IPL 2019 SRH vs CSK : हैदराबादचा चेन्नईवर सहा विकेट्स राखून विजय

हैदराबाद, आयपीएल २०१९ : चेन्नईची विजयी एक्सप्रेस अखेर हैदराबादने आजच्या सामन्यात रोखली. सलामीवीर जॉनी बेअरस्टोव आणि डेव्हिड वॉर्नर या दोघांनीही ...

By ऑनलाइन लोकमत | Published: April 17, 2019 07:29 PM2019-04-17T19:29:02+5:302019-04-17T23:32:50+5:30

whatsapp join usJoin us
IPL 2019 SRH vs CSK : हैदराबादचा चेन्नईवर सहा विकेट्स राखून विजय | IPL 2019 SRH vs CSK : हैदराबादचा चेन्नईवर सहा विकेट्स राखून विजय

IPL 2019 SRH vs CSK : हैदराबादचा चेन्नईवर सहा विकेट्स राखून विजय

whatsapp join usJoin usgoogleNewsNext

हैदराबाद, आयपीएल २०१९ : चेन्नईची विजयी एक्सप्रेस अखेर हैदराबादने आजच्या सामन्यात रोखली. सलामीवीर जॉनी बेअरस्टोव आणि डेव्हिड वॉर्नर या दोघांनीही अर्धशतके झळकावत संघाच्या विजयात मोलाचा वाटा उचलला. चेन्नईने हैदराबादपुढे 133 धावांचे आव्हान ठेवले होते. हैदराबादच्या संघाने हे आव्हान यशस्वीरीत्या पेलत विजय साकारला. हैदराबादने चेन्नईवर सहा विकेट्स राखत सहज मात केली.

11:21 PM

हैदराबादची चेन्नईवर सहज मात



 

11:07 PM

सलामीवीर जॉनी बेअरस्टोवचे अर्धशतक

हैदराबादचा सलामीवीर जॉनी बेअरस्टोवने ३९ चेंडूमध्ये आपले अर्धशतक पूर्ण केले. यापूर्वी हैदराबादचा दुसरा सलामीवीर डेव्हिड वॉर्नरनेही अर्धशतक झळकावले होते.

11:00 PM

विजय शंकर आऊट

विजय शंकरच्या रुपात हैदराबादला तिसरा धक्का बसला. विजय शंकरला इम्रान ताहिरने सात धावांवर बाद केले.



 

10:39 PM

केन विल्यम्सन बाद



 

10:32 PM

डेव्हिड वॉर्नर आऊट

अर्धशतक पूर्ण केल्यावर दुसऱ्याच षटकात अर्धशतकवीर डेव्हिड वॉर्नर आऊट झाला. वॉर्नरला दीपक चहारने ५० धावांवर असताना आऊट केले.



 

10:31 PM

सलामीवीर डेव्हिड वॉर्नरचे अर्धशतक

सलामीवीर डेव्हिड वॉर्नरने २ चेंडूंमध्ये आपले अर्धशतक झळकावले.



 

10:28 PM

वॉर्नर आणि बेअरस्टोव्ह यांची दमदार सलामी

हैदराबादच्या डेव्हिड वॉर्नर आणि जॉनी बेअरस्टोव यांनी दमदार सलामी दिली. या दोघांनी पाच षटकांमध्ये ५८ धावा फटकावल्या.

09:50 PM

चेन्नईच्या १३२ धावा



 

09:16 PM

केदार जाधव आऊट

केदारच्या रुपात चेन्नईला चौथा धक्का बसला. केदराला एकच धाव काढता आली.



 

09:13 PM

सुरेश रैना आऊट

चेन्नईचा कर्णधार सुरेश रैना आऊट. रैनाने १३ चेंडूंत १३ धावा केल्या.



 

09:10 PM

फॅफ ड्यू प्लेसिस आऊट

फॅफच्या रुपात चेन्नईला दुसरा धक्का बसला. फॅफने ३१ चेंडूंत ४५ धावा केल्या.



 

08:45 PM

शेन वॉटसन आऊट

शेन वॉटसनच्या रुपात चेन्नईला मोठा धक्का बसला. शेनने २९ चेंडूंत ३१ धावा केल्या.

08:30 PM

चेन्नईचे अर्धशतक



 

07:43 PM

चेन्नईची प्रथम फलंदाजी

सुरेश रैनाने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला.



 

Web Title: IPL 2019 SRH vs CSK : हैदराबादचा चेन्नईवर सहा विकेट्स राखून विजय

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.