India vs New Zealand 2nd ODI: हार्दिक पांड्याच्या एन्ट्रीमुळे दुसऱ्या सामन्यात भारतीय संघात बदल, कोण IN, कोण OUT?

India vs New Zealand 2nd ODI: कॉफी विथ करण 6 कार्यक्रमातील विधानामुळे भारतीय क्रिकेटपटू हार्दिक पांड्या व लोकेश राहुल यांच्यावर घालण्यात आलेले निलंबन मागे घेण्यात आले आहे.

By ऑनलाइन लोकमत | Published: January 25, 2019 12:06 PM2019-01-25T12:06:46+5:302019-01-25T12:12:19+5:30

whatsapp join usJoin us
India vs New Zealand 2nd ODI: Predicting Virat Kohli and Co's playing XI for Bay Oval clash | India vs New Zealand 2nd ODI: हार्दिक पांड्याच्या एन्ट्रीमुळे दुसऱ्या सामन्यात भारतीय संघात बदल, कोण IN, कोण OUT?

India vs New Zealand 2nd ODI: हार्दिक पांड्याच्या एन्ट्रीमुळे दुसऱ्या सामन्यात भारतीय संघात बदल, कोण IN, कोण OUT?

whatsapp join usJoin usgoogleNewsNext
ठळक मुद्देभारत-न्यूझीलंड दुसरा वन डे सामना शनिवारीहार्दिक पांड्याता न्यूझीलंड दौऱ्यात खेळण्याचा मार्ग मोकळाभारताने पहिल्या सामन्यात 8 विकेट राखून मिळवला विजय

माऊंट मौंगानूई, भारत विरुद्ध न्यूझीलंड : कॉफी विथ करण 6 कार्यक्रमातील विधानामुळे भारतीय क्रिकेटपटू हार्दिक पांड्या व लोकेश राहुल यांच्यावर घालण्यात आलेले निलंबन मागे घेण्यात आले आहे. बीसीसीआयच्या कारवाईमुळे पांड्या व राहुल यांना ऑस्ट्रेलिया दौऱ्यातून माघारी बोलावण्यात आले होते. मात्र, आता न्यूझीलंड दौऱ्यासाठीचा मार्ग मोकळा झाला आहे. त्यामुळे पांड्या न्यूझीलंडविरुद्धच्या दुसऱ्या वन डे साठी संघात खेळण्यासाठी मोकळा झाला आहे, तर राहुल भारत A संघाकडून इंग्लंड लायन्स संघाविरुद्ध खेळणार आहे.



भारत आणि न्यूझीलंड यांच्यातील दुसरा वन डे सामना शनिवारी माऊंट मोंगानूई येथे होणार आहे. मात्र, या सामन्यात 25 वर्षीय पांड्याची खेळण्याची शक्यता कमीच आहे. त्यामुळे संघात अष्टपैलू खेळाडू म्हणून विजय शंकरची निवड पक्की आहे. भारतीय संघाने पहिल्याच सामन्यात आठ विकेट राखून विजय मिळवला होता. पाच सामन्यांच्या मालिकेत भारताकडे 1-0 अशी आघाडी आहे आणि शनिवारी ती वाढवण्याचा त्यांचा प्रयत्न असेल. 

राहुल याच्या जागी संघात स्थान मिळावलेल्या शुबमन गिलला पदार्पणासाठी आणखी प्रतीक्षा पाहावी लागेल. या दौऱ्यातील अखेरच्या दोन वन डे सामन्यात कर्णधार विराट कोहलीला विश्रांती देण्यात आल्यामुळे गिलला चौथ्या सामन्यात संधी मिळू शकते. पहिल्या वन डेत कुलदीप यादव आणि युजवेंद्र चहल यांनी मिळून सहा विकेट्स घेतल्या त्यामुळे दुसऱ्या वन डेत हीच जोडी कायम असे शकते. अशा परिस्थितीत रवींद्र जडेजाला पुन्हा बाकावर बसावे लागेल.

दुसऱ्या वन डे साठी भारताचा संभाव्य संघ : शिखर धवन, रोहित शर्मा, विराट कोहली, महेंद्रसिंग धोनी, केदार जाधव, अंबाती रायुडू, भुवनेश्वर कुमार, विजय शंकर, मोहम्मद शमी, युजवेंद्र चहल, कुलदीप यादव. 

 

Web Title: India vs New Zealand 2nd ODI: Predicting Virat Kohli and Co's playing XI for Bay Oval clash

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.