विकेट्स मिळवत रबाडाने पर्पल कॅप पटकावली आहे. यापूर्वी बंगळुरुच्या युजवेंद्र चहलकडे पर्पल कॅप होती. त्याच्या नावावर सामन्यापूर्वी 9 विकेट्स होत्या. पण रबाडाने चार विकेट्स पटकावत पर्पल कॅप आपल्या नावावर केली आहे.

रॉयल चॅलेंजर बंगळुरूच्या मात्तबर फलंदाजांना पुन्हा एकदा अपयश आल्याचे पाहायला मिळाले. आयपीएलमधील दिल्ली कॅपिटल्सविरुद्धच्या सामन्यात कर्णधार विराट कोहली वगळता अन्य फलंदाजांना मोठी खेळी साकारता आली नाही. कोहलीनेही 41 धावा करण्यासाठी 33 चेंडूंचा सामना केला. बंगळुरूने निर्धारीत 20 षटकांत 8 बाद 149 धावा केल्या आहेत. कागिसो रबाडाने सर्वाधिक विकेट घेतल्या. त्याने एकाच षटकात बंगळुरूच्या तीन फलंदाजांना माघारी पाठवले.  

सलग पाच सामन्यांची पराभवाची मालिका खंडित करण्यासाठी मैदानावर उतरलेल्या रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू संघाची सुरुवात फार चांगली झाली नाही. पण, कोहली व मार्कस स्टॉइनिसने संयमी खेळ केला. या दोघांनी पहिल्या 10 षटकांत 2 बाद 64 धावांपर्यंत संघाला मजल मारून दिली. 11व्या षटकाच्या अखेरच्या चेंडूवर अक्षर पटेलने ही जोडी फोडली. त्याने स्टॉइनिसला 15 धावांवर माघारी पाठवले. पण, त्यानंतरच्या अक्षरच्या षटकात मोइन अली व कोहलीनं 11 धावा चोपल्या. 14व्या षटकाच्या तिसऱ्या चेंडूवर अलीने डीप पॉईंटच्या दिशेने चेंडू मारला आणि दोन धाव घेतल्या. दुसरी धाव घेत असताना रिषभ पंतने अलीला धावबाद करण्यासाठी महेंद्रसिंग धोनीच्या स्टाइलची कॉपी केली. पण, त्याचा चेंडू स्टम्पच्या जळपासही जाऊ शकला नाही. इशांत शर्माच्या त्या षटकात बंगळुरूने 14 धावा काढल्या. अलीने 15व्या षटकात संदीप लामिचानेच्या पहिल्याच चेंडूवर खणखणीत षटकार खेचून बंगळुरूला शतकी वेस ओलांडून दिली. पण, पुन्हा पुढे जाऊन फटका मारण्याचा मोह त्याला आवरता आला नाही आणि रिषभ पंतने त्याला यष्टिचीत केले. अलीने 18 चेंडूंत 1 चौकार व 3 षटकारांसह 32 धावा केल्या. 

पण, पुढच्याच षटकाच्या पहिल्याच चेंडूवर तो कागिसो रबाडाच्या गोलंदाजीवर श्रेयस अय्यरच्या हातात झेल देऊन माघारी परतला. कोहलीने 33 चेंडूंत 41 धावा केल्या. त्यात 1 चौकार व 2 षटकारांचा समावेश होता. त्याच षटकात तिसऱ्या चेंडूवर अक्षदीप नाथही ( 19) माघारी परतला. अखेरच्या चेंडूवर पवन नेगीही बाद झाला. त्यानंतर बंगळुरूला फार धावा जोडता आल्या नाही. मोहम्मद सिराज विचित्र पद्धतीने बाद झाला. 

Web Title: IPL 2019: You should see this super catch, Shikhar Dhawan out

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.