संघाने नियम मोडल्यास सात धावा कमी करा, सचिनचा नवा फॉर्म्युला

एका लीगच्या सामन्यात फलंदाजाला बाद न देण्यावरून वाद झाला. यानंतर सचिनने आपले मत व्यक्त केले आहे.

By ऑनलाइन लोकमत | Published: May 28, 2019 03:40 PM2019-05-28T15:40:16+5:302019-05-28T15:40:49+5:30

whatsapp join usJoin us
If the team breaks rules, reduce them to seven runs, Tendulkar suggests new options | संघाने नियम मोडल्यास सात धावा कमी करा, सचिनचा नवा फॉर्म्युला

संघाने नियम मोडल्यास सात धावा कमी करा, सचिनचा नवा फॉर्म्युला

whatsapp join usJoin usgoogleNewsNext

मुंबई : क्रिकेट हा खेळ विकसित होण्यास त्यामधल्या नियमांचा ही मोठा वाटा आहे. काळआनुसार क्रिकेटमधल नियम बदलले गेले आणि खेळातील जान कायम राहिली. आता तर भारताचा माजी महान क्रिकेटपटू सचिन तेंडुलकरने एक नवा नियम सुचवला आहे. जर एखाद्या संघाने नियम मोडला तर त्यांना सात धावांचा दंड ठोठवा, असे सचिनने सुचवले आहे. एका लीगच्या सामन्यात फलंदाजाला बाद न देण्यावरून वाद झाला. यानंतर सचिनने आपले मत व्यक्त केले आहे.

काही वर्षांपूर्वी सचिनने शालेय क्रिकेबाबतही एक नियम करायला सुचवला होता. शालेय क्रिकेटच्या संघातील 15 खेळाडूंना एका सामन्यात खेळण्याची संधी द्यायला हवी, असे  सचिनने काही वर्षांपूर्वी सुचवले होते. त्यानंतर हा नियमही बनवण्यात आला. आता सचिनने जो नवीन नियम सुचवला आहे, त्याबाबत नियम होणार का, हे पाहावे लागेल.

सचिन याबाबत म्हणाला की, " एका संघाची जर चूक असेल तर त्या गोष्टीचा फटका दुसऱ्या संघाला बसता कामा नये. मैदानातील पंचांनी आणि सामनाधिकाऱ्यांनी मैदानात होणारी प्रत्येक चूक निदर्शनास आणून द्यायला हवी. त्याचबरोबर जर एखादा संघ नियम मोडत असेल तर त्यांच्या सात धावा दंड म्हणून कापण्यात यायला हव्यात."

नेमके प्रकरण काय...
एका लीगच्या सामन्यात फलंदाजाला बाद न दिल्यामुळे वादंग झाला. षटकाच्या अखेरच्या चेंडूवर एका फलंदाजाने एक धाव घेतली. त्यानंतर दुसऱ्या षटकाच्या पहिल्या चेंडूवर त्यानेच फलंदाजी करायला हवी होती. पण दुसऱ्या षटकाच्या पहिल्या चेंडूवर दुसरा खेळाडू फलंदाजीसाठी उभा राहिली. या पहिल्या चेंडूवर तो बाद झाला आणि तेव्हा पंचांना समजले की, या चेंडूवर पहिला खेळाडू फलंदाजी करायला हवा होता. त्यामुळे पंचांनी फलंदाजाला नाबाद ठरवले.

Web Title: If the team breaks rules, reduce them to seven runs, Tendulkar suggests new options

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.