IND vs WIN ODI : 'हा' ठरू शकतो धोनीचा अखेरचा वनडे सामना, त्यामुळे वेस्ट इंडिजविरुद्धची पाचवी मॅच चुकवू नका

भारताच्या ट्वेन्टी-20 संघातून त्याला वगळण्यात आले. त्यानंतर एकदिवसीय संघात धोनीसाठी स्पर्धा निर्माण करण्यात आली आणि रिषभ पंतला संघात स्थान देण्यात आलं.

By ऑनलाइन लोकमत | Published: October 31, 2018 07:41 PM2018-10-31T19:41:11+5:302018-10-31T19:43:00+5:30

whatsapp join usJoin us
IND vs WIN ODI: Dhoni's last ODI match can be 'this' | IND vs WIN ODI : 'हा' ठरू शकतो धोनीचा अखेरचा वनडे सामना, त्यामुळे वेस्ट इंडिजविरुद्धची पाचवी मॅच चुकवू नका

IND vs WIN ODI : 'हा' ठरू शकतो धोनीचा अखेरचा वनडे सामना, त्यामुळे वेस्ट इंडिजविरुद्धची पाचवी मॅच चुकवू नका

whatsapp join usJoin usgoogleNewsNext
ठळक मुद्देक्रिकेट पंडितांनी तर उद्या वेस्ट इंडिजबरोबरचा त्याचा अखेरचा वनडे सामना असेल, असे मतही व्यक्त केले आहे.

नवी दिल्ली, भारत विरुद्ध वेस्ट इंडिज : महेंद्रसिंग धोनीला एकेकाळी सर्वात यशस्वी कर्णधार म्हटले जायचे. पण सध्याच्या घडीला धोनी आगामी विश्वचषकात खेळणार की नाही, याबद्दल संभ्रम आहे. काही क्रिकेट पंडितांनी तर उद्या वेस्ट इंडिजबरोबरचा त्याचा अखेरचा वनडे सामना असेल, असे मतही व्यक्त केले आहे.

भारताचा माजी कर्णधार महेंद्रसिंग धोनीसाठी सध्या वाईट काळ सुरु आहे, असं काही जण म्हणत आहेत. भारताच्या ट्वेन्टी-20 संघातून त्याला वगळण्यात आले. त्यानंतर एकदिवसीय संघात धोनीसाठी स्पर्धा निर्माण करण्यात आली आणि रिषभ पंतला संघात स्थान देण्यात आलं. धोनीला गेल्या वर्षभरात फलंदाजीमध्ये फारशी चांगली कामगिरी करता आलेली नाही. त्यामुळे धोनीला ट्वेन्टी-20 संघातून वगळण्यात आले, असे म्हटले जात आहे. धोनीचा अखेरचा सामना असल्यामुळे तिरुवनंतपुरमला त्याचा 35 फुटी मोठा कट-आऊट लावण्यात आला आहे.


भारत आणि वेस्ट इंडिज यांच्यातील पाचवा सामना तिरुवनंतपुरममध्ये खेळवला जाणार आहे. त्यानंतर धोनी भारतात वनडे खेळणार नाही, असे काही क्रिकेट पंडितांनी म्हटले आहे. कारण या मालिकेनंतर भारतीय संघ ऑस्ट्रेलियात जाणार आहे. त्यानंतर भारताचा न्यूझीलंड दौरा असेल. या दौऱ्यानंतर भारतीय संघ इंग्लंडमध्ये विश्वचषक खेळायला जाणार आहे. विश्वचषकानंतर धोनी राजीनामा देणार, असे म्हटले जात आहे. त्यामुळे धोनीचा उद्या होणारा भारतातील अखेरचा सामना असेल, असे म्हटले जात आहे.

Web Title: IND vs WIN ODI: Dhoni's last ODI match can be 'this'

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.