India vs England: अॅलिस्टर कुकच्या निवृत्तीचं गुपीत उलगडलं

कुक अवढा फिट असून निवृत्त का होतोय, असे प्रश्नही चाहत्यांनी विचारले. पण आता कुकच्या निवृत्तीमागील गुपित उलगडलं आहे.

By ऑनलाइन लोकमत | Published: September 6, 2018 03:00 PM2018-09-06T15:00:44+5:302018-09-06T15:06:07+5:30

whatsapp join usJoin us
India vs England: Alistair Cook's retirment secret is unraveled | India vs England: अॅलिस्टर कुकच्या निवृत्तीचं गुपीत उलगडलं

India vs England: अॅलिस्टर कुकच्या निवृत्तीचं गुपीत उलगडलं

whatsapp join usJoin usgoogleNewsNext
ठळक मुद्देदस्तुरखुद्द कुकनेच निवृत्तीबाबत खुलासा केला आहे.

लंडन, भारत विरुद्ध इंग्लंड : इंग्लंडचा माजी कर्णधार आणि फलंदाज अॅलिस्टर कुकने निवृत्तीचा निर्णय घेतला आणि अनेकांनी भुवया उंचावल्या. कुक एवढा फिट असून निवृत्त का होतोय, असे प्रश्नही चाहत्यांनी विचारले. पण आता कुकच्या निवृत्तीमागील गुपित उलगडलं आहे. दस्तुरखुद्द कुकनेच निवृत्तीबाबत खुलासा केला आहे.

भारताविरुद्धच्या पाचव्या कसोटी सामन्यानंतर कुक निवृत्त होणार आहे. इंग्लंडचा यशस्वी कर्णधार आणि सर्वाधिक धावा करणा फलंदाज, अशी त्याची ओळख आहे. कुक हा भारताचा माजी महान फलंदाज सचिन तेंडुलकरचे काही विक्रम मोडू शकतो, असे काही जणांना वाटले होते. पण आता निवृत्तीनंतर सचिनच्या चाहत्यांनी सुटकेचा निश्वास टाकला आहे.

निवृत्तीच्या निर्णयाबाबत कुक म्हणाला की, " आतापर्यंतच्या क्रिकेट कारकिर्दीमध्ये मी नेहमीच मानसीकरीत्या सक्षम होतो. पण यापुढे मी मानसीकरीत्या सक्षम राहीन की नाही, हे माहिती नाही. त्यामुळेच मी निवृत्तीचा निर्णय घेतला आहे." 

Web Title: India vs England: Alistair Cook's retirment secret is unraveled

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.