‘भारताने उसळत्या खेळपट्टीचा चांगला सामना केला’  

भारतीय संघाने दक्षिण आफ्रिका दौऱ्यात चांगली कामगिरी केली. त्यांनी विशेष करुन उसळत्या खेळपट्टीचा त्यांनी चांगल्याप्रकारे सामना केला. भविष्यात आता त्यांच्याकडून अशी कामगिरी होतंच राहिल. भारतीय खेळाडू आता अशा उसळी घेणाºया खेळपट्टीवर अधिक आत्मविश्वासाने खेळतील,’ असे मत दक्षिण आफ्रिकेचा स्टार यष्टीरक्षक क्विंटन डीकॉकने व्यक्त केले.

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 11, 2018 12:48 AM2018-05-11T00:48:27+5:302018-05-11T00:48:27+5:30

whatsapp join usJoin us
'India face good bouncing pitch' | ‘भारताने उसळत्या खेळपट्टीचा चांगला सामना केला’  

‘भारताने उसळत्या खेळपट्टीचा चांगला सामना केला’  

whatsapp join usJoin usgoogleNewsNext

मुंबई  - भारतीय संघाने दक्षिण आफ्रिका दौऱ्यात चांगली कामगिरी केली. त्यांनी विशेष करुन उसळत्या खेळपट्टीचा त्यांनी चांगल्याप्रकारे सामना केला. भविष्यात आता त्यांच्याकडून अशी कामगिरी होतंच राहिल. भारतीय खेळाडू आता अशा उसळी घेणाºया खेळपट्टीवर अधिक आत्मविश्वासाने खेळतील,’ असे मत दक्षिण आफ्रिकेचा स्टार यष्टीरक्षक क्विंटन डीकॉकने व्यक्त केले.
आयपीएलमध्ये रॉयल चँलेंजर्स बँगलोरकडून खेळणा-या डीकॉकने गुरुवारी मुंबईत फिरकी गोलंदाजी अचूकपणे खेळण्यास फायदेशीर ठरणाºया एका विशेष मॅटचे अनावरण केले. यावेळी त्याने भारतीय संघाची वेगवान गोलंदाजी सर्वोत्तम असल्याचे मत व्यक्त करत सांगितले की, ‘भारतीय वेगवान मारा जगातील सर्वोत्तम गोलंदाजीपैकी एक आहे. याचा भारताला आगामी इंग्लंड दौºयात फायदा होईल. मी आतापर्यंत ज्या वेगवान माºयाला सामोरा गेलोय, त्यामध्ये भारतीय गोलंदाजी सर्वोत्तम आहे.’
त्याचप्रमाणे, ‘भुवनेश्वर कुमार, जसप्रीत बुमराह, हार्दिक पांड्या, मोहम्मद शमी व इशांत शर्मा सातत्याने चांगली कामगिरी करत आहेत. त्यामुळे इंग्लंडपुढे या गोलंदाजांचा सामना करण्यास अडचण येईल,’ असेही डीकॉक यावेळी म्हणाला.

Web Title: 'India face good bouncing pitch'

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.