IND vs WI 4th ODI : भारताचा वेस्ट इंडिजवर 224 धावांनी विजय

IND vs WI 4th ODI LIVE : भारत विरुद्ध वेस्ट इंडिज यांच्यातला चौथा वन डे सामना मुंबईच्या ब्रेबॉर्न स्टेडियमवर खेळवण्यात येत आहे.

By ऑनलाइन लोकमत | Published: October 29, 2018 01:00 PM2018-10-29T13:00:44+5:302018-10-30T06:44:02+5:30

whatsapp join usJoin us
India vs WI 4th ​​ODI LIVE: India won the toss, first batting | IND vs WI 4th ODI : भारताचा वेस्ट इंडिजवर 224 धावांनी विजय

IND vs WI 4th ODI : भारताचा वेस्ट इंडिजवर 224 धावांनी विजय

whatsapp join usJoin usgoogleNewsNext

मुंबई : ‘हिटमॅन’ रोहित शर्माचे दीडशतक (१६२) आणि अंबाती रायुडूच्या (१००) शतकानंतर गोलंदाजांनी केलेल्या शानदार माऱ्याच्या जोरावर भारताने चौथ्या एकदिवसीय सामन्यात वेस्ट इंडिजचा २२४ धावांनी फडशा पाडला. भारताने उभारलेल्या ३७७ धावांच्या एव्हरेस्टचा पाठलाग करताना वेस्ट इंडिजचा डाव ३६.२ षटकात केवळ १५३ धावांत संपुष्टात आला. खलील अहमद (३/१३) आणि कुलदीप यादव (३/४२) यांनी विंडीजच्या फलंदाजीला खिंडार पाडले. यासह ५ सामन्यांच्या मालिकेत भारताने २-१ अशी आघाडी घेतली.

ब्रेबॉर्न स्टेडियमवर नाणेफेक जिंकून कर्णधार विराट कोहलीने प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला. रोहित - शिखर धवन यांनी अर्धशतकी सलामी देत कर्णधाराचा विश्वास सार्थ ठरविताना भारताला दमदार सुरुवात करुन दिली. शिखर धवन आणि कर्णधार कोहली अपयशी ठरल्यानंतर रोहित आणि रायुडू यांच्या २११ धावांच्या भागीदारीच्या जोरावर भारताने ५० षटकात ५ बाद ३७७ धावांचा एव्हरेस्ट उभारला.
हे भलेमोठे आव्हान विंडीजला पेलवलेच नाही. सुरुवातीपासूनच भेदक मारा केलेल्या भारतीयांनी विंडीजचा अर्धा संघ १२व्या षटकात ४७ धावांवर बाद केला. येथेच भारताचा विजय स्पष्ट झाला. यानंतर कर्णधार जेसन होल्डरने ७० चेंडूत १ चौकार व २ षटकारांसह नाबाद ५४ धावा केल्याने विंडीजचा पराभव काहीवेळ लांबला. यावेळी त्यांचा एकही फलंदाज फारवेळ तग धरु शकला नाही. गेल्या तीन सामन्यांत भारतीयांची डोकेदुखी ठरलेले शाय होप (०) आणि शिमरोन हेटमायर (१३) स्वस्तात बाद झाल्याने भारताच्या विजयातील मुख अडसर दूर झाला होता. होल्डरला दुसऱ्या टोकाकडून कोणाचीही तोलामोलाची साथ मिळाली नाही. खलील व कुलदीप यांनी प्रत्येकी ३ बळी घेत विंडीजची फलंदाजी खिळखिळी केली.

तत्पूर्वी, रोहित - धवन या सलामीवीरांनी सर्वाधिक धावा करणाºया भारतीय सलामीवीरांमध्ये दुसरे स्थान मिळवताना सचिन तेंडुलकर - वीरेंद्र सेहवाग यांना मागे टाकले. रोहित - धवन जोडीने एकूण ३,९२० धावा फटकावल्या असून अव्वल स्थानी असलेल्या सचिन - सौरव गांगुली जोडीने सर्वाधिक ६,६०९ धावा चोपल्या आहेत. हीच जोडी एकदिवसीय क्रिकेटमध्येही अव्वल स्थानी आहे. तिसरी भारतीय सलामी जोडी सचिन - सेहवाग यांच्या नावावर ३,९१९ धावांची नोंद आहे.

रोहितने पुन्हा एकदा दीर्घ खेळी करताना विंडीज संघाचा घामटा काढला. आपल्या चौथ्या द्विशतकाच्या दिशेने वाटचाल सुरु असतानाच रोहित अ‍ॅश्ले नर्सच्या गोलंदाजीवर झेलबाद झाला. त्याने १३७ चेंडूत २० चौकार व ४ षटकारांचा पाऊस पाडत १६२ धावा कुटल्या. भारताला गेल्या काही दिवसांपासून सतावत असलेल्या मधल्या फळीचा प्रश्न यावेळी अंबाती रायुडूने सोडवला. त्याने रोहितला शानदार साथ देताना ८१ चेंडूत ८ चौकार व ४ षटकरांसह १०० धावांचा तडाखा दिला. चांगल्या लयीत दिसत असताना तो धावबाद झाला. सलग तीन एकदिवसीय सामन्यांत शतक झळकावून आपला जबरदस्त फॉर्म दाखविलेला कर्णधार विराट कोहली यावेळी फारशी छाप पाडू शकला नाही. १७ चेंडूत २ चौकारांसह १६ धावा करुन तो तंबूत परतला.

