भारतीय संघ श्रीलंकेला रवाना

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 5, 2018 02:15 AM2018-03-05T02:15:00+5:302018-03-05T02:15:00+5:30

whatsapp join usJoin us
 Indian team leaves for Sri Lanka | भारतीय संघ श्रीलंकेला रवाना

भारतीय संघ श्रीलंकेला रवाना

whatsapp join usJoin usgoogleNewsNext

मुंबई : रोहित शर्मा याच्या नेतृत्वाखालील भारतीय संघ श्रीलंकेत गुरुवारपासून सुरू होणाºया तिरंगी निधास टी-२0 करंडक क्रिकेट स्पर्धेसाठी रविवारी रवाना झाला.
कर्णधार विराट कोहली आणि महेंद्रसिंह धोनीसह प्रमुख खेळाडूंना भारत, श्रीलंका आणि बांगलादेशदरम्यान होणाºया या तिरंगी मालिकेतून विश्रांती देण्यात आली आहे. ही स्पर्धा सहा मार्चपासून सुरू होणार आहे. भारत कोलंबोच्या के. आर. प्रेमदासा स्टेडियमवर यजमान श्रीलंकेविरुद्ध सलामीच्या लढतीत दोन हात करील. अंतिम सामना १८ मार्चला रंगणार आहे. सहभागी तिन्ही संघ एकमेकांविरुद्ध दोनदा खेळतील, तसेच अव्वल स्थानी राहणारे दोन संघ अंतिम फेरीत पोहोचतील. सर्वच सामने कोलंबो येथे खेळवले जाणार आहेत.

रवाना झालेला भारतीय संघ

रोहित शर्मा (कर्णधार), शिखर धवन (उपकर्णधार), के. एल. राहुल, सुरेश रैना, मनीष पांडे, दिनेश कार्तिक (यष्टिरक्षक), दीपक हुड्डा, वॉशिंग्टन सुंदर, युजवेंद्र चहल, अक्षर पटेल, विजय शंकर, शार्दूल ठाकूर, जयदेव उनाडकट, मोहम्मद सिराज, ऋषभ पंत (यष्टिरक्षक).

Web Title:  Indian team leaves for Sri Lanka

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.