भारताला श्रीलंकेविरुद्ध खेळल्याचा लाभ झाला नाही : हरभजन

दक्षिण आफ्रिकेसारख्या खडतर दौºयापूर्वी भारतीय संघाला श्रीलंकेविरुद्ध मायदेशात मालिका खेळण्याचा फारच कमी लाभ झाला, असे मत सिनिअर आॅफस्पिनर हरभजन सिंगने व्यक्त केले.

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 22, 2018 01:49 AM2018-01-22T01:49:56+5:302018-01-22T02:19:36+5:30

whatsapp join usJoin us
 India has not benefited from playing against Sri Lanka: Harbhajan | भारताला श्रीलंकेविरुद्ध खेळल्याचा लाभ झाला नाही : हरभजन

भारताला श्रीलंकेविरुद्ध खेळल्याचा लाभ झाला नाही : हरभजन

whatsapp join usJoin usgoogleNewsNext

कोलकाता : दक्षिण आफ्रिकेसारख्या खडतर दौºयापूर्वी भारतीय संघाला श्रीलंकेविरुद्ध मायदेशात मालिका खेळण्याचा फारच कमी लाभ झाला, असे मत सिनिअर आॅफस्पिनर हरभजन सिंगने व्यक्त केले.
भारताने दक्षिण आफ्रिकेविरुद्ध कसोटी मालिका गमावलेली असून, संघावर क्लीन स्विपचे सावट आहे. हरभजनला दक्षिण आफ्रिका दौºयाच्या पार्श्वभूमीवर संघाच्या तयारीबाबत विचारले असता तो म्हणाला, ‘माझ्या मते श्रीलंकेविरुद्ध मायदेशात खेळल्या गेलेल्या मालिकेचा लाभ झाला
नाही. आपल्याला त्यातून काहीच मिळाले नाही. त्याऐवजी काही भारतीय खेळाडू पूर्वीच दक्षिण आफ्रिकेला गेले असते तर चांगले झाले असते. दक्षिण आफ्रिका नाही तर धरमशालाही तयारीसाठी उपयुक्त स्थान ठरले असते.’
सय्यद मुश्ताक अली टी-२० स्पर्धेतील लढतीत सहभागी होण्यासाठी आलेला हरभजन म्हणाला, ‘दक्षिण आफ्रिकेच्या खडतर दौºयापूर्वी धरमशाला येथील थंड वातावरणात वेगवान व उसळी असलेल्या खेळपट्टीवर तयारी करणे अनुकूल ठरले असते.’
कसोटी संघात अजिंक्य रहाणेला स्थान न मिळाल्यामुळे उपस्थित होत असलेल्या प्रश्नांबाबत बोलताना हरभजन म्हणाला, ‘जर रहाणे खेळला असता तरी निकाल काही वेगळा लागला असता, याची कुठलीही हमी देता येणार नाही.’
ंरहाणे संघात असावा किंवा नाही याबाबत वेगवेगळे मतप्रवाह असू शकतात; पण भुवनेश्वर संघात असायला हवा होता, असेही हरभजनने म्हटले आहे.
हरभजनने सांगितले की, ‘आजच्या स्थितीत भुवनेश्वर ईशांतच्या तुलनेत मोठा मॅचविनर आहे. भुवीने चांगली कामगिरी केली तर संघाची कामगिरीही उल्लेखनीय ठरली आहे. अद्याप सर्व काही संपलेले नाही. जोहान्सबर्गमध्ये विजय मिळवत प्रतिष्ठा राखता येईल. संघाने सकारात्मक असायला हवे. जेव्हा गमावण्यासारखे काही नसते त्या वेळी सर्व काही मिळवण्याचा प्रयत्न करायला हवा. त्यामुळे आम्ही विजयासाठी प्रयत्न करायला पाहिजे.’ (वृत्तसंस्था)
मी काही आकडे बघितले आहे. विराट कोहलीच्या नेतृत्वाखाली अजिंक्यची सरासरी ३० कसोटी सामन्यांत ४० पेक्षा कमी आहे. त्याचसोबत त्याने गेल्या वर्षभरात फार अधिक धावा केलेल्या नाहीत. जर रहाणे खेळला असता आणि संघ ०-२ ने पिछाडीवर असता तर आपण रोहितला खेळविण्याची मागणी केली असती. आपल्याला कर्णधाराचा दृष्टिकोन समजून घेणे आवश्यक आहे.
- हरभजनसिंग

Web Title:  India has not benefited from playing against Sri Lanka: Harbhajan

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.