IPL 2019 : बॉक्सवर उभे राहिले म्हणून 'लिटल मास्टर' गावस्कर ट्रोल, इंग्लंडच्या खेळाडूचा पराक्रम

IPL 2019: मैदानावरील या घडामोडी क्रिकेट चाहत्यांचे मनोरंजन करत आहेतच, परंतु पडद्यामागेही अशा अनेक गोष्टी घडत आहेत. 

By ऑनलाइन लोकमत | Published: March 27, 2019 11:25 AM2019-03-27T11:25:16+5:302019-03-27T11:25:47+5:30

whatsapp join usJoin us
IPL 2019: Kevin Pietersen trolls legend Sunil Gavaskar for standing on a box to look taller than him | IPL 2019 : बॉक्सवर उभे राहिले म्हणून 'लिटल मास्टर' गावस्कर ट्रोल, इंग्लंडच्या खेळाडूचा पराक्रम

IPL 2019 : बॉक्सवर उभे राहिले म्हणून 'लिटल मास्टर' गावस्कर ट्रोल, इंग्लंडच्या खेळाडूचा पराक्रम

whatsapp join usJoin usgoogleNewsNext

बंगळुरू, आयपीएल 2019 : इंडियन प्रीमिअर लीगच्या 12 व्या मोसमाला सुरुवात होऊन अवघे काही दिवसच झाले आहेत, परंतु त्याचा ज्वर चांगलाच चढलेला पाहायला मिळत आहे. तीन दिवसांत आयपीएलमध्ये उत्कृष्ट फटकेबाजी पाहायला मिळाल्या. रिषभ पंत, आंद्रे रसेल यांची मॅच व्हिनींग आतषबाजी, तर आर. अश्विनचा मांकड रनआऊट याचीच चर्चा आहे. मैदानावरील या घडामोडी क्रिकेट चाहत्यांचे मनोरंजन करत आहेतच, परंतु पडद्यामागेही अशा अनेक गोष्टी घडत आहेत. 

इंग्लंडचा माजी फलंदाज केव्हीन पीटरसन आणि भारताचे दिग्गज फलंदाज सुनील गावस्कर यांच्यातही अशीच एक घटना घडली. आयपीएलमध्ये दोघंही समालोचकाच्या भूमिकेत आहेत. चेन्नई सुपर किंग्स आणि दिल्ली कॅपिटल्स यांच्यात फिरोज शाह कोटलावर झालेल्या सामन्यातील या घटनेवरून पीटरसननं गावस्करांना ट्रोल केले. आयपीएलचे प्रक्षेपण करणाऱ्या वाहिनीसाठी सामन्याचे वार्तांकन करताना पीटरसनच्या उंचीबरोबर येण्यासाठी गावस्करांना बॉक्सवर उभं करण्यात आले होते. त्यावरून पीटरसनने लिटल मास्टरना ट्रोल केले. 



चेन्नई आणि दिल्ली यांच्यातला सामना सुरू होण्यापूर्वीचा हा प्रसंग आहे. जेव्हा गावस्कर या सामन्याचे विश्लेषण करत होते. त्यावेळी गावस्करांना बॉक्सवर उभे करण्यात आले होते. शिखर धवनच्या ( 51) अर्धशतकाच्या जोरावर दिल्ली कॅपिटल्सने 147 धावा चोपल्या. पृथ्वी शॉ आणि धवन यांनी संघाला चांगली सुरुवात करून दिली, परंतु चेन्नईच्या गोलंदाजांनी अचूक मारा केला.

ड्वेन ब्राव्होन 33 धावा देत दिल्लीचे 3 फलंदाज बाद केले. त्यामुळे दिल्लीला निर्धारीत 20 षटकांत 6 बाद 147 धावाच करता आल्या. मुंबई इंडियन्सविरुद्ध वादळी खेळी खेळणाऱ्या रिषभ पंतला ( 25) ब्राव्होने बाद केले. या लक्ष्याचा पाठलाग करताना शेन वॉटसन ( 44) आणि सुरेश रैना ( 30) यांनी चेन्नईचा डाव सावरला. केदार जाधव ( 27) आणि धोनी ( 32) यांनीही दमदार खेळी करत चेन्नईच्या विजयावर शिक्कामोर्तब केले. चेन्नईचा हा सलग दुसरा विजय ठरला. 
 

Web Title: IPL 2019: Kevin Pietersen trolls legend Sunil Gavaskar for standing on a box to look taller than him

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.