India vs Australia : धोनी जे बोलतो, ते मी डोळे बंद करून करतो, सांगतोय मॅच विनर केदार जाधव

धोनी जे बोलतो, ते मी डोळे बंद करून करतो, हा विश्वासही त्याने व्यक्त केला.

By ऑनलाइन लोकमत | Published: March 3, 2019 02:32 PM2019-03-03T14:32:18+5:302019-03-03T14:33:18+5:30

whatsapp join usJoin us
India vs Australia: ms Dhoni speaks, I close my eyes and do the things match winner Kedar Jadhav said | India vs Australia : धोनी जे बोलतो, ते मी डोळे बंद करून करतो, सांगतोय मॅच विनर केदार जाधव

India vs Australia : धोनी जे बोलतो, ते मी डोळे बंद करून करतो, सांगतोय मॅच विनर केदार जाधव

whatsapp join usJoin usgoogleNewsNext

हैदराबाद, भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया : शनिवारी झालेल्या ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या पहिल्या एकदिवसीय सामन्यात भारताचा केदार जाधव मॅच विनर ठरला. या सामन्यात केदारने धोनीच्या साथीने अभेद्य शतकी भागीदारी रचली आणि भारताच्या विजयावर शिक्कामोर्तब केले. या सामन्यानंतर केदारची एक मुलाखत झाली. त्यामध्ये त्याने या भागीदारीचे वर्णन केले. त्याचबरोबर धोनी जे बोलतो, ते मी डोळे बंद करून करतो, हा विश्वासही त्याने व्यक्त केला.

यापूर्वीही बऱ्याचदा केदार आणि धोनी यांनी भारताला सामने जिंकून दिले आहेत. या दोघांची केमिस्ट्री चांगलीच जुळते. याबद्दल केदारला विचारले असता त्याने धोनीवर पूर्णपणे विश्वास असल्याचे सांगितले आहे. धोनी जे बोलतो, त्यावर कोणताही विचार मी करत नाही. धोनी नेहमीच योग्य बोलतो. त्यामुळे मी त्याच्या बोलण्याचा मान ठेवतो आणि डोळे बंद करून ती गोष्ट करण्याचा प्रयत्न करतो, असे केदारने या मुलाखतीमध्ये स्पष्ट केले आहे.

पाहा खास व्हिडीओ



 महेंद्रसिंग धोनी हा जगातील सर्वात चांगला फिनीशर का आहे, याचे उत्तर ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या पहिल्या एकदिवसीय सामन्यात मिळाले. विराट कोहली, रोहित शर्मा, शिखर धवन हे नावाजलेले फलंदाज शंभरी पार होण्यापूर्वीच बाद झाले होते. पण धोनीने केदार जाधवच्यासाथीने भारताला विजय मिळवून दिला. ऑस्ट्रेलियाने भारतापुढे २३७ धावांचे आव्हान ठेवले होते. भारताने हे आव्हान सहा विकेट्स राखून पूर्ण केले.

आव्हानाचा पाठलाग करताना भारताला सुरुवातीलाच मोठा धक्का बसला. शिखर धवनला यावेळी भोपळाही फोडता आला नाही. त्यानंतर रोहित आणि कोहली यांनी ७६ धावांची भागीदारी रचली. पण हे दोघे १५ धावांच्या फरकाने बाद झाले. त्यानंतर अंबाती रायुडूही झटपट बाद झाला आणि भारताची ४ बाद ९९ अशी अवस्था झाली. त्यानंतर धोनीने केदारला साथीला घेत भारताला विजय मिळवून दिला. केदारने या सामन्यात  ८७ चेंडूंमध्ये ९ चौकार आणि एका षटकाराच्या जोरावर नाबाद ८१ धावा केल्या. धोनीने ७२ चेंडूंमध्ये सहा चौकार आणि एका षटकाराच्या मदतीने नाबाद ५९ धावा केल्या.

 



 


झेल सुटला आणि स्टेडियममध्ये धोनी, धोनी हा नाद घुमला...
महेंद्रसिंग धोनी हा एक निष्णात यष्टीरक्षक आहे. पण ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या पहिल्या एकदिवसीय सामन्यात एक झेल सुटला आणि स्टेडियममध्ये धोनी, धोनी हा नाद घुमला. 

ही गोष्ट आहे ३८व्या षटकातली. या षटकातील दुसऱ्या चेंडूवर धोनीने मिड ऑनला षटकार लगावला. त्यानंतरच्या चेंडूवर धोनीचा झेल उडाला होता. हा झेल टिपण्यासाठी मार्कस स्टॉइनिस झेपावला. हा चेंडू स्टॉइनिसने टिपला. त्यावेळी प्रेक्षकांना वाटले की धोनी बाद झाला. पण मैदानावरील पंच कुमार धर्मसेना यांनी यावेळी तिसऱ्या पंचांची मदत घेण्याचे ठरवले. तिसऱ्या पंचांनी अॅक्शन रिप्लेमध्ये पाहिले तेव्हा हा चेंडू प्रथम जमिनीला लागला होता आणि त्यानंतर तो स्टॉइनिसच्या हातामध्ये विसावला होता. हे पाहून तिसऱ्या पंचांनी धोनीला नाबद ठरवले. धर्मसेना यांनी जेव्हा धोनी नाबाद असल्याचे सांगितले तेव्हा मैदानात धोनी, धोनी हा नाद घुमायला सुरुवात झाली.

Web Title: India vs Australia: ms Dhoni speaks, I close my eyes and do the things match winner Kedar Jadhav said

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.