ICC World Cup 2019: ख्रिल गेलने एकाच षटकात घेतले दोन रीव्ह्यू अन् तिसऱ्या वेळी घडला घात

गेलने तिसरा रीव्ह्यू देखील घेतला आणि तिथेच त्याचा घात झाला.

By ऑनलाइन लोकमत | Published: June 6, 2019 08:00 PM2019-06-06T20:00:07+5:302019-06-06T20:07:46+5:30

whatsapp join usJoin us
ICC World Cup 2019: Chris Gayle took two reviews and the third time given him out | ICC World Cup 2019: ख्रिल गेलने एकाच षटकात घेतले दोन रीव्ह्यू अन् तिसऱ्या वेळी घडला घात

ICC World Cup 2019: ख्रिल गेलने एकाच षटकात घेतले दोन रीव्ह्यू अन् तिसऱ्या वेळी घडला घात

whatsapp join usJoin usgoogleNewsNext

लंडन, आयसीसी वर्ल्ड कप 2019 : प्रत्येक संघाला एका डावात दोनदा रीव्ह्यू  घेता येतो. पण वेस्ट इंडिजचा धडाकेबाज फलंदाज ख्रिस गेलने एकाच षटकात दोन रीव्ह्यू घेतल्याचे पाहायला मिळाले. हेच तर काहीच नाही, त्याने तिसरा रीव्ह्यू देखील घेतला आणि तिथेच त्याचा घात झाला.

ऑस्ट्रेलियाचा वेगवान गोलंदाज मिचेल स्टार्कच्या तिसऱ्या षटकात ही गोष्ट घडली. या षटकाच्या तिसऱ्या चेंडूवर गेलला पंचांनी झेल बाद दिले. गेलचा झेल यष्टीरक्षकाने पकडला, असा निर्णय पंचांनी दिला. त्यावेळी गेलने रीव्ह्यू घेतला आणि त्यामध्ये तो बाद ठरला.


तिसऱ्या षटकाच्या अखेरच्या चेंडूवर गेलला पंचांनी पायचीत बाद दिले. त्यावेळीही गेलने रीव्ह्यू घेतला. त्यावेळी तिसऱ्या पंचांनी गेल नाबाद असल्याचे ठरवले आणि तो दुसऱ्यांदा यशस्वी ठरला. पण तिसऱ्यांदा मात्र त्याचा घात झाला.



 पाचव्या षटकामध्ये पुन्हा एकदा स्टार्कच्या गोलंदाजीवर पंचांनी गेलला बाद दिले. गेल पायचीत असल्याचा निर्णय पंचांनी दिला. गेलने पुन्हा एकदा रीव्ह्यू घेतला. त्यावेळी चेंडू हा स्टम्पला अर्धवट लागत असल्याचे दिसत होते. जर पंचांनी नाबाद दिले असते आणि ऑस्ट्रेलियाने रीव्ह्यू घेतला असता तर गेल खेळत राहिला असता. पण पंचांनी आऊट दिल्यामुळे गेलला रीव्ह्यूचा फायदा होऊ शकला नाही आणि तो माघारी परतला.

हा भन्नाट कॅच पाहिल्यावर चाहतेच करतायत 'त्याला' सॅल्यूट
वेस्ट इंडिजचा वेगवान गोलंदाज शेल्डन कॉट्रेलची सेलिब्रेशनची स्टाइल भन्नाटच आहे. सेलिब्रेशन करताला कॉट्रेल हा कडक सॅल्यूट ठोकतो. पण ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या सामन्यात कॉट्रेलने एक भन्नाट कॅच पकडली आणि त्यानंतर चाहतेच त्याला सॅल्यूट ठोकत आहेत.
एकेकाळी 4 बाद 38 अशी परिस्थिती असलेल्या ऑस्ट्रेलियाने वेस्ट इंडिजविरुद्धच्या सामन्यात भन्नाट पुनरागमन केले. स्टीव्हन स्मिथ आणि नॅथन कल्टर निल यांनी अर्धशतके झळकावत ऑस्ट्रेलियाला तारले. स्मिथने दमदार फलंदाजी करत ऑस्ट्रेलियाला स्थैर्य मिळवून दिले. पण याच स्मिथचा अफलातून झेल कॉट्रेलने सीमारेषेवर पकडला आणि चाहत्यांनी एकच जल्लोश केला.

नेमके काय घडले
स्मिथने ओशाने थॉमसचा 45 षटकातील दुसरा चेंडू चांगलाच टोलवला. हा चेंडू आता थेट सीमारेषे पार जाणार आणि स्मिथला षटकार मिळणार असे वाटत होते. पण त्यावेळी कॉट्रेल धावून आला आणि त्याने चेंडू पकडला. पण त्यावेळी आपला पाय सीमारेषेला लागणार, हे त्याला कळून चुकले. त्यावेळी कॉट्रेलने चेंडू मैदानात उंच उडवला आणि त्यानंतर तो सीमारेषेबाहेर गेला. त्यानंतर काही क्षणातच तो मैदानात आला आणि त्याने अप्रतिम झेल टिपला.

पाहा हा खास व्हिडीओ


Web Title: ICC World Cup 2019: Chris Gayle took two reviews and the third time given him out

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.