India Vs Sri Lanka, Latest News : हिटॅमन रोहित शर्मा ठरला सुपर 'हिट' 

विश्वचषक सामन्यांमध्ये सर्वाधिक सहा विश्वचषक शतकांचा सचिन तेंडुलकरचा विक्रम रोहितने गाठला आहे.

By ऑनलाइन लोकमत | Published: July 6, 2019 09:46 PM2019-07-06T21:46:14+5:302019-07-06T21:46:54+5:30

whatsapp join usJoin us
India vs Sri Lanka, Latest News: Hitman Rohit Sharma become Super Hit ' | India Vs Sri Lanka, Latest News : हिटॅमन रोहित शर्मा ठरला सुपर 'हिट' 

India Vs Sri Lanka, Latest News : हिटॅमन रोहित शर्मा ठरला सुपर 'हिट' 

whatsapp join usJoin usgoogleNewsNext

ललित झांबरे, आयसीसी वर्ल्ड कप 2019 :  विश्वचषक 2019 मध्ये  रोहित शर्माने आठच डावातील आपले  पाचवे शतक झळकावले. त्याने दक्षिण आफ्रिकेविरुध्द नाबाद 122, पाकिस्तानविरुध्द 140, इंग्लंडविरुध्द 102, बांगलादेशविरुध्द 104 आणि आता श्रीलंकेविरुध्द १०३ धावांची खेळी केली आहे. 


यंदाची विश्वचषक स्पर्धा सुरु होण्याआधी श्रीलंकेचा कुमार संगकारा म्हणाला होता की, एकाच स्पर्धेत सर्वाधिक चार शतके झळकावण्याचा आपला विक्रम विराट कोहली मोडू शकतो, पण  ही अपेक्षा व्यक्त करताना संघकाराने ज्याचा विचारही केला नाही त्या रोहितने आता पाचव्या शतकासह एकाच विश्वचषकात सर्वाधिक शतके करण्याचा त्याचा विक्रम मोडला आहे. संघकाराने 2015 च्या स्पर्धेत लागोपाठ चार शतकं केली होती, लगोपाठ चार शतकांचा विक्रमही रोहितच्या आता आवाक्यात आहे कारण त्याने लागोपाठ तीन शतके झळकावलीच आहेत आणि उपांत्य सामन्यातही शतक केले तर संघकाराच्या लागोपाठ चार शतकांच्या विक्रमाची बरोबरी होईल.

आता एकूणच विश्वचषक सामन्यांमध्ये सर्वाधिक सहा विश्वचषक शतकांचा सचिन तेंडुलकरचा विक्रम रोहितने गाठला आहे. पोटंग व संघकाराच्या नावावर एकूण पाच विश्वचषक शतके आहेत. मात्र या सर्व शतकवीरांमध्ये रोहितचा वेग भन्नाट आहे. त्याने विश्वचषकाच्या 1६ डावातच ही सहा शतके केली आहेत. इतर तिघांना त्यासाठी 35 च्या वर डाव लागले आहेत. 


शतकं   डाव    फलंदाज
६         १६     रोहित शर्मा
६         ४४     सचिन तेंडुलकर
५         ३५     कुमार संगकारा
५         ४२     रिकी पॉटींग

 

रोहित शर्माने घडवला विश्वचषकात इतिहास
विश्वचषकात पाचवे ऐतिहासिक शतक रचले ते भारताचा सलामीवीर रोहित शर्माने. श्रीलंकेविरुद्धच्या सामन्यात रोहितने दमदार शतक झळकावले. रोहितचे हे या विश्वचषकातील पाचवे शतक ठरले. विश्वचषकात पाच शतक झळकावणारा रोहित हा पहिलाच फलंदाज ठरला आहे. रोहितने यावेळी श्रीलंकेच्या कुमार संगकाराचा विश्वविक्रम मोडीत काढला आहे. संगकाराने २०१५च्या विश्वचषकात चार शतके लगावली होती. 


अर्धशतकासह रोहित शर्मा पुन्हा ठरला अव्वल
श्रीलंकेविरुद्धच्या सामन्यात अर्धशतक झळकावत भारताचा सलामीवीर रोहित शर्मा पुन्हा एकदा अव्वल ठरला आहे. आता या सामन्यातही शतक झळकावत रोहित क्रिकेट विश्वातील इतिहासाला गवसणी घालणार का, याकडे साऱ्यांचे लक्ष लागून राहिलेले आहे.

श्रीलंकेने भारतापुढे विजयासाठी 265 धावांचे आव्हान ठेवले. या आव्हानाचा पाठलाग करताना रोहितने अर्धशतक झळकावत संघाला दमदार सुरुवात करून दिली. या अर्धशतकासह रोहित यंदाच्या विश्वचषकातील सर्वाधिक धावा करणाऱ्या फलंदाजांच्या यादीत अव्वल स्थानावर पोहोचला आहे. हा सामना सुरु होण्यापूर्वी या यादीमध्ये बांगलादेशचा शकिब अल हसन हा ६०६ धावांसह अव्वल स्थानावर होता. त्यावेळी रोहित हा ५४४ धावांसह दुसऱ्या स्थानावर होता. त्यामुळे या सामन्यात ६३ धावा करत रोहितने या यादीमध्ये अव्वल स्थान पटकावले आहे.

Web Title: India vs Sri Lanka, Latest News: Hitman Rohit Sharma become Super Hit '

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.