IPL 2018 : चेन्नईला चिंता ' या ' कोलकात्याच्या खेळाडूची - फ्लेमिंग

गुरुवारी त्यांचा सामना इडन गार्डन्सवर कोलकाता नाईट रायडर्सविरुद्ध होणार आहे. पण या सामन्यापूर्वी चेन्नईचे प्रशिक्षक स्टीफन फ्लेमिंग यांना कोलकात्याच्या एका खेळाडूमुळे चिंता वाटत आहे.

By ऑनलाइन लोकमत | Published: May 3, 2018 05:16 PM2018-05-03T17:16:44+5:302018-05-03T17:16:44+5:30

whatsapp join usJoin us
IPL 2018: Chennai concern About 'This' Kolkata Player- Fleming | IPL 2018 : चेन्नईला चिंता ' या ' कोलकात्याच्या खेळाडूची - फ्लेमिंग

IPL 2018 : चेन्नईला चिंता ' या ' कोलकात्याच्या खेळाडूची - फ्लेमिंग

whatsapp join usJoin usgoogleNewsNext
ठळक मुद्देमहेंद्रसिंग धोनी, शेन वॉटसन, ड्वेन ब्राव्हो, अंबाती रायुडू या अनुभवी खेळाडूंनी आतापर्यंत सातत्यपूर्ण कामगिरी केली आहे. त्यांच्या खेळाच्या जोरावर चेन्नईने विजय मिळवले आहेत, असे फ्लेमिंग म्हणाले.

कोलकाता : आयपीएलमध्ये चेन्नई सुपर किंग्ज सध्या भन्नाट फॉर्मात आहे. गुणतालिकेत ते अव्वल स्थानावर विराजमान आहेत. गुरुवारी त्यांचा सामना इडन गार्डन्सवर कोलकाता नाईट रायडर्सविरुद्ध होणार आहे. पण या सामन्यापूर्वी चेन्नईचे प्रशिक्षक स्टीफन फ्लेमिंग यांना कोलकात्याच्या एका खेळाडूमुळे चिंता वाटत आहे.

चेन्नईने आतापर्यंत आठ सामने खेळले आहेत. या आट सामन्यांमध्ये त्यांनी सहा सामन्यांत विजय मिळवला आहे तर दोन सामन्यांमध्ये ते पराभूत झाले आहेत. त्यामुळे गुणतालिकेत 12 गुणांसह चेन्नईचा संघ अव्वल स्थानावर आहे.

कोलकात्याबरोबर दोन हात करताना चेन्नईला एका खेळाडूच्या कामिगरीमुळे चिंता वाटत आहे आणि तो खेळाडू म्हणजे रॉबिन उथप्पा. फ्लेमिंग यांनी याबाबत सांगितले की, " उथप्पाला आतापर्यंत लौकिकाला साजेशी कामगिरी करता आलेली नाही. त्यामुळे चेन्नईविरुद्धच्या सामन्यात दमदार कामिगरी करण्याच्या ईर्षेने पेटून उठू शकतो. त्यामुळे चेन्नईला सर्वात जास्त धोनी हा उथप्पाकडून आहे. "

अनुभवी खेळाडूंची दमदार कामगिरी
" महेंद्रसिंग धोनी, शेन वॉटसन, ड्वेन ब्राव्हो, अंबाती रायुडू या अनुभवी खेळाडूंनी आतापर्यंत सातत्यपूर्ण कामगिरी केली आहे. त्यांच्या खेळाच्या जोरावर चेन्नईने विजय मिळवले आहेत, त्याचबरोबर युवा खेळाडूंना त्यांच्याकडून बरेच काही शिकायला मिळत आहे. त्यामुळे हे अनुभवी खेळाडू संघासाठी फार महत्वाचे आहेत," असे फ्लेमिंग म्हणाले.

Web Title: IPL 2018: Chennai concern About 'This' Kolkata Player- Fleming

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.