India vs New Zealand 2nd T20 : रोहित शर्माने रचला विश्वविक्रम, तुम्हाला माहिती आहे का...

दुसऱ्या ट्वेन्टी-20 सामन्यात रोहितने अर्धशतकी खेळी साकारत विश्वविक्रमाला गवसणी घातली आहे.

By ऑनलाइन लोकमत | Published: February 8, 2019 02:07 PM2019-02-08T14:07:02+5:302019-02-08T14:07:38+5:30

whatsapp join usJoin us
India vs New Zealand 2nd T20: A New World Record of Rohit Sharma | India vs New Zealand 2nd T20 : रोहित शर्माने रचला विश्वविक्रम, तुम्हाला माहिती आहे का...

India vs New Zealand 2nd T20 : रोहित शर्माने रचला विश्वविक्रम, तुम्हाला माहिती आहे का...

whatsapp join usJoin usgoogleNewsNext

ऑकलंड, भारत विरुद्ध न्यूझीलंड : भारताचा कर्णधार आणि सलामीवीर रोहित शर्माने नावावर एक नवा विश्वविक्रम रचला आहे. न्यूझीलंडविरुद्धच्या दुसऱ्या ट्वेन्टी-20 सामन्यात रोहितने अर्धशतकी खेळी साकारत विश्वविक्रमाला गवसणी घातली आहे.

रोहितने या सामन्यात 29 चेंडूंत तीन चौकार आणि चार षटकारांच्या जोरावर 50 धावांची धडाकेबाज खेळी साकारली. या खेळीसह आंतरराष्ट्रीय ट्वेन्टी-20 सामन्यांमध्ये रोहितच्या सर्वाधिक धावा झाल्या आहेत. यापूर्वी हा विश्वविक्रम न्यूझीलंडच्या मार्टीन गप्तीलच्या नावावर होता.


या सामन्यातील अर्धशतकासह रोहितच्या आंतरराष्ट्रीय ट्वेन्टी-20 सामन्यात 2288 धावा झाल्या आहेत. गप्तीलच्या नावावर यापूर्वी 2272 धावा होत्या. त्यामुळे आंतरराष्ट्रीय ट्वेन्टी-20 क्रिकेटमध्ये सर्वाधिक धावा आता रोहितच्या नावावर आहेत.

Web Title: India vs New Zealand 2nd T20: A New World Record of Rohit Sharma

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.