IND vs PAK : शतकासह साजरा करणार का अंबाती रायुडू आपला वाढदिवस...

आतापर्यंत रायुडूला आशिया चषकामध्ये मोठी खेळी साकारता आलेली नाही.

By ऑनलाइन लोकमत | Published: September 23, 2018 05:02 PM2018-09-23T17:02:38+5:302018-09-23T17:04:19+5:30

whatsapp join usJoin us
INDUPAK: Will AMBATI RAYUDU'S his birthday be celebrated with the century? | IND vs PAK : शतकासह साजरा करणार का अंबाती रायुडू आपला वाढदिवस...

IND vs PAK : शतकासह साजरा करणार का अंबाती रायुडू आपला वाढदिवस...

whatsapp join usJoin usgoogleNewsNext
ठळक मुद्देभारतीय संघात पुनरागमन करणाऱ्या अंबाती रायुडूचा आज वाढदिवस आहे.

दुबई, आशिया चषक 2018, भारत विरुद्ध पाकिस्तान : भारतीय संघात पुनरागमन करणाऱ्या अंबाती रायुडूचा आज वाढदिवस आहे. त्यामुळे पाकिस्तानसारख्या पारंपरिक प्रतिस्पर्ध्याविरुद्ध शतक ठोकून तो आनंद साजरा करणार का, याची उत्सुकता चाहत्यांना असेल.

आतापर्यंत रायुडूला आशिया चषकामध्ये मोठी खेळी साकारता आलेली नाही. पुनरागमन करत असताना त्याला भारतीय संघाने तिसऱ्या स्थानावर फलंदाजीसाठी पाठवले आहे. पण तरीही त्याला अजून छाप पाडता आलेली नाही. त्यामुळे या सामन्यात त्याच्याकडून चांगली कामगिरी झाली नाही तर कदाचित त्याला संघातून बाहेर जावे लागेल. त्यामुळे हा सामना त्याच्यासाठी फार महत्त्वाचा असणार आहे.


Web Title: INDUPAK: Will AMBATI RAYUDU'S his birthday be celebrated with the century?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.