IND vs AUS : ऑस्ट्रेलियामधील या गोष्टीमुळे विराट कोहली झाला ट्रोल, चाहत्यांनी धारेवर धरले...

तुम्ही कितीही मोठे खेळाडू असलात तरी खेळाचा मान तुम्ही ठेवायलाच हवा, असे खडे बोल चाहत्यांनी विराटला सुनावले आहेत.

By ऑनलाइन लोकमत | Published: November 30, 2018 05:31 PM2018-11-30T17:31:22+5:302018-11-30T17:33:04+5:30

whatsapp join usJoin us
IND vs AUS: Virat Kohli Trol by Fan's in australia | IND vs AUS : ऑस्ट्रेलियामधील या गोष्टीमुळे विराट कोहली झाला ट्रोल, चाहत्यांनी धारेवर धरले...

IND vs AUS : ऑस्ट्रेलियामधील या गोष्टीमुळे विराट कोहली झाला ट्रोल, चाहत्यांनी धारेवर धरले...

whatsapp join usJoin usgoogleNewsNext
ठळक मुद्दे भारताचा कर्णधार विराट कोहली हा चांगल्या फॉर्मात आहे. ऑस्ट्रेलियामध्ये विराटने अशी एक गोष्ट केली की तो चांगलाच ट्रोल व्हायला लागला आहे.एका गोष्टीमुळे चाहत्यांनी विराटला चांगलेच धारेवर धरले आहे. 

सिडनी, भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया : भारताचा कर्णधार विराट कोहली हा चांगल्या फॉर्मात आहे. विराटने धावांचा डोंगर उभारत चाहत्यांनी मने जिंकली होती. पण ऑस्ट्रेलियामध्ये विराटने अशी एक गोष्ट केली की तो चांगलाच ट्रोल व्हायला लागला आहे. फक्त एका गोष्टीमुळे चाहत्यांनी विराटला चांगलेच धारेवर धरले आहे. 

भारत आणि क्रिकेट ऑस्ट्रेलिया यांच्यामध्ये सध्या सराव सामना सुरु आहे. या सामन्यात भारताने प्रथम फलंदाजी करताना 358 धावा केल्या. या आव्हानाचा पाठलाग करताना क्रिकेट ऑस्ट्रेलिया संघाची 6 बाद 356 अशी स्थिती आहे आणि ते फक्त दोन धावांनी पिछाडीवर आहेत.

कर्णधार विराट कोहलीने क्रिकेट ऑस्ट्रेलिया एकादश संघाविरुद्धच्या सराव सामन्यात दुसऱ्या दिवशी बॅटवर हात साफ करताना अर्धशतक झळकावले. कोहलीने 87 चेंडूंत 7 चौकार आणि 1 षटकार खेचून 64 धावांचा खेळ केला. कोहलीने ही खेळी करून आगामी कसोटी मालिकेत यजमान ऑस्ट्रेलियाला धोक्याचा इशारा दिलेला आहे. दक्षिण आफ्रिका आणि इंग्लंड दौऱ्याप्रमाणेच ऑस्ट्रेलियातही कोहलीची बॅट तळपेल, असा त्याच्या चाहत्यांना विश्वास आहे.

सराव सामन्यासाठी कोहली जेव्हा नाणेफेकीसाठी आला तेव्हा साऱ्यांनीच भुवया उंचावल्या. कारण कोहली यावेळी चक्क हाफ पँटमध्ये नाणेफेकीसाठी आला होता. त्यानंतर त्याला चाहत्यांनी चांगलेच घारेवर धरले. तुम्ही कितीही मोठे खेळाडू असलात तरी खेळाचा मान तुम्ही ठेवायलाच हवा, असे खडे बोल चाहत्यांनी विराटला सुनावले आहेत.

Web Title: IND vs AUS: Virat Kohli Trol by Fan's in australia

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.