'भारताकडे धोनीशिवाय पर्यायही नाही'

ब्रेबॉर्न स्टेडियमवर झालेला चौथा विंडीजविरुद्धचा एकदिवसीय सामना भारताने सहजपणे जिंकला. तरी अजूनही विंडीजला अखेरचा सामना जिंकून मालिका बरोबरीत सोडवण्याची संधी आहे.

By ऑनलाइन लोकमत | Published: October 31, 2018 04:36 AM2018-10-31T04:36:57+5:302018-10-31T07:05:02+5:30

whatsapp join usJoin us
India has no option but Dhoni | 'भारताकडे धोनीशिवाय पर्यायही नाही'

'भारताकडे धोनीशिवाय पर्यायही नाही'

whatsapp join usJoin usgoogleNewsNext

- अयाझ मेमन

ब्रेबॉर्न स्टेडियमवर झालेला चौथा विंडीजविरुद्धचा एकदिवसीय सामना भारताने सहजपणे जिंकला. तरी अजूनही विंडीजला अखेरचा सामना जिंकून मालिका बरोबरीत सोडवण्याची संधी आहे. पण एकूणच ज्या प्रकारे एकदिवसीय मालिकेत विंडीज संघ खेळला आहे त्याने भारतीय संघाचेही लक्ष वेधले गेले. पहिला सामना मोठ्या फरकाने गमावल्यानंतर विंडीजने दुसरा सामना अनिर्णीत राखला, तर तिसऱ्या सामन्यात विजयाला गवसणी घातली. पण आता या तीन सामन्यांनंतर भारतीय खेळाडूंनी विंडीजच्या खेळाडूंचा चांगला अंदाज घेतला आहे. तरी पाचवा सामना भारत जिंकेल हे ठामपणे सांगता येणार नाही. कारण मर्यादित षटकांच्या क्रिकेटमध्ये विंडीज जबरदस्त आहे.
ब्रेबॉर्नवर रोहितने आपला दणका दाखवलाच. जेव्हा कधी तो शतक झळकावतो तेव्हा तो शतकावर समाधान मानणार नाही असेच दिसते. रोहितचे वैशिष्ट्य म्हणजे तो जेव्हा लयीत येतो तेव्हा फलंदाजी म्हणजे एक पोरखेळ वाटतो. तो पूर्ण लयीत असताना कोणताही गोलंदाज त्याला रोखू शकत नाही. पण तरी फलंदाजीत सर्वांत मोलाचे योगदान ठरले ते अंबाती रायुडूचे. कारण, त्याने शतक झळकावतानाच चौथ्या क्रमांकाचा प्रश्न सोडवला. कर्णधार कोहली व उपकर्णधार रोहितनेही त्यास दुजोरा दिला आहे.

तरी अजूनही भारतीय फलंदाजी म्हणावी तशी मजबूत दिसत नाही. शिखर धवनला चांगल्या सुरुवातीचा फायदा घेण्यात नेहमी अपयश येत आहे. याशिवाय सर्वांत चिंतेचा विषय आहे तो महेंद्रसिंग धोनीचा फॉर्म. ब्रेबॉर्नवर खेळताना त्याला जास्त षटके मिळाली नसली, तरी तो आपल्या जुन्या फॉर्ममध्ये खेळत असल्याचे कधीही वाटले नाही. यामुळेच भारताला अतिरिक्त फलंदाज घेऊन खेळावे लागले. यामुळे गोलंदाजीचा एक पर्याय कमी होतो. तसेच भारताकडे धोनीव्यतिरिक्त दुसरा ठोस पर्यायही नाही. फलंदाजीचा भाग सोडला तर त्याच्यासारखा यष्टीरक्षक दुसरा कोणीच नाही यात वाद नाही. पण फलंदाजीतील त्याचे अपयश पाहता धोनीसाठी बॅकअप कोण असेल यावर संघ व्यवस्थापनाचा भर दिसत आहे. भुवनेश्वरने बºयापैकी मारा केला. याआधी तो महागडा ठरला होता. मुंबईत स्टार ठरला तो खलील अहमद. त्याची शैली जबरदस्त असून तो दोन्ही बाजूने चेंडू स्विंग करतो. यामुळे कदाचित तो विश्वचषक स्पर्धेसाठी संघात स्थान मिळवू शकतो.

(लेखक लोकमतचे संपादकीय सल्लागार आहेत)

Web Title: India has no option but Dhoni

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.