बीसीसीआयचा संघ पाठविण्यास स्पष्ट नकार, पाकिस्तानचे यजमानपद धोक्यात

भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (बीसीसीआय) एप्रिल महिन्यात होणा-या ‘एशिया इमर्जिंग नेशन्स कप’ स्पर्धेसाठी भारतीय संघ पाकिस्तानमध्ये पाठविण्यास स्पष्टपणे नकार दिल्याने या स्पर्धेच्या आयोजनावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 2, 2018 11:57 PM2018-03-02T23:57:15+5:302018-03-03T06:50:47+5:30

whatsapp join usJoin us
Definition of sending a team to BCCI, threat to Pakistan's hostage | बीसीसीआयचा संघ पाठविण्यास स्पष्ट नकार, पाकिस्तानचे यजमानपद धोक्यात

बीसीसीआयचा संघ पाठविण्यास स्पष्ट नकार, पाकिस्तानचे यजमानपद धोक्यात

whatsapp join usJoin usgoogleNewsNext

नवी दिल्ली : भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (बीसीसीआय) एप्रिल महिन्यात होणा-या ‘एशिया इमर्जिंग नेशन्स कप’ स्पर्धेसाठी भारतीय संघ पाकिस्तानमध्ये पाठविण्यास स्पष्टपणे नकार दिल्याने या स्पर्धेच्या आयोजनावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. २००९ सालानंतर या स्पर्धेच्या रूपाने पाकिस्तानमध्ये पहिल्यांदाच मोठ्या आंतरराष्ट्रीय स्पर्धेचे आयोजन होणार होते. मात्र, जागतिक क्रिकेटची महासत्ता असलेल्या बीसीसीआयच्या भूमिकेमुळे पाकिस्तान क्रिकेट बोर्डाचे (पीसीबी) यजमानपद धोक्यात आले आहे.
पीसीबीच्या एका अधिका-याने म्हटले की, ‘बीसीसीआय आपला संघ पाकिस्तानमध्ये पाठविण्यास तयार नाही. त्यामुळे इमर्जिंग नेशन्स कप स्पर्धेचे आयोजन श्रीलंका किंवा बांगलादेशमध्ये होऊ शकतं.’ तसेच, ‘सर्व देश या स्पर्धेत सहभागी होतील, असे मानून आम्ही या स्पर्धेच्या यजमानपदासाठी तयार झालो होतो,’ असेही पीसीबीच्या अधिका-याने म्हटले.
पीसीबीचे चेअरमन आणि आशियाई क्रिकेट परिषदेचे (एसीसी) प्रमुख नजम सेठी यांनी दुबई येथे प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना म्हटले की, ‘लवकरच कोलंबो येथे एसीसीची बैठक घेण्यात येईल. यामध्ये इमर्जिंग नेशन्स कप आणि सप्टेंबर महिन्यात भारतात होणाºया आशिया चषक स्पर्धेच्या विषयी अंतिम निर्णय घेण्यात येईल.’ भारतात होणाºया आशिया चषक स्पर्धेतील पाकिस्तानचा सहभागही काही अटींवरच निश्चित होईल, असेही सेठी यांनी या वेळी स्पष्ट केले.
मुंबईत २००८ साली झालेल्या आतंकवादी हल्ल्यानंतर भारताने पाकिस्तानसह द्विपक्षीय मालिका खेळणे बंद केले. (वृत्तसंस्था)
>...तरच आयसीसी बैठकीला येणार
पीसीबी चेअरमन नजीम सेठी यांनी या वेळी स्पष्ट केले की, ‘एप्रिलमध्ये कोलकाता येथे होणाºया आयसीसीच्या बैठकीसाठी आयसीसीने व्हिसाचा बंदोबस्त केला, तरच मी भारतात येईल; अन्यथा भारतात येण्यास मला उत्सुकता नाही.’ सेठी म्हणाले की, ‘जर भारतीय अधिकाºयांनी व्हिसा उपलब्ध केला, तर मी कोलकाता येथे बैठकीला येईन. जर असे झाले नाही, तर याकडे आयसीसीला लक्ष द्यावे लागेल.’

Web Title: Definition of sending a team to BCCI, threat to Pakistan's hostage

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.