India vs England Test 2018: रन बनवशील झिरो, तर कसा होशील हिरो... शिखर धवन झाला ट्रोल

धवनने आपला एक फोट ट्विटरवर शेअर केला आणि त्यानंतर क्रिकेट चाहत्यांनी त्याच्यावर टीकेचा भडीमार सुरु केला.

By ऑनलाइन लोकमत | Published: July 30, 2018 01:45 PM2018-07-30T13:45:11+5:302018-07-30T13:46:17+5:30

whatsapp join usJoin us
India vs England Test 2018: Runs scored Zero, how you will be the hero ... Shikhar Dhawan Troll | India vs England Test 2018: रन बनवशील झिरो, तर कसा होशील हिरो... शिखर धवन झाला ट्रोल

India vs England Test 2018: रन बनवशील झिरो, तर कसा होशील हिरो... शिखर धवन झाला ट्रोल

whatsapp join usJoin usgoogleNewsNext
ठळक मुद्देफोटखाली धवनने ' कैसे ना हो गुजारा... जब साथ हो कोहली और पुजारा' अशी ओळ लिहिली आहे.

लंडन : भारत आणि इंग्लंड यांच्यातील पहिला कसोटी सामना आता काही दिवसांवर येऊन ठेपला आहे. पण त्यापूर्वीच भारताचा सलामीवीर शिखर धवन समाजमाध्यमांवर ट्रोल व्हायला सुरुवात झाली आहे. धवनने आपला एक फोट ट्विटरवर शेअर केला आणि त्यानंतर क्रिकेट चाहत्यांनी त्याच्यावर टीकेचा भडीमार सुरु केला.

धवनने भारत आणि इसेक्स यांच्यातीन सराव सामन्याचा एक फोटो आपल्या ट्विटर हँडलवर शेअर केला. या फोटोमध्ये धवनच्या बाजूला कर्णधार विराट कोहली आणि चेतेश्वर पुजारा दिसत आहे. धवन हा या दोघांमध्ये भांगडा नृत्य करताना दिसत आहे. या फोटखाली धवनने ' कैसे ना हो गुजारा... जब साथ हो कोहली और पुजारा' अशी ओळ लिहिली आहे. त्याच्या या फोटोवर चाहत्यांनी टीका केली आहे.



इसेक्सविरुद्धच्या सराव सामन्यात धवनला दोन्ही डावांत भोपळा फोडता आला नव्हता. त्यामुळे चाहत्यांनी फक्त फोटो  काढून काही होत नाही, चांगल्या धावाही कराव्या लागतात, असं सुनावलं आहे. एका चाहत्याने तर ' रन बनवशील झिरो, तर कसा होशील हिरो ' या शब्दांत धवनवर टीका केली आहे.

Web Title: India vs England Test 2018: Runs scored Zero, how you will be the hero ... Shikhar Dhawan Troll

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.