IND vs AUS 3rd Test : रवी शास्त्रींना विजयाची झिंग; सार्वजनिक ठिकाणी घेतली बिअर

41 वर्षांत प्रथमच भारताने ऑस्ट्रेलियात 2 कसोटी जिंकण्याचा पराक्रम केला. त्यामुळे भारतीय खेळाडूंच्या आनंदाला उधाण आलं आहे. मुख्य प्रशिक्षक रवी शास्त्री हेही भलतेच आनंदात आहेत आणि त्यांना सार्वजनिक ठिकाणी कसं वागावं याचं भानं राहिलेलं नाही.

By ऑनलाइन लोकमत | Published: December 30, 2018 06:37 PM2018-12-30T18:37:10+5:302018-12-30T20:43:39+5:30

whatsapp join usJoin us
India vs Australia 3rd Test: Head Coach Ravi Shastri spotted drinking beer after 137-run win -Video | IND vs AUS 3rd Test : रवी शास्त्रींना विजयाची झिंग; सार्वजनिक ठिकाणी घेतली बिअर

IND vs AUS 3rd Test : रवी शास्त्रींना विजयाची झिंग; सार्वजनिक ठिकाणी घेतली बिअर

whatsapp join usJoin usgoogleNewsNext
ठळक मुद्देमुख्य प्रशिक्षक रवी शास्त्री हेही भलतेच आनंदात आहेत आणि त्यांना सार्वजनिक ठिकाणी कसं वागावं याचं भानं राहिलेलं नाही. शास्त्री गुरुजी सार्वजनिक ठिकाणी बिअर प्यायले आणि त्यांचा हा व्हिडीओ चांगलाच व्हायरल होत आहे. सामना विजयानंतर भारतीय संघ हॉटेलमध्ये परतले. त्यावेळी हॉटेलबाहेर भारतीय चाहते खेळाडूंचे स्वागत करण्यासाठी उपस्थित होते.

मेलबर्न, भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया : भारतीय संघाने बॉक्सिंग डे कसोटीत विजय मिळवून मालिकेत 2-1 अशी आघाडी घेतली आहे. भारतीय संघाने मेलबर्न कसोटीत यजमान ऑस्ट्रेलियावर 137 धावांनी विजय मिळवला. 41 वर्षांत प्रथमच भारताने ऑस्ट्रेलियात 2 कसोटी जिंकण्याचा पराक्रम केला. त्यामुळे भारतीय खेळाडूंच्या आनंदाला उधाण आले आहे. मुख्य प्रशिक्षक रवी शास्त्री हेही भलतेच आनंदात आहेत आणि त्यांना सार्वजनिक ठिकाणी कसं वागावं याचं भानं राहिलेलं नाही. शास्त्री गुरुजी सार्वजनिक ठिकाणी बिअर प्यायले आणि त्यांचा हा व्हिडीओ चांगलाच व्हायरल होत आहे. 
 
सामना विजयानंतर भारतीय संघ हॉटेलमध्ये परतला. त्यावेळी हॉटेलबाहेर भारतीय चाहते खेळाडूंचे स्वागत करण्यासाठी उपस्थित होते. संघाची बस जवळ येताच त्यांनी ढोल वाजवत नाचायला सुरुवात केली. बसमधून शास्त्री पहिले उतरले आणि त्यांच्या हाताय बिअरची बॉटल होती. ते बिअर पीतचं हॉटेलच्या दिशेने गेले. त्यांचे हे कृत्य व्हिडीओत कैद झाले. शास्त्री यांच्यानंतर संघातील खेळाडू बसमधून बाहेर आले आणि कर्णधार विराट कोहली, हार्दिक पांड्या यांच्यासह काही खेळाडूंनी चाहत्यांसोबत ठेकाही धरला.



 

 

Web Title: India vs Australia 3rd Test: Head Coach Ravi Shastri spotted drinking beer after 137-run win -Video

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.