IPL 2019 - आरसीबीने दबाव झुगारून खेळ करावा

रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर संघ सध्या पराभवाच्या गर्तेत सापडला आहे. माझ्यामते कर्णधार विराट कोहलीसह संपूर्ण संघावर प्रचंड दबाव आहे.

By ऑनलाइन लोकमत | Published: April 2, 2019 07:57 AM2019-04-02T07:57:17+5:302019-04-02T07:57:59+5:30

whatsapp join usJoin us
IPL 2019 - The RCB will play the game by swinging pressure | IPL 2019 - आरसीबीने दबाव झुगारून खेळ करावा

IPL 2019 - आरसीबीने दबाव झुगारून खेळ करावा

whatsapp join usJoin usgoogleNewsNext

अयाझ मेमन

रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर संघ सध्या पराभवाच्या गर्तेत सापडला आहे. माझ्यामते कर्णधार विराट कोहलीसह संपूर्ण संघावर प्रचंड दबाव आहे. गेल्या ११ वर्षांत या संघाने कधीही जेतेपद पटकावले नाही. त्यामुळेच प्रत्येक वर्षी या संघाकडून अपेक्षा व्यक्त केली जाते, याशिवाय संघामध्ये योग्य ताळमेळ पाहण्यास मिळत नाही. फलंदाजीत कोहली, एबी डिव्हिलियर्स, मोइन अली यासारखे दिग्गज खेळाडू आहेत, पण तरी यांच्याकडून अद्याप विशेष खेळी झालेली नाही. गोलंदाजीतही त्यांचा संघ विखुरलेला भासत आहे. त्यांनी आता दबाव झुगारून मोकळेपणाने खेळ करावा.

मुंबई इंडियन्सविरुद्ध त्यांना नशिबाची साथ मिळाली नाही. आतापर्यंत त्यांनी तीन सामने खेळले असून, तिन्ही सामन्यांत वर्चस्व निर्माण करण्यात त्यांना यश आले नाही. केवळ खेळाडूच नाही, तर संघाचा सपोर्ट स्टाफही अनुभवी आहे. दिग्गज गॅरी कस्टर्न त्यांचा प्रशिक्षक आहे, पण आयपीएलमध्ये नामांकित खेळाडूंसह तुम्ही जिंकू शकत नाही, तर संघाचा ताळमेळ अचूक असावा लागतो. इथेच आरसीबी मागे पडत आहे. दुसरीकडे चेन्नई सुपरकिंग्जने सलग तीन सामने जिंकले आहेत. कर्णधार महेंद्रसिंग धोनी जबरदस्त फॉर्ममध्ये आहे. तो खेळाडू म्हणून महान आहेच, पण एक कर्णधार म्हणून तो अमूल्य आहे. तो परिस्थितीनुसार सामना हाताळतो व राजस्थानविरुद्ध हेच पाहायला मिळाले. त्याने गोलंदाजांच्या तुलनेच क्षेत्ररक्षणात बराच बदल केला. राजस्थाननेही विजयी मार्गावर कूच केली होती, पण अशा परिस्थितीत कर्णधाराची भूमिका खूप मोलाची ठरते.

आयपीएलमध्ये आणखी एक गोष्ट म्हणजे, स्टीव्ह स्मिथ व डेव्हिड वॉर्नर यांचे यशस्वी पुनरागमन. वॉर्नर यंदा आतापर्यंत जबरदस्त फॉर्ममध्ये राहिला आहे. त्याचा धडाका कोणता गोलंदाज रोखू शकेल, हा मला पडलेला प्रश्न आहे. स्मिथला अद्याप लक्षवेधी कामगिरी करता आलेली नसली, तरी त्याने बऱ्यापैकी खेळ केला आहे. त्यातच आॅस्टेÑलियाने भारतात एकदिवसीय सामन्यांची मालिका जिंकल्यानंतर पाकिस्तानला ५-० असा क्लीनस्वीप दिलेला आहे.

त्यामुळे या स्मिथ-वॉर्नर यांच्या समावेशानंतर आॅस्टेÑलिया संघ खूप मजबूत होणार आहे. त्यात मिचेल स्टार्कचेही पुनरागमन झाले, तर हे तीन प्रमुख खेळाडू प्रतिस्पर्धी संघांसाठी डोकेदुखी ठरतील. गेल्या एक वर्षात हा संघ गडगडला होता, पण एक गोष्ट विसरता कामा नये, आॅस्टे्रलिया विश्वविजेता संघ आहे.

( लेखक लोकमतचे संपादकीय सल्लागार आहेत )

Web Title: IPL 2019 - The RCB will play the game by swinging pressure

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.