ICC World Cup 2019 : नग्न व्यक्तीने खेळपट्टीवर येऊन केली 'ही' विचित्र गोष्ट, व्हिडीओ वायरल

ही घटना नेमकी घडली तरी कुठे आणि कधी हे जाणून घ्या...

By ऑनलाइन लोकमत | Published: July 4, 2019 08:27 PM2019-07-04T20:27:49+5:302019-07-04T20:29:04+5:30

whatsapp join usJoin us
ICC World Cup 2019: The nude person has come on the pitch, video viral | ICC World Cup 2019 : नग्न व्यक्तीने खेळपट्टीवर येऊन केली 'ही' विचित्र गोष्ट, व्हिडीओ वायरल

ICC World Cup 2019 : नग्न व्यक्तीने खेळपट्टीवर येऊन केली 'ही' विचित्र गोष्ट, व्हिडीओ वायरल

whatsapp join usJoin usgoogleNewsNext

लंडन, आयसीसी वर्ल्ड कप 2019 : खेळांमध्ये काही वेळेला विचित्र गोष्टी घडत असतात. इंग्लंडमध्ये सध्या विश्वचषक सुरु आहे. यावेळी एका सामन्यात एक नग्न व्यक्ती थेट मैदानात घुसला आणि खेळपट्टीवर जाऊन विचित्र गोष्ट केली. ही घटना नेमकी घडली तरी कुठे आणि कधी हे जाणून घ्या...

इंग्लंड आणि न्यूझीलंड यांच्यामध्ये काल सामना खेळवण्यात आला होता. हा सामना जिंकत इंग्लंडने उपांत्य फेरीत दिमाखात प्रवेश केला. या सामन्याच्या 34 व्या षटकात ही गोष्ट पाहायला मिळाली. त्यावेळी टॉम लॅथम आणि मिचेल सँटनर हे फलंदाजी करत होते. त्यावेळी ही नग्न व्यक्ती खेळपट्टीजवळ आली आणि अश्लील चाळे करायला लागली. त्यावेळी सुरक्षारक्षकांनी मैदानात धाव घेतली आणि ती नग्न व्यक्ती स्वत:ला वाचवण्यासाठी धावायला लागली. कोहीवेळ हा खेळ मैदानात सुरु होता. अखेर पोलीसांनी या नग्न व्यक्तीला पकडले आणि त्याला मैदानाबाहेर नेले.

पाकिस्तानसह इंग्लंडच्या विजयाने भारतीय संघालाही धक्का; जाणून घ्या कसा

 यजमान इंग्लंडनं बुधवारी न्यूझीलंडवर मिळवलेला विजय हा पाकिस्तान संघासाठी मोठा धक्काच होता. इंग्लंडने या विजयासह उपांत्य फेरीतील स्थान पक्के केले आणि न्यूझीलंड सरस नेट रनरेटच्या जोरावर चौथ्या स्थानासह अंतिम चौघांत प्रवेश करेल, हेही निश्चित आहे. त्यामुळे पाकिस्तानला अखेरच्या साखळी सामन्यात विजय मिळवूनही उपयोग होणार नाही. त्यांचे स्पर्धेतील आव्हान साखळी फेरीतच संपुष्टात आल्यात जमा आहे. इंग्लंडचा हा विजय पाकिस्तानसह विराट कोहलीच्या नेतृत्वाखाली खेळणाऱ्या भारतीय संघासाठीही धक्का देणारा ठरला आहे... जाणून घ्या कसे...

यजमान इंग्लंडने न्यूझीलंडवर विजय मिळवत उपांत्य फेरीत दिमाखात प्रवेश केला आहे. विजयानंतर इंग्लंडने जवळपास 27 वर्षांनी एक इतिहास रचला आहे. इंग्लंडने 1992 साली वर्ल्ड कप स्पर्धेच्या उपांत्य फेरीत प्रवेश केला होता.  जॉनी बेअरस्टो ( 106) आणि जेसन रॉय ( 60) यांच्या दमदार सलामीनंतर कर्णधार इयॉन मॉर्गनच्या ( 42) उपयुक्त खेळीच्या जोरावर इंग्लंडने 8 बाद 305 धावा केल्या. प्रत्युत्तरात न्यूझीलंडचा संपूर्ण संघ 186 धावांत तंबूत परतला. मार्क वूडने सर्वाधिक तीन विकेट घेतल्या.

वर्ल्ड कप स्पर्धेतील सलग तीन पराभवामुळे इंग्लंड संघाचे उपांत्य फेरीतील स्थान धोक्यात आले होते.शिवाय आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेच्या वन डे क्रमवारीतील अव्वल स्थानही त्यांना गमवावे लागले होते. इंग्लंडची दुसऱ्या स्थानी घसरण झाली होती आणि 123 गुणांसह भारतीय संघ अव्वल स्थानावर विराजमान झाला होता. मे 2018 पासून इंग्लंड अव्वल स्थानावर होता. पण, आता न्यूझीलंडविरुद्धच्या विजयाने इंग्लंडला पुन्हा अव्वल स्थान मिळवून दिला आहे. इंग्लंड 123 गुणांसह अव्वल स्थान काबीज केले आहे, तर भारताला एक गुणाचा तोटा सहन करावा लागला आहे.


Web Title: ICC World Cup 2019: The nude person has come on the pitch, video viral

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.