हार्दिक पंड्याला खेळवायला हवे

विराट कोहलीसाठी विदेशातील ही पहिली खडतर मालिका आहे. दक्षिण आफ्रिकेविरुद्ध शुक्रवारपासून तीन कसोटी सामन्यांच्या मालिकेला प्रारंभ होत आहे. २०१७ हे वर्ष भारतीय संघासाठी शानदार ठरले आणि यंदाही टीम इंडिया कामगिरीत सातत्य राखण्यास उत्सुक आहे.

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 5, 2018 01:12 AM2018-01-05T01:12:37+5:302018-01-05T11:23:02+5:30

whatsapp join usJoin us
 Hearty Pundal must be played | हार्दिक पंड्याला खेळवायला हवे

हार्दिक पंड्याला खेळवायला हवे

whatsapp join usJoin usgoogleNewsNext

- सौरव गांगुली
विराट कोहलीसाठी विदेशातील ही पहिली खडतर मालिका आहे. दक्षिण आफ्रिकेविरुद्ध शुक्रवारपासून तीन कसोटी सामन्यांच्या मालिकेला प्रारंभ होत आहे. २०१७ हे वर्ष भारतीय संघासाठी शानदार ठरले आणि यंदाही टीम इंडिया कामगिरीत सातत्य
राखण्यास उत्सुक आहे. मायदेशात खेळण्यापेक्षा ही मालिका वेगळी राहणार आहे, पण या संघात विदेशातही छाप सोडण्याची क्षमता आहे, असा मला विश्वास आहे.
विराटचा फॉर्म संघासाठी महत्त्वाचा आहे. उपखंडाबाहेर कर्णधार म्हणून विराटची ही पहिलीच मालिका आहे. त्यामुळे एक फलंदाज आणि कर्णधार म्हणून त्याला समतोल साधावा लागेल. कर्णधार म्हणून यापूर्वी दोन सामन्यांत अ‍ॅडिलेड आणि सिडनी येथे त्याची कामगिरी शानदार होती. येथील आठवणी त्याच्यासाठी ताज्या असतील आणि त्याची त्याला मदतही होईल.
भारतीय संघासाठी या मालिकेत योग्य समतोल साधणे महत्त्वाचे आहे. माझ्या मते हार्दिक पंड्याला खेळवायला हवे. त्यामुळे पाच गोलंदाजांसह खेळण्याचा पर्याय खुला राहील आणि प्रतिस्पर्धी संघाचे २० बळी घेण्यासाठी हे महत्त्वाचे आहे. पांड्यासह वृद्धिमान साहा आणि आर. अश्विन हे फलंदाजीमध्ये योगदान देण्यास सक्षम असून भुवनेश्वरही उपयुक्त योगदान देऊ शकतो.
मालिकेतील पहिली लढत महत्त्वाची असून, गोलंदाजांसाठी अचूक दिशा व टप्पा राखणे यश मिळवण्यासाठी महत्त्वाचे ठरेल. गोलंदाजांनी फुललेंथ मारा करीत चेंडूने यष्टीचा वेध घेणे आवश्यक आहे. आश्विनसाठी ही मालिका महत्त्वाची आहे. दक्षिण
आफ्रिकेतही चमकदार कामगिरी करण्यास सक्षम असल्याचे त्याला सिद्ध करायचे आहे.
(गेमप्लॅन)

Web Title:  Hearty Pundal must be played

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.