भारतीय संघाचे 2019 मधील Action Pack वेळापत्रक, विराटसेनेचा लागणार कस

वन डे वर्ल्ड कप, कसोटी अजिंक्यपद स्पर्धा, इंडियन प्रीमिअर लीग, अॅशेस... अशा अनेक महत्त्वाच्या स्पर्धांची मेजवानी 2019 मध्ये क्रिकेटप्रेमींना मिळणार आहे.

By ऑनलाइन लोकमत | Published: January 1, 2019 05:39 PM2019-01-01T17:39:09+5:302019-01-01T17:39:24+5:30

whatsapp join usJoin us
India's 2019 action pack schedule; Plenty of cricketing action awaits Virat Kohli & Co | भारतीय संघाचे 2019 मधील Action Pack वेळापत्रक, विराटसेनेचा लागणार कस

भारतीय संघाचे 2019 मधील Action Pack वेळापत्रक, विराटसेनेचा लागणार कस

whatsapp join usJoin usgoogleNewsNext

मुंबई : वन डे वर्ल्ड कप, कसोटी अजिंक्यपद स्पर्धा, इंडियन प्रीमिअर लीग, अॅशेस... अशा अनेक महत्त्वाच्या स्पर्धांची मेजवानी 2019 मध्ये क्रिकेटप्रेमींना मिळणार आहे. भारताचा महान कर्णधार महेंद्रसिंग धोनी हाही वर्ल्ड कप स्पर्धेनंतर कदाचित कारकिर्दीचा निरोप घेण्याची शक्यता आहे. हे वर्ष विराट कोहलीच्या नेतृत्वाखाली खेळणाऱ्या भारतीय संघासाठी खऱ्या अर्थाने आव्हानात्मक ठरणार आहे. भारताला आठ वर्षांनी वर्ल्ड कप जिंकून देण्याचे दडपण त्याच्या खांद्यावर आहे. 

2019 च्या वर्षाची सुरुवात भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील चौथ्या कसोटी सामन्याने होईल. भारताने मालिकेत 2-1 अशी आघाडी घेतली आहे आणि 3 जानेवारीपासून सुरू होणाऱ्या कसोटीत विजय मिळवून ऑस्ट्रेलियात कसोटी मालिका जिंकण्याचा पराक्रम करण्याची विराटसेनेला संधी आहे. भारताला 71 वर्षांच्या इतिहासात ऑस्ट्रेलियात कसोटी मालिका जिंकता आलेली नाही. या कसोटी मालिकेनंतर भारत-ऑस्ट्रेलिया यांच्यात तीन वन डे सामने होतील आणि त्यानंतर भारतीय संघ न्यूझीलंड दौऱ्यासाठी रवाना होईल. त्यानंतर इंडियन प्रीमिअर लीग आणि लगेच वर्ल्ड कप... असा भारतीय संघाचे Action Pack वेळापत्रक असणार आहे. 
 

भारताचे 2019 मधील वेळापत्रक
ऑस्ट्रेलिया (Away) 4th Test- 3 ते 7 जानेवारी
ऑस्ट्रेलिया (Away) 3 वन डे - 12, 15 व 18 जानेवारी
न्यूझीलंड ( Away) 5 वन डे व 3 ट्वेंटी-20     - 23 जानेवारी ते 10 फेब्रुवारी
ऑस्ट्रेलिया ( Home) 5 वन डे व 2 ट्वेंटी-20 - 24 फेब्रुवारी ते 13 मार्च
झिम्बाब्वे ( Home) 1 कसोटी व 3 वन डे- मार्च
2019 वन डे वर्ल्ड कप - 30 मे ते 14 जुलै
वेस्ट इंडिज ( Away) 2 कसोटी, 3 वन डे व 3 ट्वेंटी-20 - जुलै व ऑगस्ट
दक्षिण आफ्रिका ( Home) 3 कसोटी - ऑक्टोबर व नोव्हेंबर
बांगलादेश ( Home) 2 कसोटी व 3 ट्वेंटी-20 - नोव्हेंबर व डिसेंबर
वेस्ट इंडिज ( Home) 3 वन डे व 3 ट्वेंटी-20 - डिसेंबर 
 

Web Title: India's 2019 action pack schedule; Plenty of cricketing action awaits Virat Kohli & Co

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.