अखेर महेंद्रसिंग धोनीने उघड केले त्याच्या चपळ यष्टीरक्षणामागचे गुपित 

भारताचा माजी कर्णधार महेंद्रसिंग धोनीची यष्टीमागची चपळता सर्वश्रुत आहे. वाढत्या वयासोबत तर माहीच्या यष्टीरक्षणाचा दर्जा अधिकाधिक उंचावत चालला आहे.

By ऑनलाइन लोकमत | Published: May 2, 2019 03:22 PM2019-05-02T15:22:40+5:302019-05-02T15:24:30+5:30

whatsapp join usJoin us
Finally, MS Dhoni open the secret behind his quick Wicket keeping | अखेर महेंद्रसिंग धोनीने उघड केले त्याच्या चपळ यष्टीरक्षणामागचे गुपित 

अखेर महेंद्रसिंग धोनीने उघड केले त्याच्या चपळ यष्टीरक्षणामागचे गुपित 

whatsapp join usJoin usgoogleNewsNext

चेन्नई -  भारताचा माजी कर्णधार महेंद्रसिंग धोनीची यष्टीमागची चपळता सर्वश्रुत आहे. वाढत्या वयासोबत तर माहीच्या यष्टीरक्षणाचा दर्जा अधिकाधिक उंचावत चालला आहे. आयपीएलमध्ये काल चेन्नई सुपरकिंग्स आणि दिल्ली कॅपिटल्स यांच्यात झालेल्या लढतीमध्ये याचा क्रिकेटप्रेमींना पुन्हा एकदा प्रत्यय आला. दरम्यान, महेंद्रसिंग धोनीने आपल्या चपळ यष्टीरक्षणाचे गुपित उघड केले आहे. ''सुरुवातीच्या काळात टेनिस बॉलने क्रिकेट खेळल्याने माझ्या यष्टीरक्षणामध्ये चपळता आली असावी, मात्र असे असले तरी खेळातील प्राथमिक गोष्टींची माहिती तुम्हाला असणे आवश्यक आहे. तिथून तुम्ही उच्च पातळीवर पोहोचू शकता.'''असे धोनीने सांगितले. 

यष्टीरक्षणातील चपळतेबाबत धोनी म्हणाला की,''टेनिस बॉलने क्रिकेट खेळल्याने माझ्या यष्टीरक्षणामध्ये चपळता आली असावी, मात्र असे असले तरी खेळातील प्राथमिक गोष्टींची माहिती तुम्हाला असणे आवश्यक आहे. तिथून तुम्ही उच्च पातळीवर पोहोचू शकता. मात्र तुम्ही स्वत:मध्ये बदल केला नाही तर तुमच्याकडून चुका होऊ शकतात. त्यामुळे यष्टीरक्षणातील प्राथमिक गोष्टींची माहिती असणे महत्त्वाचे आहे, असे मला वाटते.'' 


आयपीएलमध्ये चेन्नई सुपरकिंग्सचे नेतृत्व करत असलेला महेंद्रसिंग धोनी यंदाच्या हंगामात जबरदस्त फॉर्ममध्ये आहे. ताप आणि पाटदुखीमुळे दोन सामन्यांना मुकलेल्या धोनीने बुधवारी दिल्ली कॅपिटल्सविरुद्धच्या लढतीत पुन्हा एकदा संघाचे नेतृत्व केले. या लढतीत धोनीने 22 चेंडूत 44 धावांची तडाखेबंद खेळी केली. तसेच यष्टीमागे दोन फलंदाजांना यष्टीचित आणि एकाला झेलबाद करत सामन्यातील सर्वोत्तम खेळाडूचा मानही पटकावला. 

 या खेळीबाबत विचारणा केली असता धोनी म्हणाला की, गोलंदाजीमधील वैविध्य समजण्यासाठी मी खेळपट्टीवर काही वेळ घालवला. तसेच अखेरीस संघाला विजयी धावसंख्येपर्यंत पोहोचवले.खेळपट्टीवर वेळ घालवला, गोलंदाजीमधील वैविध्य समजून घेतले की शेवटच्या षटकामध्ये फटकेबाजी करणे सोपे जाते.  

Web Title: Finally, MS Dhoni open the secret behind his quick Wicket keeping

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.