IND vs WIN 5th ODI : भारताने केले विजयाचे धडाक्यात सेलिब्रेशन, पाहा हा व्हिडीओ

प्रथम फलंदाजी करणाऱ्या वेस्ट इंडिजला भारताने 104 धावांत गुंडाळले. त्यानंतर हे आव्हान रोहित शर्माच्या नाबाद अर्धशतकाच्या जोरावर पूर्ण केले आणि सामना 9 विकेट्स राखून जिंकला.

By ऑनलाइन लोकमत | Published: November 1, 2018 05:53 PM2018-11-01T17:53:17+5:302018-11-01T17:53:27+5:30

whatsapp join usJoin us
India vs WIN 5th ODI: Celebration of India's series win, Watch Video | IND vs WIN 5th ODI : भारताने केले विजयाचे धडाक्यात सेलिब्रेशन, पाहा हा व्हिडीओ

IND vs WIN 5th ODI : भारताने केले विजयाचे धडाक्यात सेलिब्रेशन, पाहा हा व्हिडीओ

whatsapp join usJoin usgoogleNewsNext
ठळक मुद्देया विजयासह भारताने ही मालिका 3-1 अशी जिंकली आहे. या विजयानंतर भारतीय संघाने धडाक्यात सेलिबेशन केले. 

तिरुवनंतपुरम, भारत विरुद्ध वेस्ट इंडिज : कसोटी मालिकेपाठोपाठ भारताने वनडे सीरिजमध्येही वेस्ट इंडिजला पराभूत करण्याची किमया साधली. प्रथम फलंदाजी करणाऱ्या वेस्ट इंडिजला भारताने 104 धावांत गुंडाळले. त्यानंतर हे आव्हान रोहित शर्माच्या नाबाद अर्धशतकाच्या जोरावर पूर्ण केले आणि सामना 9 विकेट्स राखून जिंकला. या विजयासह भारताने ही मालिका 3-1 अशी जिंकली आहे. या विजयानंतर भारतीय संघाने धडाक्यात सेलिबेशन केले. 
हा पाहा व्हिडीओ


भारताच्या गोलंदाजांनी भेदक मारा केला आणि त्यांचा फक्त 104 धावांत खुर्दा उडवला. भारताकडून रवींद्र जडेजाने यावेळी सर्वाधिक चार बळी मिळवले. वेस्ट इंडिजच्या 105 धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना भारताची सुरुवात चांगली झाली नाही. सलामीवीर शिखर धवन स्वस्तात बाद झाला. पण त्यानंतर रोहित शर्मा आणि विराट कोहली यांनी अभेद्य भागीदारी रचत संघाच्या विजयावर शिक्कामोर्तब केले. रोहितने यावेळी नाबाद 63 धावांची दमदार खेळी साकारली. कोहलीने यावेळी नाबाद 33 धावा केल्या.

Web Title: India vs WIN 5th ODI: Celebration of India's series win, Watch Video

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.