India vs England : विराssट... पाच कसोटीत जमलं नव्हतं, ते एकाच डावात करून दाखवलं!

कोहलीने इंग्लंडच्या गोलंदाजीसमोर चिवट झुंज दिली.

By ऑनलाइन लोकमत | Published: August 3, 2018 09:42 AM2018-08-03T09:42:09+5:302018-08-03T10:44:53+5:30

whatsapp join usJoin us
India vs England : Virat Kohli Scores 22nd Test Hundred | India vs England : विराssट... पाच कसोटीत जमलं नव्हतं, ते एकाच डावात करून दाखवलं!

India vs England : विराssट... पाच कसोटीत जमलं नव्हतं, ते एकाच डावात करून दाखवलं!

whatsapp join usJoin usgoogleNewsNext

कर्णधार विराट कोहलीने ठोकलेल्या नाबाद ११२ धावांच्या शतकी खेळीने भारताने इंग्लंडविरुद्धच्या पहिल्या कसोटी सामन्यात ९ बाद २३७ धावांपर्यंत मजल मारली. विराट कोहलीने आपल्या कार्यकिर्दीतील २२ वे शतक केले. कोहलीने इंग्लंडच्या गोलंदाजीसमोर चिवट झुंज दिली.  विराटने २२५ चेंडूंचा सामना करताना १४९ धावा केल्या.

दरम्यान,  इंग्लंडच्या दौ-यात भारताचा कर्णधार विराट कोहली किती धावा करतो, यावर सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे. इंग्लंडविरुद्धच्या पहिल्या कसोटी सामन्यात आपल्या शंभराव्या चेंडूवर कोहलीने चौकारासह अर्धशतक पूर्ण केले. नंतर त्याने १९१ चेंडूत आपले नाबाद शतकही पूर्ण केले. इंग्लंडमधील कसोटी सामन्यांतील कोहलीची सर्वाधिक खेळी ठरली आहे.

(India vs England : पहिल्या पेपरमध्ये विराट पास बाकीचे फेल!)

कोहलीला इंग्लंडच्या २०१४ साली झालेल्या दौ-यातील पाच सामन्यांमध्ये फक्त १३४ धावाच करता आल्या होत्या. गेल्या दौºयात कोहलीने अनुक्रमे ३९, २८, २५, २०, ८, ७, ६, १, 0, 0 अशा धावा केल्या होत्या. त्यामुळे इंग्लंडमधील कसोटी सामन्यांत कोहलीचे हे पहिले अर्धशतक ठरले आहे. कोहलीने आपल्या शंभराव्या चेंडूवर बेन स्टोक्सच्या गोलंदाजीवर चौकार वसूल केला आणि आपले पहिले-वहिले शतक साजरे केले.

Web Title: India vs England : Virat Kohli Scores 22nd Test Hundred

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.