पराभवाचे ‘पंचक’ संपविण्यासाठी खेळणार भारतीय महिला संघ

भारतीय महिला संघ इंग्लंडविरुद्ध गुरुवारी दुसऱ्या टी-२० लढतीत उतरणार असून हा सामना जिंकून सलग पाच पराभवाची मालिका खंडित काढण्याचा भारतीय महिला संघाचा प्रयत्न असेल.

By ऑनलाइन लोकमत | Published: March 7, 2019 04:17 AM2019-03-07T04:17:28+5:302019-03-07T04:17:39+5:30

whatsapp join usJoin us
 Indian women's team will play for the finals of the quarter-finals | पराभवाचे ‘पंचक’ संपविण्यासाठी खेळणार भारतीय महिला संघ

पराभवाचे ‘पंचक’ संपविण्यासाठी खेळणार भारतीय महिला संघ

whatsapp join usJoin usgoogleNewsNext

गुवाहाटी: भारतीय महिला संघ इंग्लंडविरुद्ध गुरुवारी दुसऱ्या टी-२० लढतीत उतरणार असून हा सामना जिंकून सलग पाच पराभवाची मालिका खंडित काढण्याचा भारतीय महिला संघाचा प्रयत्न असेल. तीन सामन्याच्या मालिकेतील पहिल्या सामन्यात रविवारी भारताचा ४१ धावांनी पराभव झाला होता.
टी२० मध्ये भारताचा हा सलग पाचवा पराभव होता. प्रशिक्षक डब्ल्यू व्ही. रमन यांच्या मार्गदर्शनात या संघाला पुढील वर्षी आॅस्ट्रेलियात आयोजित विश्वचषकाआधी स्वत:ची कामगिरी सुधारण्याचे आव्हान असेल.
पहिल्या सामन्यात इंग्लंडने ४ बाद १६० धावा उभारल्यानंतर भारत ६ बाद ११९ पर्यत मजल गाठू शकला. टी२० संघाची नियमित कर्णधार हरमनप्रीत कौर जखमी असल्याने संघाला तिची उणीव जाणवत आहे. त्याचवेळी उत्कृष्ट फॉर्ममध्ये असलेली स्मृती मानधना नेतृत्वात मात्र अपयशी ठरत आहे. हरमनच्या अनुपस्थितीत अनुभवी मिताली हिच्याकडून मोठ्या अपेक्षा होत्या, पण ती देखील संधीचा लाभ घेण्यात अपयशी ठरली. याश्विाय वेदा कृष्णमूर्ती हिला देखील चांगल्या सुरुवातीचे रुपांतर मोठ्या खेळीत करण्यात अपयश आले. गोलंदाजीत भारताकडून समाधानकारक कामगिरी होत असली, तरी फलंदाजांकडून पुरेशी साथ मिळत नसल्याने संघ सध्या पराभवाच्या गर्तेत सापडला आहे. त्यामुळे गुरुवारी होणाऱ्या सामन्यात भारतीय फलंदाजांना आपल्या कामगिरीत सुधारणा करावीच
लागेल. (वृत्तसंस्था)
>दुसरीकडे टॅमी ब्युमोंट, कर्णधार हीथर नाईट आणि डॅनियली वॅट यांनी पहिल्या लढतीत शानदार फलंदाजी केल्यामुळे इंग्लंडला पराभूत करण्यासाठी भारतीय संघाला बराच घाम
गाळावा लागेल.
>भारत : स्मृती मानधना (कर्णधार), मिताली राज, जेमिमा रॉड्रिग्स, दीप्ती शर्मा, तानिया भाटिया, भारती फुलमाळी, अनुजा पाटील, शिखा पांडे, कोमल झंझाळ, अरुंधती रेड्डी, पूनम यादव, एकता बिश्त, राधा यादव, वेदा कृष्णमूर्र्ती आणि हरलीन देओल.
इंग्लंड: हीथर नाईट (कर्णधार), टॅमी ब्युमोंट, कॅथरिन ब्रंट,केट क्रॉस, सोफिया डंकले, फ्रेया डेव्हिस, जॉर्जिया एल्विस, एमी जोन्स, लारा मार्श, नताली सायव्हर, आन्या श्रबसोल, लिंडसे स्मिथ, लॉरेन विनफील्ड, डॅनियली वॅट आणि अ‍ॅलेक्स हार्टले.

Web Title:  Indian women's team will play for the finals of the quarter-finals

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.