IND vs AUS : 'Zero' सिनेमावरून विराट कोहलीचा पंटर होतोय ट्रोल

कर्णधार विराट कोहली मेलबर्न येथील एका मॉलमध्ये पत्नी अनुष्का शर्मासोबत दिसला.

By ऑनलाइन लोकमत | Published: December 23, 2018 01:51 PM2018-12-23T13:51:28+5:302018-12-23T13:52:24+5:30

whatsapp join usJoin us
IND vs AUS: after 'Zero' movie Virat Kohli's team mate lokesh rahul get trolled | IND vs AUS : 'Zero' सिनेमावरून विराट कोहलीचा पंटर होतोय ट्रोल

IND vs AUS : 'Zero' सिनेमावरून विराट कोहलीचा पंटर होतोय ट्रोल

whatsapp join usJoin usgoogleNewsNext

मेलबर्न, भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया : भारतीय संघ सध्या ऑस्ट्रेलियाच्या दौऱ्यावर आहे. भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील  तिसरा कसोटी सामना 26 डिसेंबरपासून मेलबर्न येथे खेळवण्यात येणार आहे. भारतीय संघ मेलबर्न येथे दाखल झाला आहे. कर्णधार विराट कोहली मेलबर्न येथील एका मॉलमध्ये पत्नी अनुष्का शर्मासोबत दिसला. यावेळी या दोघांनी शाहरुख खान, अनुष्का आणि कॅटरिना कैफ यांची प्रमुख भूमिका असलेला 'Zero' हा चित्रपट पाहिला. यानंतर कोहलीचा संघातील पंटर असलेला लोकेश राहुल हा चांगलाच ट्रोल होत आहे.

काही जणांनी तर ट्विटरवर लोकेश राहुलची खिल्ली उडवली आहे. एका व्यक्तीने तर 'Zero' हा चित्रपट पाहिल्यामुळे राहुलचे संघातील स्थान पक्के असल्याचे म्हटले आहे. तर काही जणांनी तू 'Zero'वर आऊट होतोस, म्हणून तुझ्यासाठी हा चित्रपट योग्य आहे, असेही म्हटले आहे.





 चार सामन्यांच्या मालिकेत दोन्ही संघांनी आतापर्यंत एक-एक सामना जिंकला आहे. त्यामुळे 'बॉक्सिंग डे' कसोटीचा सामना दोन्ही संघासाठी महत्त्वाचा आहे. बुधवारपासून सुरू होणाऱ्या या सामन्यापूर्वी भारतीय खेळाडू विश्रांती घेत आहेत. तिसऱ्या सामन्यासाठी भारतीय खेळाडू रविवारपासून सरावाला सुरुवात करणात आहेत. भारतीय संघ मेलबर्न येथे दाखल झाला आहे. 

Web Title: IND vs AUS: after 'Zero' movie Virat Kohli's team mate lokesh rahul get trolled

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.