मी भीक मागत नाही, माझा हक्क मागतोय - श्रीशांत

बीसीसीआयने श्रीशांतच्या आजीवन क्रिकेट खेळण्यावरील बंदी हटवण्याच्या निर्णयाला आव्हान देण्याचा निर्णय घेतला आहे.

By ऑनलाइन लोकमत | Published: August 11, 2017 06:17 PM2017-08-11T18:17:24+5:302017-08-11T19:16:22+5:30

whatsapp join usJoin us
I am not begging, asking for my claim - Sreesanth | मी भीक मागत नाही, माझा हक्क मागतोय - श्रीशांत

मी भीक मागत नाही, माझा हक्क मागतोय - श्रीशांत

whatsapp join usJoin usgoogleNewsNext
ठळक मुद्देमी तुमच्याकडे भीख मागत नाहीय. उदरनिर्वाहाचे साधन परत मागतोय

कोची, दि. 11 - बीसीसीआयने श्रीशांतच्या आजीवन क्रिकेट खेळण्यावरील बंदी हटवण्याच्या निर्णयाला आव्हान देण्याचा निर्णय घेतला आहे. बीसीसीआयच्या या निर्णयावर श्रीशांत संतप्त झाला असून, मी तुमच्याकडे भीक मागत नाही, असे त्याने बीसीसीआयला सुनावले आहे. मी तुमच्याकडे भीक मागत नाही. उदरनिर्वाहाचे साधन परत मागतोय. तो माझा अधिकार आहे. तुम्ही देवापेक्षा मोठे नाहीत असे टि्वट करुन त्याने बीसीसीआयवरील राग व्यक्त केला. 

स्पर्धात्मक क्रिकेटमध्ये पुनरागमन करण्याचा निर्धारही त्याने व्यक्त केला. 34 वर्षीय श्रीशांतवरील बंदी उठवण्याच्या निर्णयाला बीसीसीआयने केरळच्या उच्च न्यायालयाच्या विभागीय खंडपीठात आव्हान देण्याचा निर्णय घेतला. एकदा नाही अनेकदा मी निर्दोष ठरलोय तरी तुम्ही माझ्या बरोबर वाईट करताय. तुम्ही हे सर्व का करताय? ते समजायला आधार नाही असे त्याने दुस-या टि्वटमध्ये म्हटले आहे. 

2013 सालच्या स्पॉट फिक्सिंग प्रकरणात श्रीशांतचा सहभाग समोर आल्यानंतर बीसीसीआयने त्याच्यावर आजीवन क्रिकेट खेळण्यावर बंदी घातली. केरळ उच्च न्यायालयाने सोमवारी श्रीशांतवरील आजीवन बंदी उठविताना मॅच फिक्सिंगमध्ये त्याचा सहभाग असल्याचे कुठलेही ठोस पुरावे सापडले नाहीत, असे स्पष्ट केले. न्या. ए मोहम्मद मुश्ताक यांनी बीसीसीआयकडून श्रीशांतविरुद्ध करण्यात आलेली सर्वच कारवाई रद्दबातल केली. 

निकालानंतर आनंदी झालेल्या श्रीशांतने क्रिकेटमधील ‘दुस-या इनिंग’ला सुरुवात करण्याची इच्छा व्यक्त केली होती. त्यासाठी केरळ क्रिकेट संघात स्थान मिळविणे हे पहिले लक्ष्य असेल असे म्हटले होते. श्रीशांत पुन्हा केरळ संघात दिसावा यासाठी सकारात्मक निर्णय घेण्याचे संकेतही केसीएने आधीच दिले आहेत. 
दरम्यान स्पर्धात्मक क्रिकेटमध्ये पुनरागमन करू इच्छिणारा वेगवान गोलंदाज एस. श्रीशांत याच्याबाबत निर्देश देण्यासाठी केरळ क्रिकेट संघटनेने (केसीए) बीसीसीआयला पत्र लिहिले होते. २०१३च्या स्पॉट फिक्सिंगप्रकरणी बीसीसीआयने श्रीशांतवर आजीवन बंदी घातली होती. केरळ उच्च न्यायालयाने एका आदेशाद्वारे ही बंदी उठविली असल्याने केसीएने हे पाऊल उचलले. ‘मी स्पर्धात्मक क्रिकेटमध्ये परतण्यास सज्ज असल्याचे श्रीशांतने केरळ संघटनेला कळविले आहे. 


Web Title: I am not begging, asking for my claim - Sreesanth

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.