IPL 2019 : पराभवानंतर विराट कोहलीने घेतली खेळाडूंची 'शाळा' 

कोहलीने मैदानातच खेळाडूंची शाळा घेतल्याचे पाहायला मिळाले.

By ऑनलाइन लोकमत | Published: April 6, 2019 07:05 PM2019-04-06T19:05:12+5:302019-04-06T19:11:11+5:30

whatsapp join usJoin us
IPL 2019: Virat Kohli slams bowlers after defeat | IPL 2019 : पराभवानंतर विराट कोहलीने घेतली खेळाडूंची 'शाळा' 

IPL 2019 : पराभवानंतर विराट कोहलीने घेतली खेळाडूंची 'शाळा' 

whatsapp join usJoin usgoogleNewsNext

आयपीएल 2019 : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा कर्णधार विराट कोहली सध्या निराशेच्या गर्तेत अडकल्याचे दिसत आहे. आयपीएलमधल्या आतापर्यंतच्या पाच सामन्यांमध्ये बंगळुरुला एकही विजय मिळवता आलेला नाही. या पाच पराभवांमुळे बंगळरुचा संघ गुणतालिकेच तळाला आहे. शुक्रवारी झालेला विजयाचा घास आंद्रे रसेलने बंगळुरुकडून हिरावला. या पराभवानंतर कोहलीने संघातील खेळाडूंची शाळा घेतल्याचे पाहायला मिळाले.

बंगळुरूचा संघ कोलकाताविरुद्धचा सामना जिंकेल, असे सर्वांना वाटत होते. पण अखेरच्या चार षटकांमध्ये सामना फिरला. या सामन्यानंतर कोहली चांगलाच वैतागलेला पाहायला मिळाला. सामन्यानंतर सर्वांसमोर कोहलीने मैदानातच खेळाडूंची शाळा घेतल्याचे पाहायला मिळाले.

कोहली म्हणाला की, " कोणत्याही संघासाठी ही पचनी पडणारी गोष्ट नाही. आम्ही चार षटकांमध्ये 75 धावा गमावल्या. जर अशा गोष्टी घडत राहील्या तर कितीही धावा केल्या तरी विजय मिळेल, याची शाश्वती वाटत नाही. आता बोलून काहीही फरक पडणार नाही. कारण आता या गोष्टीमध्ये कोणताही बदल होऊ शकत नाही. ''

पाचव्या प्रयत्नातही विराट अपयशी; आंद्रे रसेलने तोंडचा घास पळवला

कर्णधार विराट कोहली, एबी डिव्हिलियर्स आणि पार्थिव पटेल यांच्या खेळीच्या जोरावर रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू संघाने 205 धावा कुटल्या. पण कोलकाता नाइट रायडर्सने कोहलीला तणावात ठेवले होते. पवन नेगीने बंगळुरुच्या कर्णधाराचे टेंशन कमी केले, परंतु अन्य गोलंदाजांकडून त्याला योग्य साथ मिळाली नाही.  आंद्रे रसेलने पुन्हा एकदा फिनिशरची भूमिका पार पाडली. त्याच्या फतकेबाजीच्या जोरावर कोलकाताने 5 विकेट राखून सामना जिंकला. रसेलने 13 चेंडूंत 7 षटकार आणि 1 चौकार खेचून 48* धावा केल्या. 

बंगळुरूने शुक्रवारी सलग चार सामन्यांत झालेल्या पराभवाचा राग कोलकातावर काढला. इंडियन प्रीमिअर लीगच्या या सामन्यात बंगळुरूच्या फलंदाजांनी जोरदार फटकेबाजी केली. कोहलीनं विक्रमांचे डोंगर उभे केले. त्याला पार्थिव पटेल व एबी डिव्हिलियर्स यांची उत्तम साथ लाभली. बंगळुरूने निर्धारीत 20 षटकांत 3 बाद 205  धावा केल्या. 

