IND vs AUS 2nd T20 : पावसाची फटकेबाजी, दुसरा ट्वेंटी-20 सामना रद्द

मेलबर्न, भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया : तीन ट्वेंटी-20 सामन्यांच्या मालिकेत यजमान ऑस्ट्रेलियाने पहिली लढत जिंकून 1-0 अशी आघाडी घेतली आहे. ...

By ऑनलाइन लोकमत | Published: November 23, 2018 12:39 PM2018-11-23T12:39:48+5:302018-11-23T16:38:34+5:30

whatsapp join usJoin us
IND vs AUS 2nd T20 : पावसाची फटकेबाजी, दुसरा ट्वेंटी-20 सामना रद्द | IND vs AUS 2nd T20 : पावसाची फटकेबाजी, दुसरा ट्वेंटी-20 सामना रद्द

IND vs AUS 2nd T20 : पावसाची फटकेबाजी, दुसरा ट्वेंटी-20 सामना रद्द

whatsapp join usJoin usgoogleNewsNext

मेलबर्न, भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया : तीन ट्वेंटी-20 सामन्यांच्या मालिकेत यजमान ऑस्ट्रेलियाने पहिली लढत जिंकून 1-0 अशी आघाडी घेतली आहे. अखेरच्या षटकापर्यंत रंगलेल्या सामन्यात भारताला पराभव पत्करावा लागला होता. त्यामुळे मालिका वाचवण्यासाठी भारतीय संघाचा मेलबर्नवर चांगलाच घाम गाळावा लागणार आहे. मात्र, दुसऱ्या सामन्याला विलंब होण्याची शक्यता आहे. पावसाच्या आगमनाने खेळपट्टी झाकून ठेवण्यात आली आहे. भारतीय संघाने नाणेफेक जिंकून प्रथम क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतला आहे. पहिल्या सामन्यातील संघच याही सामन्यात कायम राखला आहे. मात्र पावसामुळे हा सामना रद्द करावा लागला.
 

04:36 PM

ऑस्ट्रेलियाला पावसाचा फायदा



 

04:36 PM

पावसामुळे दुसरा ट्वेंटी-20 सामना रद्द, ऑस्ट्रेलियाकडे 1-0 अशी आघाडी



 

03:36 PM

भारतीय फलंदाज मैदानावर आले अन् पुन्हा पावसाची सुरुवात



 

03:31 PM

भारतासमोर 19 षटकांत 137 धावांचे लक्ष्य



 

02:53 PM

कृणाल पांड्याचा मॅजिक बॉल पाहा



 

02:52 PM

पावसाचा खेळ चाले, 19 षटकानंतर खेळ थांबवला

19व्या षटकात पावसाचे आगमन झाल्याने खेळ थांबवण्यात आला. 

02:50 PM

19व्या षटकात पावसाचे आगमन, ऑस्ट्रेलिया 7 बाद 132 धावा



 

02:45 PM

ऑस्ट्रेलियाच्या 18 षटकांत 7 बाद 122 धावा

खलीलने टाकलेल्या 18 व्या षटकात 19 धावा चोपल्या.



 

02:36 PM

कोल्टर नाईल बाद, ऑस्ट्रेलियाच्या अडचणीत वाढ



 

02:33 PM

ऑस्ट्रेलियाच्या 15 षटकांत 6 बाद 92 धावा



 

02:25 PM

अॅलेक्स कॅरीचा अडथळा कुलदीपने दूर केला, ऑस्ट्रेलिया 6 बाद 74



 

02:18 PM

कृणाल पांड्याने ऑस्ट्रेलियाचा प्रमुख खेळाडू ग्लेन मॅक्सवेलला बाद केलं



 

02:12 PM

ऑस्ट्रेलियाने दहा षटकांत 4 बाद 54 धावा केल्या आहेत

ग्लेन मॅक्सवेल आणि बेन मॅक्डेर्मोट यांनी ऑस्ट्रेलियाचा डाव सावरण्याचा प्रयत्न केला

02:08 PM

ऑस्ट्रेलियाचे अर्धशतक

ऑस्ट्रेलिया संघाने 8.3 षटकांत 50 धावांचा पल्ला गाठला, परंतु त्यांचे चार फलंदाज माघारी फिरले आहेत.

02:02 PM

ऑस्ट्रेलियाचा कर्णधार अॅरोन फिंचची विकेट पाहा..



 

02:00 PM

जसप्रीत बुमराने ऑस्ट्रेलियाला दिला धक्का, मार्कस स्टाऊनिस बाद



 

01:57 PM

खलील अहमदची प्रभावी गोलंदाजी



 

01:53 PM

खलील अहमदने भारताला आणखी एक विकेट मिळवून दिली



 

01:51 PM

ऑस्ट्रेलियाच्या पाच षटकांत 2 बाद 34 धावा



 

01:43 PM

ऑस्ट्रेलियाला दुसरा धक्का, लीन बाद

खलील अहमदने मिळवून दिले यश, ख्रिस लीन माघारी

01:35 PM

लीनला दुसऱ्यांदा जीवदान

तिसऱ्या षटकात लीनला आणखी एक जीवदान मिळाले. जसप्रीत बुमराने कॅच सोडला.

01:33 PM

ख्रिस लीनचा झेल रिषभ पंतने सोडला

सामन्याच्या तिसऱ्या षटकात भुवनेश्वर कुमारच्या गोलंदाजीवर ख्रिस लीनचा झेल रिषभ पंतने सोडला

01:25 PM

ऑस्ट्रेलियाला पहिला धक्का, फिंच बाद



 

12:59 PM

पहिल्या सामन्यातील संघच याही सामन्यात कायम राखण्यात आला आहे.



 

12:56 PM

भारताने नाणेफेक जिंकली, प्रथम क्षेत्ररक्षणाचा निर्णय



 

12:41 PM

पावसाची लपाछपी



 

Web Title: IND vs AUS 2nd T20 : पावसाची फटकेबाजी, दुसरा ट्वेंटी-20 सामना रद्द

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.