IPL 2019 : सुपर ओव्हरमध्ये दिल्लीची कोलकातावर मात

सामना सुपर ओव्हरमध्ये गेला. कारण दोन्ही संघांच्या निर्धारीत 20 षटकांमध्ये 185 धावा झाल्या.

By ऑनलाइन लोकमत | Published: March 31, 2019 12:19 AM2019-03-31T00:19:27+5:302019-03-31T00:19:29+5:30

whatsapp join usJoin us
IPL 2019: Delhi beat Kolkata in Super Over | IPL 2019 : सुपर ओव्हरमध्ये दिल्लीची कोलकातावर मात

IPL 2019 : सुपर ओव्हरमध्ये दिल्लीची कोलकातावर मात

whatsapp join usJoin usgoogleNewsNext

नवी दिल्ली, आयपीएल 2019 : सुपर ओव्हरमध्ये दिल्ली कॅपिटल्सनेकोलकाता नाईट रायडर्सवर विजय मिळवला. दिल्लीने प्रथम फलंदाजी करताना कोलकात्यापुढे 11 धावांचे आव्हान ठेवले होते. या आव्हानाचा पाठलाग करताना कोलकात्याला तीन धावांनी पराभव पत्करावा लागला.

अखेरच्या षटकांमध्ये मोठे फटके मारण्याच्या नादात दिल्लीने आपले विकेट्स गमावले आणि सामना सुपर ओव्हरमध्ये गेला. कारण दोन्ही संघांच्या निर्धारीत 20 षटकांमध्ये 185 धावा झाल्या.

कोलकात्याच्या आव्हानाचा पाठलाग करतावा दिल्लीची चांगली सुरुवात झाली नाही. लामीवीर शिखर धवनला त्यांनी तिसऱ्या षटकातच गमावले. पण त्यानंतर पृथ्वी शॉ आणि रिषभ पंत यांनी दमदार फलंदाजी करत 89 धावांची भागीदारी रचत संघाचा धावफलक हलता ठेवला. अय्यरने 32 चेंडूंत 43 धावांची खेळी साकारली. पृथ्वीने यावेळी दमदार फलंदाजी केली.

कोलकाता नाईट रायडर्सचा आंद्रे रसेल पुन्हा एकदा तळपला. रसेलच्या धडाकेबाद अर्धशतकामुळे कोलकात्याने  प्रथम फलंदाजी करताना दिल्ली कॅपिटल्सपुढे  धावांचे 186 आव्हान ठेवले. रसेलने 28 चेंडूंत चार चौकार आणि सहा षटकारांच्या जोरावर 62 धावांची तुफानी खेळी साकारली.

दिल्लीने नाणेफेक जिंकत कोलकाताला प्रथम फलंदाजीसाठी पाचारण केले. दिल्लीचा हा निर्णय योग्य असल्याचे पहिल्या दहा षटकांमध्ये पाहायला मिळाले. कारण दिल्लीने कोलकात्याचा अर्धा संघ फक्त 61 धावांमध्ये गुंडाळला. पण त्यानंतर दिनेश कार्तिक आणि आंद्रे रसेल यांनी कोलकात्याचा डाव सावरला.


दिल्ली कॅपिटल्सविरुद्धच्या सामन्यात कोलकाता नाईट रायडर्सकडून निखिल नाईक हा सलामीला आला आणि साऱ्यांनीच डोळे विस्फारले. कारण यापूर्वी हे नाव फारसं कुणाला माहिती नव्हतं. त्यामुळे तो थेट सलामीलाच आल्यामुळे सर्वांनाच आश्चर्याचा धक्का बसला.

Web Title: IPL 2019: Delhi beat Kolkata in Super Over

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.