17 वी धाव घेताच कोहलीनं ट्वेंटी-20 क्रिकेटमध्ये 8000 धावांचा पल्ला पार केला. अशी कामगिरी करणारा तो ख्रिस गेल नंतर दुसरा सर्वात युवा फलंदाज ठरला आहे. त्याने 30 वर्षे व 151 दिवसांत त्याने हा पल्ला गाठला. ट्वेंटी-20त 8000 धावा करणारा कोहली हा सातवा फलंदाज आहे आणि सुरेश रैनानंतर दुसरा भारतीय फलंदाज आहे. नीतीश राणाने कोलकाताला पहिले यश मिळवून दिले. त्याने पटेलला 25 धावांवर पायचीत केले. पटेलने 24 चेंडूंत 3 चौकारांच्या मदतीने 25 धावा केल्या होत्या. 

कोहली आणि डिव्हिलियर्स या जोडीनंही दुसऱ्या विकेटसाठी शतकी भागीदारी केली. कोहली आणि डिव्हिलियर्स या जोडीनं बंगळुरूला मोठी धावसंख्या गाठून दिली. आयपीएलमध्ये सर्वाधिक शतकी भागीदारी करणाऱ्या खेळाडूंमध्ये या दोघांनी आघाडी मिळवली. कोहली व डिव्हिलियर्स यांच्यात 9 शतकी भागीदारी झाल्या आहेत. कुलदीप यादवने 18 व्या षटकात ही जोडी फोडली. 49 चेंडूंत 9 चौकार व 2 षटकार खेचून 84 धावा करणाऱ्या कोहलीला त्यानं बाद केले. डिव्हिलियर्सने 32 चेंडूंत 63 धावा केल्या. त्यात 5 चौकार व 4 षटकारांचा समावेश होता. त्याला नरीनने बाद केले. 

लक्ष्याचा पाठलाग करताना सुनील नरीन आणि ख्रिस लीन यांनी कोलकाताला 28 धावांची सलामी दिली. लिनला एक जीवदानही मिळाल, परंतु नरीन 10 धावांवर माघारी परतला. मात्र, आयपीएलमध्ये त्याने 2000 धावांचा पल्ला पार केला. नरीन माघारी परतल्यानंतर लिन आणि रॉबीन उथप्पा यांनी कोलकाताचा डाव सावरला. दोघांनी दमदार खेळी करतान संघाला 5 षटकांत 51 धावांपर्यंत मजल मारून दिली. पहिल्या पॉवर प्लेमध्ये कोलकाताने 59 धावा चोपल्या. 

 

नेगीनं कोलकाताला धक्का दिला. सलामीवीर लीनचा अडथळा दूर करताना त्यानं कर्णधार विराट कोहलीच्या चेहऱ्यावर हास्य फुलवले. लीनने 31 चेंडूंत 4 चौकार व 2 षटकार खेचून 43 धावा केल्या. राणा आणि दिनेश कार्तिक खिंड लढवत होते. राणाने उत्तम फटकेबाजी करताना धावांचा वेग वाढवला, परंतु युजवेंद्र चहलने त्याला बाद केले. 37 धावांवर तो माघारी परतला. कोलकाताला अखेरच्या चार षटकांत 66 धावा हव्या होत्या आणि त्यांची भिस्त आंद्रे रसेलवर होती. 17 व्या षटकात कार्तिक बाद झाला आणि कोलकाताला 18 चेंडूत 53 धावा हव्या होत्या. नवदीप सैनीने कार्तिकला बाद केले. पण रसेलने कोलकाताला आणखी एका विजयाच्या दिशेने वाटचाल करून दिली. 18 व्या षटकात कोलकाताने 23 धावा चोपल्या.रसेलने 19 व्या षटकातच कोलकाताचा विजय जवळपास निश्चित केला होता. टीम साउदीच्या त्या षटकात त्याने 29 धावा कुटल्या.

 

Web Title: IPL 2019: Virat Kohli slams bowlers after defeat

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.