India vs New Zealand T20 : नावीन्यपूर्ण फटक्यासह रिषभ पंत भारतीय संघात परतला, Video

India vs New Zealand T20 : भारत-न्यूझीलंड यांच्यातील ट्वेंटी-20 मालिकेलीत पहिला सामना बुधवारी खेळवला जाणार आहे.

By ऑनलाइन लोकमत | Published: February 5, 2019 11:52 AM2019-02-05T11:52:13+5:302019-02-05T12:02:53+5:30

whatsapp join usJoin us
India vs New Zealand T20 : Rishabh Pant joins Team India in New Zealand to gear up for T20I series | India vs New Zealand T20 : नावीन्यपूर्ण फटक्यासह रिषभ पंत भारतीय संघात परतला, Video

India vs New Zealand T20 : नावीन्यपूर्ण फटक्यासह रिषभ पंत भारतीय संघात परतला, Video

whatsapp join usJoin usgoogleNewsNext
ठळक मुद्देभारत-न्यूझीलंड यांच्यातील ट्वेंटी-20 मालिकेलीत पहिला सामना बुधवारी खेळवला जाणार आहे. वन डे मालिकेत विश्रांती मिळालेला रिषभ पंत ट्वेंटी-20 मालिकेत परतलाअंतिम अकरामध्ये स्थान मिळवण्याठी चुरस

वेलिंग्टन, भारत विरुद्ध न्यूझीलंड :  भारत-न्यूझीलंड यांच्यातील ट्वेंटी-20 मालिकेलीत पहिला सामना बुधवारी खेळवला जाणार आहे. आतापर्यंत भारत आणि न्यूझीलंड यांच्यामधील ट्वेंटी-20 सामन्यांमध्ये यजमानांचे पारडे जड आहे. भारत आणि न्यूझीलंड यांच्यामध्ये आतापर्यंत 9 ट्वेंटी-20 सामने झाले आहेत आणि त्यापैकी न्यूझीलंडने सहा लढतींमध्ये विजय मिळवला आहे. पण, यंदा भारतीय संघ यजमानांना लोळवण्याच्याच तयारीत आहे. वन डे मालिकेत विश्रांती देण्यात आलेला रिषभ पंत ट्वेंटी-20 मालिकेसाठी संघात परतला आहे. पण, संघातील स्थान पक्के करण्यासाठी त्याने नावीण्यपूर्ण फटक्याचा शोध लावला आहे आणि मंगळवारी नेटमध्ये त्या फटक्याचा कसून सरावही त्याने केला.

तीन सामन्यांच्या मालिकेसाठी रिषभ पंत न्यूझीलंडमध्ये दाखल झाला आहे. ऑस्ट्रेलिया आणि न्यूझीलंडविरुद्धच्या वन डे मालिकेत पंतला विश्रांती देण्यात आली होती. त्या मालिकेत अनुभवी यष्टिरक्षक महेंद्रसिंग धोनी संघात परतला होता. न्यूझीलंडमध्ये दाखल होताच, पंतने नेट्समध्ये फलंदाजीचा सराव केला. वैविध्यपूर्ण फलंदाज म्हणून ओळख असलेल्या पंतने नेट्समध्येही नावीण्यपूर्ण फटकेबाजी केली. बीसीसीआयने त्याच्या फटकेबाजीचा व्हिडीओ पोस्ट केला. 



ऑस्ट्रेलियातून मायदेशात परतलेल्या पंतने भारत A संघाचे प्रतिनिधित्व करताना इंग्लंड लायन्स संघाविरुद्धच्या वन डे सामन्यात नाबाद 73 धावांची खेळी करताना संघाला चौथा सामना जिंकून दिला होता. पंतसह भारताच्या गोलंदाजांनीही कसून सराव केला. धोनी आणि केदार जाधव यांनी बॅटवर हात साफ केले. दिनेश कार्तिक, विजय शंकर, हार्दिक पांड्या, कुलदीप यादव आणि रोहित शर्मा यांनीही सराव केला. विराट कोहलीच्या अनुपस्थितीत रोहित ट्वेंटी-20 मालिकेत भारतीय संघाचे नेतृत्व करणार आहे. 
 

पंतच्या नावीण्यपूर्ण फटक्याचा व्हिडीओ पाहा... 



भारतीय संघ : रोहित शर्मा ( कर्णधार), शिखर धवन, रिषभ पंत, दिनेश कार्तिक, केदार जाधव, महेंद्रसिंग धोनी, कृणाल पांड्या, कुलदीप यादव, युजवेंद्र चहल, भुवनेश्वर कुमार, सिद्धार्थ कौल, खलिल अहमद, शुबमन गिल, विजय शंकर, हार्दिक पांड्या. 

Web Title: India vs New Zealand T20 : Rishabh Pant joins Team India in New Zealand to gear up for T20I series

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.