रोहित - धवन यांनी ७१ धावांची सलामी दिल्यानंतर कोहली फारशी चमक दाखवू न शकल्याने भारताचा डाव २ बाद १०१ असा घसरला होता. मात्र येथून रोहित - रायुडू यांनी २११ धावांची भागीदारी करत भारताला धावांचा एव्हरेस्ट गाठून देण्यात निर्णायक कामगिरी केली. हे दोघे बाद झाल्यानंतर महेंद्रसिंग धोनी (२३) आणि केदार जाधव (१६*) यांनी छोटेखानी आक्रमक फटकेबाजी केल्याने भारताला साडेतीनशे धावांचा पल्ला पार करता आला. 

भारताचा वेस्ट इंडिजवर 224 धावांनी विजय



 

वेस्ट इंडिजला नववा धक्का, 9 बाद 132



 

वेस्ट इंडिजला आठवा धक्का



 

वेस्ट इंडिज 7 बाद 77, भारत विजयासमीप

वेस्ट इंडिजची 6 बाद 56 अशी दयनीय अवस्था



 

वेस्ट इंडिजचा अर्धा संघ गारद, रोवमन पॉवेल बाद

हेटमायर बाद, वेस्ट इंडिजला चौथा धक्का



 

वेस्ट इंडिजला तिसरा धक्का, 3 बाद 20 अशी अवस्था



 

वेस्ट इंडिजचे विजयाचे 'होप' मावळले, शेई होप शून्यावर बाद



 

वेस्ट इंडिजला पहिला धक्का, चंदरपॉल हेमराज बाद



 

भारताचा 50 षटकांत 377 धावांचा डोंगर



 

महेंद्रसिंग धोनी आऊट, भारताचा पाचवा धक्का



 

अंबाती रायुडू शतकानंतर झाला बाद



 

अंबाती रायुडूचे 80 चेंडूंत दमदार शतक

भारताला मोठा धक्का... रोहित शर्माचे द्विशतक हुकले



 

रोहित शर्माचे दीडशतक, भारताच्या तिनशे धावा पूर्ण



 

अंबाती रायुडूचे अर्धशतक, भारत 2 बाद 223



 

- रोहित शर्माने वन डे कारकिर्दीतले 21वे शतक झळकावले.



 

रोहितने अंबाती रायुडूसह भारताच्या धावांचा वेग कायम राखला. दोघांनी अर्धशतकी भागीदारी केली.



 

रोहित शर्माचे अर्धशतक



 

 विराट कोहली बाद, भारताला मोठा धक्का



 

मुंबई : भारत विरुद्ध वेस्ट इंडिज यांच्यातला चौथा वन डे सामना मुंबईच्या ब्रेबॉर्न स्टेडियमवर खेळवण्यात येत आहे. केदार जाधव व रवींद्र जडेजाचा संघात समावेश. रिषभ पंत व युजवेंद्र चहल यांना वगळले.

LIVE UPDATES : 

- किमो पॉलने भारताचा सलामीवीर शिखर धवनला बाद केले.



 

- भारताच्या दहा षटकांत बिनबाद 56 धावा

- आठ षटकांत भारताने अर्धशतक पूर्ण केले



 

- पाच षटकांत 25 धावा

- महान फलंदाज सचिन तेंडुलकरने बेल वाजवून सामना सुरू करण्याचा संदेश दिला



- पहिल्या षटकात 5 धावा

भारत विरुद्ध वेस्ट इंडिज यांच्यातला चौथा वन डे सामना मुंबईच्या ब्रेबॉर्न स्टेडियमवर खेळवण्यात येत आहे. पाच सामन्यांच्या मालिकेत दोन्ही संघांनी 1-1 सामने जिंकले आहेत. त्यामुळे आजचा सामना मालिकेत आघाडी मिळवण्याच्या दृष्टीने महत्त्वाचा आहे. भारत आणि विंडीज यांच्यातील दुसरा सामना बरोबरीत सुटला होता. ब्रेबॉर्नवर भारतापेक्षा ( एक सामना) अधिक सामना विंडीजने ( 4 सामने ) खेळले आहेत. त्यामुळे येथील खेळपट्टीचा त्यांना चांगला अनुभव आहे. भारताने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी घेतली आहे.



या सामन्यात भारताचा कर्णधार विराट कोहलीला शतक झळकावून श्रीलंकेच्या महान फलंदाज कुमार संगकाराच्या दोन विक्रमांशी बरोबरी करण्याची संधी आहे. सलग चार वन डे सामन्यांत शतकांची आणि एकूण 63 शतकं झळकावण्याच्या विक्रमाशी विराट बरोबरी करू शकतो.
असे आहेत संघ





 

Web Title: India vs WI 4th ​​ODI LIVE: India won the toss, first batting

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.