IPL 2018 : धोनीची कंबर लचकली, विश्वचषकासाठी आयपीएला देणार का विश्रांती...

धोनी आता आयपीएलमध्ये विश्रांती घेणार का, हा सवाल उपस्थित केला जात आहे.

By ऑनलाइन लोकमत | Published: April 24, 2019 05:16 PM2019-04-24T17:16:16+5:302019-04-24T17:18:26+5:30

whatsapp join usJoin us
IPL 2018: MS Dhoni injured, the rest will be given to the Indian Premier League? | IPL 2018 : धोनीची कंबर लचकली, विश्वचषकासाठी आयपीएला देणार का विश्रांती...

IPL 2018 : धोनीची कंबर लचकली, विश्वचषकासाठी आयपीएला देणार का विश्रांती...

whatsapp join usJoin usgoogleNewsNext

चेन्नई, आयपीएल 2019 : चेन्नई सुपर किंग्स सध्या चांगल्य फॉर्मात आहे. आतापर्यंत कामगिरीत सातत्य राखत त्यांनी गुणतालिकेत अव्वल क्रमांक कायम राखला आहे. पण चेन्नईच्या संघासाठी एक वाईट बातमी आहे आणि ती म्हणजे धोनीची कंबर लचकली आहे. आयपीएलनंतर विश्वचषक स्पर्धा होणार आहे. त्यामुळे धोनी आता आयपीएलमध्ये विश्रांती घेणार का, हा सवाल उपस्थित केला जात आहे.

धोनीला काही दिवसांपूर्वी पाठिच्या दुखण्याचा त्रास झाला होता. त्यामुळे धोनीला एका सामन्याला मुकावे लागले होते. त्यावेळी सुरेश रैनाकडे संघाचे कर्णधारपद देण्यात आले होते. धोनीची कंबर लचकली असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. दुखापती खेळाडूंच्या आयुष्याचा एक भाग असतात. पण विश्वचषक काही दिवसांवर येऊन ठेपला असताना धोनीला दुखापत होणे संघासाठी चांगले नाही. त्यामुळे या दुखापतीतून सावरून तंदुरुस्त होण्यासाठी धोनी आयपीएलच्या सामन्यांपासून विश्रांती घेणार असल्याचे म्हटले जात आहे.

 इंडियन प्रीमिअर लीगच्या 12 व्या पर्वात प्ले ऑफमध्ये प्रथम प्रवेश करण्याचा मान चेन्नई सुपर किंग्सने पटकावला. मंगळवारी घरच्या मैदानावर झालेल्या सामन्यात चेन्नईने माजी विजेत्या सनरायझर्स हैदराबादवर 6 विकेट राखून विजय मिळवला. 176 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना चेन्नईला अखेरच्या षटकापर्यंत खेळावे लागले. रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू संघाविरुद्ध आलेला अनुभव याही लढतीत येतो की काय असे वाटत होते. पण चेन्नईने विजय मिळवला. 

शेन वॉटसन (96) आणि सुरेश रैना ( 38) धावांच्या जोरावर चेन्नईने बाजी मारली. या विजयानंतर चेन्नईच्या खात्यात 16 गुण झाले आहेत आणि त्यांनी प्ले ऑफचा प्रवेश पक्का केला आहे. चेन्नईचा कर्णधार महेंद्रसिंग धोनीने या यशस्वी वाटचालीचे श्रेय गोलंदाजांना दिले. पण त्याने एक गुपित मनात दडवून ठेवल्याचे सांगितले आणि ते जाणून घेण्यासाठी निवृत्तीपर्यंत वाट पाहण्याचे संकेतही दिले. ते गुपित सांगितल्यास CSK मला खरेदी करणार नाही, असेही धोनी म्हणाला. 

या सामन्यानंतर धोनी म्हणाला," या हंगामात आमच्या गोलंदाजांनी उल्लेखनीय कामगिरी केली. प्ले ऑफ मध्ये प्रवेश करण्यामागचं हे एक गुपित आहे. आमचे चाहते आणि साहाय्यक सदस्य यांना यशाचे श्रेय द्यायला हवे. आणखी एक गुपित आहे, परंतु निवृत्त होइपर्यंत ते मी सांगणार नाही. आता सांगितले तर CSK मला लिलावात खरेदी करणार नाही."

Web Title: IPL 2018: MS Dhoni injured, the rest will be given to the Indian Premier League?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.