भारताचे श्रीलंकेसमोर 376 धावांचे आव्हान; विराट-रोहितची शतकी खेळी

 भारत आणि श्रीलंका यांच्यात सुरु असलेल्या चौथ्या वन-डे सामन्यात भारताने विराट कोहली आणि रोहित शर्मा यांच्या शानदार फलंदाजीच्या जोरावर श्रीलंकेसमोर 376 धावांचे आव्हान दिले आहे.

By ऑनलाइन लोकमत | Published: August 31, 2017 06:19 PM2017-08-31T18:19:05+5:302017-08-31T18:26:38+5:30

whatsapp join usJoin us
India challenge Sri Lanka for 376; Virat-Rohit's century | भारताचे श्रीलंकेसमोर 376 धावांचे आव्हान; विराट-रोहितची शतकी खेळी

भारताचे श्रीलंकेसमोर 376 धावांचे आव्हान; विराट-रोहितची शतकी खेळी

whatsapp join usJoin usgoogleNewsNext

कोलंबो, दि. 31 -  भारत आणि श्रीलंका यांच्यात सुरु असलेल्या चौथ्या वन-डे सामन्यात भारताने विराट कोहली आणि रोहित शर्मा यांच्या शानदार फलंदाजीच्या जोरावर श्रीलंकेसमोर 376 धावांचे आव्हान ठेवले आहे. या सामन्यात भारताने 50 षटकात पाच बाद 375 धावा केल्या आहेत. 
खेळाडूंच्या दुखापती आणि आजाराने ग्रासलेल्या श्रीलंका संघाला सलग चौथ्या वन-डेत एकतर्फी धूळ चारण्याची संधी भारताकडे आहे. महेंद्रसिंह धोनीचा हा 300 वा सामना असल्याने अविस्मरणीय खेळीसह त्याने सामना जिंकून द्यावा, अशीच चाहत्यांची अपेक्षा आहे. टॉस जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतलेल्या भारताने चांगली धावसंख्या केली आहे. सामन्याच्या सुरुवातीला शिखर धवन स्वस्तात बाद झाला असल्याने भारताला पहिलाच फटका बसला. सहा धावांवर भारताने पहिली विकेट गमावली. त्यानंतर रोहित शर्मा आणि विराट कोहलीने दमदार शतकी फलंदाजी केली. रोहित शर्माने 88 चेंडूत 104 धावा केल्या. तर विराट कोहलीने या सामन्यात 76 चेंडूत आपले शतक पूर्ण केले. विराट कोहलीने 17 चौकार आणि दोन षटकार लगावत 96 चेंडूत 131 धावा केल्या. त्याला लसिथ मलिंगाने बाद केले.त्यानंतर हार्दिक पांड्या, लोकेश राहूल लवकर बाद झाले. हार्दिक पांड्याने 19 आणि लोकेश राहूल याने अवघ्या सात धावा केल्या. मनिष पांडेने नाबाद अर्धशतक ठोकले. तर, धोनीने नाबाद 49  धावा केल्या.  
श्रीलंकेकडून अकिला धनंजया याचा अपवाद वगळता, एकाही गोलंदाजाला भारतीय फलंदाजांवर दडपण आणता आले नाही. गोलंदाज लसिथ मलिंगा,अकिला धनंजया, विश्वा फर्नांडो यांनी प्रत्येकी एक बळी टिपला. तर, अँजेलो मॅथ्यूजने दोन बळी टिपले. 

धोनी@ 300! 
पाच वन-डे सामन्यांची मालिका काबीज करीत भारतीय संघाने श्रीलंका दौ-याची मोहीम फत्ते केली. चौथ्या सामन्यात सर्वांच्या नजरा होत्या त्या माहीवर. हा सामना केवळ औपचारिक असला तरी तो महेंद्रसिंह धोनीसाठी खास असेल; कारण धोनीच्या वन-डे कारकिर्दीतील तो 300 वा वनडे आहे. धोनी गेल्या 13 वर्षांपासून खेळत आहे. भारताकडून 300 वनडे खेळणारा धोनी हा देशाचा सहावा खेळाडू आहे. या यादीत सचिन तेंडुलकर आघाडीवर आहे. सचिनने सर्वाधिक 463 सामने खेळले आहेत.
 

Web Title: India challenge Sri Lanka for 376; Virat-Rohit's century

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.